Health Care Tips : बहुतांशवेळेस आपले आपल्या शरीराचा हालचालींवर नियंत्रण नसते. आपल्याला आनंदी राहायचे असते तरीही मूड बिघडला जातो. मूड बिघडल्याने आपण दुसऱ्या व्यक्तींसोबतही काही वेळेस वाईट वागतो आणि कधीकधी यामागील कारण देखील कळत नाही. खंरतर अशा प्रकारच्या वागण्याला मूड स्विंग्स असे म्हटले जाते. पण तुम्हाला माहितेय का, मूड स्विंग्स आणि खाण्यापिण्याचा संबंध असतो? अशातच मूड स्विंग्सच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी तुम्ही पुढील काही फूड्सचे सेवन करू शकता.
पालक
सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत. अशातच तुम्ही पालकचे सेवन केले पाहिजे. पालक खाल्ल्याने मूड स्विंग्सच्या समस्येपासून तुम्ही दूर राहाता. याशिवाय पालकमध्ये लोह, प्रोटीन, पोटॅशिअमसह अन्य पोषक तत्त्वे असतात, जे शरीर आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात.
केशर
सतत मूड स्विंग्स होत असल्यास तुम्ही पदार्थांमध्ये केशरचा वापर करू शकता. केशर आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. बहुतांशजण केशर दूधात मिक्स करून पितात.
अंड
अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात. जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. याशिवाय झिंक आणि ओमेगा थ्री गुणधर्मही अंड्यात असल्याने तुम्ही मूड स्विंग्सच्या समस्येपासून दूर राहता.
अक्रोड
सकाळच्या हेल्दी नाश्तावेळी तुम्ही आक्रोड खाल्ले पाहिजेत. खरंतर अक्रोड मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. यामध्ये ओमेगा थ्री देखील असते. यामुळे तुमचा मूड फ्रेश राहतो. हिवाळ्यात अक्रोड कोणत्याही प्रकारे खाऊ शकता. पण उन्हाळ्यात अक्रोड भिजवून खाल्ले पाहिजेत. (Health Care Tips)
कॉफी
जेव्हा तुम्हाला मूड स्विंग्सच्या समस्येचा सामना करावा लागतो तेव्हा कॉफी प्या. कॉफीमध्ये कॅफेन असते. ज्यामुळे तुमच्या शरीराला उर्जा देण्याचे काम करते आणि तुमचा मूड फ्रेश होतो. पण कॉफीचे मर्यादित प्रमाणातच सेवन करावे. अन्यथा आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
चॉकलेट
चॉकलेटमुळे शरीरात हॅप्पी हार्मोन्स स्टिम्युलेट होण्यास मदत होते. खरंतर यामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे केमिकल असते. यामुळे चॉकलेट खाल्ल्यानंतर शरिरातील सेरोटोनिन हार्मोन प्रोड्युस होते. याला हॅप्पी हार्मोन देखील म्हटले जाते. हॅप्पी हार्मोन शरिरात उत्सर्जित झाल्यानंतर तुमचे मन आनंदित होते. याशिवाय तुम्ही मूड स्विंग्सच्या समस्येपासूनही दूर राहता.
(टीप : या लेखातील माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)