थंडीचे दिवस सुरु झाल्यानंतर लोकरीचे कपडे परिधान केले जातात. यामुळे आपले शरीर गरम राहते. पण थंडीच्या दिवसात लोकरीच्या कपड्यांऐवजी बहुतांश महिला कुर्तीसोबत बॉटम जीन्स घालणे पसंद करतात. पण काही महिलांना कळत नाही नक्की कोणत्या स्टाइलची जीन्स त्यांनी कुर्तीवर घालावी. खरंतर जीन्स आणि कुर्तीचे कॉम्बिनेशन उत्तमच आहे. परंतु तुम्हाला थोडं स्टाइलिश दिसायचे असेल तर काही गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. जेणेकरुन तुमची पर्सनालिटी इतरांसमोर उठून दिसेल. (Fashion tips)
लूज जीन्स
तुम्हाला कंम्फर्ट हवा असेल तर ऑफिसमध्ये लूज जीन्ससोबत कॉरपोरेट लूकमध्ये दिसून येऊ शकता. यासाठी तुम्हाला सिंपल चिकनकारी कुर्ता यावर कॅरी करावा लागेल. तसेच स्लिंग बॅग, कोल्हापूरी चप्पल अथवा फ्लॅट चप्पल कॅरी करु शकता. यामुळे एक उत्तम लूक येईल. केसांच्या स्टाइलकडे देखील लक्ष द्या. हायपोनीटेल किंवा बन यावर सूट करेल. ऑक्सिडाइज्ड किंवा सिल्वर ज्वेलरीने तुमचा लूक कंम्प्लिट करु शकता.
फिटेड जीन्स
फिटेड जीन्स चुडीदार आणि सिरगेट पॅन्टचा लूक देतात. जर तुम्ही अशी जीन्स सॉलिड कुर्त्यासोबत घातली तर यासोबत कोटी किंवा श्रग कॅरी करत असाल तर हा लूक परफेक्ट आहे. याव्यतिरिक्त तुम्ही ए लाइन कुर्ताही घालू शकता.
रिप्ड जीन्स
तुम्हाला रिप्ड जीन्स घालणे आवडत असे तर यासोबत असिमेट्रिकल पॅटर्न उत्तम दिसतील. याव्यतिरिक्त फ्रंट स्लिट ओपन कुर्ती सोबतही रिप्ड जीन्स वेअर करु शकता. (Fashion tips)
बेलबॉटम आणि फ्लेयर जीन्स
आजकाल बेलबॉटम आणि फ्लेयर जीन्सचा ट्रेंड सुरु आहे. तुम्ही देखील अशी जीन्स घालण्याचा विचार करत असाल तर यावर शॉर्ट कुर्ती छान दिसेल. तसेच शॉर्ट कुर्तीमध्ये कंम्फर्टेबल नसाल तर त्यावर जॅकेटही कॅरी करु शकता.
हेही वाचा- ऑफिसला जाताना बॅगेत असाव्यात ‘या’ गोष्टी