Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या 22 जानेवारीला होणार आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. याच दिवशी रामललांची मूर्ती गाभाऱ्यात स्थापन करण्यात येणार आहे. पण तुम्हाला माहितेय का, जो पर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तो पर्यंत रामललांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असणार आहे. खरंतर प्राणप्रतिष्ठेआधी मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी का बांधली जाते याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर….
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनुसार, प्राणप्रतिष्ठेपूर्वी 17 जानेवारीला मूर्तीचे अनावरण केले जाणार आहे. या दिवशी भाविकांना रामलालांची मूर्ती पाहायला मिळणार आहे. यासाठी अयोध्येत एक रॅली देखील काढली जाणार आहे. या दिवशी मूर्तीचे फोटो, व्हिडीओ काढण्यास नागरिकांना परवानगी असणार आहे. पण रॅलीदरम्यान रामललांच्या मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असणार आहे.
या कारणास्तव बांधली जाते डोळ्यांवर पट्टी
ज्योतिषांनुसार, जेव्हा भक्त देवाचे दर्शन करताना त्याच्या डोळ्यांमध्ये पाहातात. कारण डोळे हे उर्जेचे मुख्य केंद्र असते. येथूनच मनातील भाव देवासमोर व्यक्त केले जातात. याशिवाय रामललांसाठी असे म्हटले गेलेय की, भक्तांनी त्यांच्या डोळ्यांमध्ये खूप वेळ पाहू नये. यामुळेच वारंवार गाभाऱ्याचा पडदा बंद केला जातो. खरंतर देवाच्या मूर्तीच्या डोळ्यांकडे पाहिल्याने एक उर्जा, सकारात्मकतेचा अनुभव येतो.
रामललांची मूर्ती आहे खास
रामललांची राम मंदिरात स्थापन करण्यात येणारी मूर्ती अत्यंत खास आहे. असे सांगितले जातेय की, नेपाळच्या नारायणी नदीतील शालिग्राम शिलेपासून मूर्ती तयार करण्यात आली आहे. शालिग्राम भगवान विष्णूंचे मूर्ती स्वरूप आहे आणि प्रभू राम हे विष्णूंचा अवतार आहेत. अयोध्येतील राम मंदिरातील मूर्ती देशातील प्रख्यात शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारली आहे. (Ram Mandir)
दरम्यान, राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला देश-विदेशातील सात हजार व्हीव्हीआयपी उपस्थितीत राहणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय अयोध्येत सध्या राम मंदिराच्या उद्घाटनासाठी जोरदार तयारी होतेच. पण दुसऱ्या बाजूल रामभक्तांना रामललांचे दर्शन घेण्याची फार उत्सुकता लागून राहिली आहे.
राम मंदिराची खासियत काय आहे याबद्दलची माहिती देखील राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर ट्वीट करत माहिती दिली आहे. पाहा हे ट्वीट:
अयोध्या में निर्माणाधीन श्रीराम जन्मभूमि मंदिर की विशेषताएं:
1. मंदिर परम्परागत नागर शैली में बनाया जा रहा है।
2. मंदिर की लंबाई (पूर्व से पश्चिम) 380 फीट, चौड़ाई 250 फीट तथा ऊंचाई 161 फीट रहेगी।
3. मंदिर तीन मंजिला रहेगा। प्रत्येक मंजिल की ऊंचाई 20 फीट रहेगी। मंदिर में कुल… pic.twitter.com/BdKNdATqF6
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) January 4, 2024