Health Care Tips : आजकाल प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना फास्ट फूड खाणे आवडते. खरंतर फास्ट फूड खाणे टाळले पाहिजे असा सल्ला नेहमीच दिला जातो. पण काहीजणांना फास्ट फूड ऐवढे आवडते की, ते घरचं जेवणही फार कमी जेवतात. फास्ट फूडपैकीच एक म्हणजे इन्स्टेंट नूडल्स. इन्स्टेंट नूडल्स तयार करण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. इन्स्टेट नूडल्समध्ये मैद्यासह अन्य गोष्टींचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहितेय का, नूडल्ससाठी वापरले जाणारे मसाले तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. याबद्दलच जाणून घेऊया अधिक…
हेल्थ एक्सपर्ट्स मानतात की, आजकाल तरुणांमध्ये मानसिक आरोग्यासंबंधित समस्या दिसून येते. त्यांच्यामध्ये किडनीसंबंधित आजार सामान्य होत चालले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे जंक फूडचे अत्याधिक प्रमाणात सेवन करणे. यापैकीच एक फूड म्हणजे नूडल्स. नूडल्ससोबत जे मसाले येतात ते तुमच्या आरोग्यावर घातक परिणाम करतात.
नूडल्सचे मसाले धोकादायक
नूडल्ससोबत येणाऱ्या मसाल्यांमध्ये लीड असते. यामुळेच देशात एकदा नूडल्सवर बंदी घालण्यात आली होती. पण नंतर त्यावरील बंदी हटवण्यात आली होती. नूडल्समध्ये लीड आता फार कमी प्रमाणात असते. मात्र याचा अर्थ असा होत नाही की, त्याचा दुष्प्रभाव कमी झाला आहे. खासकरुन तुमच्या किडनी आणि रक्तवाहिन्या नूडल्समुळे डॅमेज होऊ शकतात.
तुम्ही पाहिले असेल जंक फूड खाणाऱ्यांमध्ये राग किंवा बैचेन वाटणे, इरिटेशन किंवा आरोग्यासंबंधित समस्या अधिक असतात. याचे कारण असे आहे की, लीड सारखी तत्वे यामध्ये असतात किंवा तुमच्या ब्रेन सेल्सला डॅमेज करतात. याशिवाय लठ्ठपणा वाढणे, तणाव आणि एंग्जायटी सारख्या समस्याही वाढल्या जातात.
नूडल्सचे तुम्ही दररोज सेवन केल्याने तुम्हाला किडनीसंबंधित समस्या होऊ शकतात. तुम्ही डायलिसिसच्या बेडपर्यंत पोहोचू शकता. यामुळे नूडल्स खाण्याची सवय तरुणांनी सुधारली पाहिजे. तुम्ही 15 दिवस किंवा एका महिन्यातून एकदाच याचे सेवन करू शकता. याचा आरोग्यावर दुष्परिणाम होत नाही. (Health Care Tips)
(टीप : या लेखातील माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)