Home » युक्रेनच्या गुप्तहेर संघटनेच्या प्रमुखाच्या पत्नीवरच विषप्रयोग

युक्रेनच्या गुप्तहेर संघटनेच्या प्रमुखाच्या पत्नीवरच विषप्रयोग

by Team Gajawaja
0 comment
Ukraine
Share

केबीजी,  अर्थात रशियाची गुप्तहेर संघटना.  जगामध्ये ज्या काही घातक गुप्तहेर संघटना आहेत त्यामध्ये केबीजीचे नाव अग्रेसर आहे.  एकसंघ रशिया असतांना परदेशात आणि देशांतर्गतही देशविघातक हालचालींवर लक्ष ठेवणे हे या केबीजीचे प्रमुख काम होते.  आपल्या अनेक शत्रूंना या केबीजीनं अतिशय निर्दयपणे संपवलं आहे. रशियाचे तुकडे झाल्यावरही ही संघटना तेवढ्याच कार्यक्षणपणे काम करत आहे. (Ukraine)

रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन हेही या संघटनेत काही काळ काम करत होते.  आता केबीजी पूर्णपणे त्यांच्याच नियंत्रणात काम करत आहे.  आपल्या कुठल्याही शत्रूला केबीजी सोडत नाही.  फक्त शत्रूच कशाला शत्रूच्या कुटुंबियांनाही संपवण्यात केबीजीचा पुढाकार असतो.  याचाच एक भाग म्हणून केबीजीचे नाव नव्यानं घेतलं जात आहे. 

रशिया आणि युक्रेनमधील युद्धामध्ये युक्रेननं रशियापुढे माघार घेतलेली नाही.  या सर्वामागे युक्रेनची भक्कम गुप्तहेर संघटना असल्याचे बोलले जाते.  याच युक्रेनच्या गुप्तहेर संघटनेच्या प्रमुखाच्या पत्नीवरच विषप्रयोग झाला आहे.  याशिवाय युक्रेनचे गुप्तहेर प्रमुखांच्या कार्यालयातील अनेक  कर्मचा-यांवर विषप्रयोग झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे.  यामागे केबीजी ही संघटना असल्याची चर्चा सुरु झाली आहे.  (Ukraine)

रशिया-युक्रेन युद्धात महत्वाची भूमिका आहे ती युक्रेनच्या गुप्तहेर संघटनेचे प्रमुख लेफ्टनंट जनरल किरिल बुडानोव यांची.  रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांचे एक नंबरचे शत्रू म्हणून किरिल बुडानोव यांचे नाव घेण्यात येते.  याच किरिल यांच्या पत्नीवर विषप्रयोग झाला आहे.  किरिल यांच्या पत्नी मारियाना बुडानोवा यांच्या व्यतिरिक्त, युक्रेनची गुप्तहेर संघटना जिथून कामकाज करते, तेथील अनेक कर्मचा-यांच्या शरीरात विष आढळले आहे.  हे सर्वजण गुप्तहेर म्हणून काही आघाड्यांवर काम करत होते. या सर्वांवर उपचार करण्यात येत असून मारियाना यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.  

रशिया आणि युक्रेनमध्ये (Ukraine) चालू असलेल्या युद्धाला 21 महिने झाले आहेत.  हे युद्ध सुरु झाले तेव्हा रशियाला सहज युक्रेनवर विजय मिळवता येईल, असे सांगितले जात होते.  मात्र युक्रेननं रशियापुढे हार मानली नाही.  21 महिन्यानंतरही युक्रेन अजिंक्य राहिला आहे.  यामागे युक्रेनियन गुप्तचर संस्थेचे प्रमुख किरिल बुडानोव  यांचे डावपेच असल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय राजकारणात आहे.  त्यामुळे त्यांचा उल्लेख पुतिन यांचे प्रथम क्रमांकाचे शत्रू असा अलिकडे सोशल मिडियावर करण्यात येत आहे.  याच किरिल यांच्या पत्नीला विषबाधा झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यासंदर्भात रॉयटर्सने प्रथम माहिती दिली आहे.  त्यांच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, किरिल बुडानोव यांची पत्नी मारियाना बुडानोवा यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  त्यांच्या शरीरात विषारी धातूच्या खुणा आढळल्या असून अशाच प्रकारचे विष हे केबीजी वापर करीत असल्याचा माहितीही आहे.  त्यामुळे पुन्हा केबीजीचे नाव चर्चेत आले आहे.  

मारियाना यांच्याबरोबरच गुप्तहेर संघटनेच्या कार्यालयातील कर्मचा-यांच्या शरीरातही विषाची मात्रा आढळली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  मारियाना या कीवच्या महापौर विटाली क्लिट्स्को यांच्या सल्लागार आहेत.  त्या युक्रेनच्या पोलीस अकॅडमीत प्राध्यापक म्हणूनही काम करतात.  मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून त्या पोलीस अकादमीत कायदेशीर मानसशास्त्र हा विषय शिकवतात.  कामावर असतांना त्यांची प्रकृती खालावली.  त्यांना प्रचंड वेदना होऊ लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले.  तपासणीअंती त्यांच्या शरीरात अत्यंत सुक्ष्म असे धातूचे कण आढळले आहेत.  त्यानंतर अन्य कर्मचा-यांची तपासणी करण्यात आल्यावर त्यांच्याही पोटातून अशाच प्रकारच्या विषाचा अशं मिळाल्याची माहिती आहे.  मारियाना यांना अन्नातून विष दिल्याचा संशय आहे. (Ukraine)

===============

हे देखील वाचा : अन्यथा न्युयॉर्कला जलसमाधी मिळणार…

रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून मारियाना आपल्या पतीसोबत त्यांच्या कार्यालयामध्येच राहत आहेत.  युक्रेनचे गुप्तहेर प्रमुख असलेले मारियानाचे पती किरिल बुडानोव यांच्या हत्येचे आत्तापर्यंत 10 अयशस्वी प्रयोग झाले आहेत.  मात्र त्यांच्या पत्नीलाच ठार मारण्याचा प्रयत्न झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. युक्रेनच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख लेफ्टनंट जनरल किरिल बुडानोवा यांनी रशियन सैन्याविरुद्ध मोठ्या लष्करी कारवाईचे नेतृत्व केले आहे.  आता त्यांच्या पत्नीवरही असाच हल्ला झाल्यानं खळबळ उडाली आहे.  

सई बने…

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.