प्रत्येक वर्षी मिस युनिव्हर्सचा ताज कोण जिंकणार याची सर्वांना उत्सुकता असते. यंदा ही स्पर्धा अल सेल्वाडोर येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जगभरातून ९० देशातील सौंदर्यवतींनी भाग घेतला होता. याचे आता निकाल सुद्धा नुकतेच जारी झाली असून निकारागुआची शेन्निस पलासियोसला मिस युनिव्हर्सचा क्राउन घातला गेला. (Miss Universe 2023)
तर थायलँन्ड मधील मॉडल एन्टोनिया पोर्सिल्डला फर्स्ट रनर अप आणि ऑस्ट्रेलियातील मोरया विल्सनला सेकेंड रनर अपच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. खरंतर ही स्पर्धा अल सेल्वाडोरमध्ये १८ नोव्हेंबरला रात्री उशिरा ठेवण्यात आली होती. पण भारतीय वेळेनुसार याचे निकाल १९ नोव्हेंबरला सकाळी समोर आले.
View this post on Instagram
कोण आहे शेन्निस पलासियोस?
मध्य अमेरिकेतील सर्वाधिक मोठ्या देशांमधील एक निकारागुआला झरे आणि ज्वालामुखींसाठी ओळखले जाते. मात्र याला आता नवी ओळख शेन्निस पलासियोसने दिली आहे. शेन्निस एक नकारागोओन मॉडल असून तिने आपल्या देशाला पहिल्यांदा मिस युनिव्हरर्सच्या स्पर्धेत जिंकून दिले आहे.
याआधी शेन्निस पलासियोस मिस वर्लड निकारागुआ २०२० मध्ये सुद्धा जिंकली होती. खरंतर मिस युनिव्हर्स स्पर्धेत निकारागुआ मधील सौंदर्यवती आधी सुद्धा ५ वेळा सेमीफाइनल पर्यंत पोहचल्या होत्या. पण पहिल्यांदाच या स्पर्धेत जिंकत शेन्निस पलासियोसने आपल्या देशाचे नाव उंचावले आहे.
शेन्निस पलासियोसने सेंट्रल अमेरिकन युनिव्हर्सिटीमधून मनागुआ मधून मास कम्युनिकेशनची डिग्री घेतली आहे. आपल्या कॉलेजमध्ये ती वॉलीबॉल खेळायची. अशा प्रकारे म्हणू शकतो ती एक ऑलराउंडर आहे. ब्युटी विद ब्रेन शेन्निसचा जन्म ३१ मे २००० रोजी झाला. तिने २०२१ मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेत टॉप ४० मध्ये सुद्धा होती खरंतर ब्युटी पॅजेंटमध्ये हिस्सा घेण्याची आवड तिला लहानपणापासून होती. यामुळे २०१६ मध्ये शेन्निस मिस टीन निकारागुआ सुद्धा राहिली होती. (Miss Universe 2023)
मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेत मिस इंडिया श्वेता शारदा हिने सुद्धा भाग घेतला होता. पण तिला २०२३ च्या या स्पर्धेत टॉप १० मध्ये क्वालिफाय करता आले नाही. पण टॉप-२० मध्ये पोहचत तिने आपल्या देशाचे नाव राखे. मिस इंडियासोबत मिस पाकिस्तान एरिका रॉबिन सुद्धा मिस युनिव्हर्स २०२३ च्या टॉप-२० पर्यंत पोहचली होती.
हेही वाचा- 300 कोटींचा बिझनेस 8 हजारांवर पोहचवणाऱ्या नादिया चौहान यांची कथा