Winter Health Care : सध्या देशभरात बहुतांश ठिकाणी कडाक्याची थंडी पडली आहे. यामुळे त्वचा कोरडी होणे, हातापायांच्या बोटांना खाज येणे आणि सूज येण्याच्या समस्येला काही जणांना सामोरे जावे लागते. हिवाळ्यात अशा प्रकारच्या समस्या होणे सामान्य बाब आहे. याशिवाय अशा समस्यांचा पुढे जाऊन त्रासही होऊ शकतो. यावर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. जाणून घेऊया याबद्दल अधिक…
सैंधव मीठ
हिवाळ्यात हातापायांना येणाऱ्या सूजेच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी तुम्ही सैंधव मीठाचा वापर करू शकता. यासाठी गरम पाण्यात सैंधव मीठ मिक्स करून 10-15 मिनिटे पाय त्यामध्ये बुडवून ठेवा. यामुळे पायाला आराम मिळेल. यावेळी लक्षात ठेवा की, दिवसातून एकदाच सैंधव मीठाच्या पाण्यात पाय बुडवा. अन्यथा पायाची त्वचा अधिक कोरडी होऊ शकते.
गरम तेलाने मसाज
एका वाटीत ऑलिव्ह ऑइल, तीळाचे अथवा नारळाचे तेल घेऊन ते गरम करा. गरम केलेले तेल थोड थंड झाल्यानंतर त्याने पायाला मसाज करा. यामुळे शरिरात ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितीत होण्यासह दुखणे कमी होईल. जो पर्यंत हातापायांना सूज आहे तो पर्यंत दिवसातून दोन-तीन वेळेस तेल गरम करून मसाज करा.
नारळाचे तेल आणि कापूर
नारळाचे तेल गरम करून त्यामध्ये कापूर मिक्स करा. तेल थंड झाल्यानंतर ज्या ठिकाणी लाल डाग किंवा सूज आली आहे तेथे लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे हातापायांना खाज येण्याची समस्याही दूर होईल.
ओव्याचे सेवन करा
ओव्याचे सेवन केल्याने स्नायू दुखणे, पोटदुखीच्या समस्येपासून तुम्ही दूर राहता. राईच्या तेलात ओव्याची पावडर मिक्स करून मसाज केल्याने दुखण्याच्या समस्येपासून दूर राहण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांचे हातपाय दुखत असल्यास ते हा उपाय करू शकतात. (Winter Health Care)
लसूण
लसूणमध्ये अँटी-बायोटिक गुण असतात. शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लसूण अत्यंत फायदेशीर असल्याचे मानले जाते. स्नायू किंवा हातपाय दुखत असल्यास तुम्ही लसूणचे सेवन करू शतता. याशिवाय लसूणच्या तेलाने मसाज केल्यानेही हातपायांना येणारी सूज किंवा दुखणे कमी होऊ शकते.
(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)