Amir Khan and Reena Dutta Love Story : आमिर खान याचा पहिला विवाह रीना दत्ता यांच्यासोबत झाला होता. आमिर आणि रीना यांनी दीर्घकाळ एकमेकांसोबत वैवाहिक नाते टिकवले आणि त्यांना आयरा आणि जुनैद नावाचा एक मुलगा आहे. रीना आणि आमिर खान यांचा घटस्फोट होऊन 21 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. या दरम्यान आमिर खान याची पहिली पत्नी रीना दत्ताला फार कमी वेळा स्पॉट करण्यात आले.
आमिर आणि रीना दत्ता लव्ह स्टोरी
आमिर खान आणि रीना दत्ता यांची लव्ह स्टोरी फार फिल्मी होती. आमिर आणि रीना एकमेकांचे शेजारी होते. दोघेही एकमेकांना खूप वेळ पाहात राहायचे. आमिरने अखेर आपल्या मनातील भावना रीना यांच्या समोर व्यक्त केल्या. पण रीना यांनी त्यावेळी आमिरचे प्रपोजल स्विकारले नव्हते. यानंतर खूप वेळा आमिरने रीना यांनी नात्यासाठी होकार मिळावा म्हणून प्रयत्नही केला. पण तरीही सातत्याने नकार येत होता. जेव्हा आमिरला वाटले नात्यासाठी होकार येणार नाही तेव्हाच रीना यांनी होकार दिला. त्यांनीही आमिरला मी तुझ्यावर किती प्रेम करते अशा भावना त्याच्यासमोर व्यक्त केल्या होत्या.

Amir Khan and Reena Dutta Love Story
आमिर खान आणि रीना दत्ता 16 वर्षे नात्यात होते. दोघांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला आणि आज ते एकमेकांचे चांगले मित्रही आहेत. आजही आमिर आणि रीना यांच्यामध्ये उत्तम नातेसंबंध आहेत. एवढेच नव्हे आमिर खान यांची दुसरी पत्नी किरण राव यांच्यासोबतही रीना यांचे नातेसंबंध उत्तम आहेत. (Amir Khan and Reena Dutta Love Story)
काय करतात रीना दत्ता?
रीना दत्ता या एक फिल्म प्रोड्युसर आहेत. त्यांना लाइमलाइटमध्ये राहणे आवडत नाही. रीना दत्ता यांना चित्रकलेची फार आवड आहे. याशिवाय त्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही ठेवले जाते. याशिवाय आमिर खान सोबत घटस्फोट झाल्यानंतर रीना यांना आयुष्यात अशा सर्व गोष्टी करायच्या आहेत ज्या त्यांना करणे आवडतात.