Slow Parenting : मुलांचे पालन-पोषण करणे सामान्य बाब नव्हे. प्रत्येक मुलं वेगळे असते आणि म्हणूनच प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला हॅण्डल करण्याची वेगळी पद्धत वापरावी लागते. प्रत्येक पालकांचे आपल्या मुलाबद्दलचे एक वेगळे मतही असते. यामुळे कोणत्याही पालकांना मुलांच्या पालन पोषणासाठी चुकीचे ठरवले जाऊ शकत नाही.
पालक आपल्या मुलांची काळजी कशी घेतात यावरुन मुलांचे संगोपन कसे आहे हे ठरविले जाते. यामधीलच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्लो पॅरेंटिंग. ही एक अशी कॉन्सेप्ट आहे जी वास्तवात मुलांना सोपे आयुष्य जगण्यास शिकवते. जेणेकरुन मुलांना आपल्या कलाकौशल्याने जग एक्सप्लोर करण्यास मदत होईल. बहुतांशजण स्लो पॅरेंटिगला योग्य मानतात. पण काहीजण याचा विरोधही करतात. जाणून घेऊया याबद्दलच सविस्तर….
स्लो पॅरेंटिंग म्हणजे काय?
स्लो पॅरेंटिंगमध्ये मुलांना स्वत:च्या क्षमतेनुसार वाढणे, जग एक्सप्लोर करणे आणि आपले निर्णय स्वत:हून घेण्याची संधी दिली जाते. या मुलांना प्रॅक्टिकल अनुभवांच्या माध्यमातून शिकवले जाते. स्लो पॅरेंटिगचा अर्थ असा होत नाही की, मुलांना पालकांनी काहीच शिकवू नये. वास्तवात याचा अर्थ असा होतो की, योग्य गतीने मुलांना काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत. जेव्हा पालक मुलांनाचे अशा पद्धतीने पालन-पोषण करतात तेव्हा ते मुलांवर अतिरिक्त दबाव टाकत नाहीत. वास्तवात ते मुलांना वर्तमानकाळातील गोष्टींचा आनंद घेण्यास शिकवतात. (Slow Parenting)

Slow Parenting
स्लो पॅरेंटिंगचे फायदे
-स्लो पॅरेंटिंगमध्ये मुल आत्मनिर्भर होतात. ते आपल्या गरजांच्याप्रति अधिक जागृक होतात. ऐवढेच नव्हे तर मुलं आपली कामे पूर्ण स्वत:हून करणेही शिकतात.
-मुलं जेव्हा स्वत:हून काही गोष्टी एक्सप्लोर करतो तेव्हा तो अधिक आत्मविश्वासू होते. याशिवाय एखाद्या स्थितीत तो योग्य निर्णयही घेऊ शकतो.
-मुलाच्या क्रिएटिव्हिटीमध्ये सुधारणा होतो. तो नव्या गोष्टी शिकतो. याशिवाय तणावाची स्थितीही व्यवस्थितीत हाताळू शकतो.
स्लो पॅरेंटिंगचे नुकसान काय?
-स्लो पॅरेंटिंगमध्ये मुलं चुकीच्या संगतीत जाऊ शकतो. कारण यामध्ये मुलाला पूर्णपणे आयुष्य जगण्याचे स्वातंत्र्य दिले जाते.
-काही वेळेस अशा स्थितीत जाऊ शकतात जेथे त्यांच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात.
-स्लो पॅरेंटिंगमध्ये मुलावर कोणतीही बंधने नसल्याने मुलं त्यांच्या मनाप्रमाणे वागण्यास मोकळी असतात. याचा परिणाम त्यांच्या भावी आयुष्यावरही होऊ शकतो.