Home » नागालॅंडच्या सौदर्यापुढे परदेशही फिक्के

नागालॅंडच्या सौदर्यापुढे परदेशही फिक्के

by Team Gajawaja
0 comment
Nagaland
Share

भारताच्या ईशान्येकडील राज्य म्हणजे, नागालॅंड.  या नागालॅंडमध्ये सध्या पर्यटनविषयक अनेक नवे उपक्रम राबवण्यात येत आहेत.  नाताळ सुट्टीमध्ये ज्यांना परदेशाला भेट द्यायची आहे, अशांसाठी नागालॅंड (Nagaland) हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो.  निसर्गानं भरपूर देणगी दिलेले हे राज्य पर्यटकांची राजधानीच आहे.  नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागालॅंडही सर्वोत्तम निवड आहे.  या राज्याचा कानाकोपरा सौदर्यानं नटलेला आहे.  लहानश्या या राज्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत.  त्यातही डिसेंबर महिन्यात येथे स्थानिकांचा उत्सव असतो.  यानिमित्त नागालॅंडची संस्कृती बघण्याची संधी मिळते.  तसेच येथील हस्तकलाही सुंदर आहे.  कलाकुसरीच्या अनेक वस्तुही येथे मिळतात.  या सर्वांचा लाभ घ्यायचा असेल तर नागालॅंडला एकदा तरी भेट द्यायला हवी.  

नागालँडची (Nagaland)राजधानी कोहिमा हे पर्यटकांचे आवडते स्थळ आहे. निसर्गाच्या कुशीत असलेल्या या कोहिमाच्या अनेक भागांना पर्यटक भेट देऊ शकतात.  येथेच दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्या सैनिकांचे स्मारक आहे.  त्याला कोहिमा वॉर मेमोरियलम्हणतात. कोहिमा मार्केट देखील खूप लोकप्रिय आहे.  यामध्ये नागा नागरिकांनी हातांनी तयार केलेल्या वस्तू मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आहेत. येथेच हॉर्नबिल फेस्टिव्हल मोठ्या प्रमाणात आयोजित केला जातो.  नागालँडमधील अनेक प्रसिद्ध सणांपैकी हा सण आहे. दरवर्षी डिसेंबरमध्ये साज-या होणा-या या उत्सवाला जगभरातील नागरिक गर्दी करतात.  यावेळी नागालॅंडमधील अनेक जमाती एकत्र येऊन गाणी, नृत्य आणि अनेक खेळ सादर करतात.  

इंतांकी वन्यजीव अभयारण्य हे नागालँडमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथे अनेक प्रकारचे दुर्मिळ प्राणी बघायला मिळतात. ब्लिथ्स ट्रॅगोपन पक्षी देखील या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात आहेत.  नागालँडचे घोषो पक्षी अभयारण्यातही लोकप्रिय आहे.  झुन्हेबोटो जवळ असलेल्या या अभयारण्यात अनेक दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात.  तसेच रंगपहाड अभयारण्यही प्रसिद्ध आहे.  यात पक्षांसह प्राणीही मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात.  नागालँडमधील दिमापूर हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. 

तर लोंगवा हे गाव जगातील सर्वांत सुंदर गाव म्हणून ओळखले जाते.  हे गाव मोन जिल्ह्यात आहे. हे गाव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने परदेशी पर्यटकही येतात. या गावातील निम्मा भाग नागालँडमध्ये आणि निम्मा भाग म्यानमारमध्ये आहे.  निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावात नद्या, तलाव, धबधबे आणि डोंगर आहेत.  याशिवाय ओफेमा हे गावही सुंदर गाव म्हणून ओळखले जाते.  या गावात मोठ्या संख्येनं पर्यटक रहाण्यासाठी येतात.  ज्यांना शहराच्या धावपळीपासून काही दिवस दूर रहायचे आहे, त्यांच्यासाठी हे ओफेमा गाव सर्वोत्तम पर्याय आहे. (Nagaland)

या गावातील नागा लोकांनी बांधलेल्या सुंदर झोपड्या पर्यटकांना आकर्षीत करतात. येथे स्थानिक नागा नागरिक पर्यटकांसाठी खाद्यपदार्थही उपलब्ध करुन देतात.  या स्थानिक खाद्यपदार्थांची चव आणि नागा जीवनशैली बघण्यासाठी  पर्यटक गर्दी करतात. तसेच ओफेमा गावातील पारंपारिक शेतीही प्रसिद्ध आहे.  डोंगर कड्यावर होणा-या या शेतीनं या गावाच्या सौदर्यात अधिक भर पडते.  ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे, त्यांच्यासाठी हे गाव मोठे वरदान आहे.  खोनोमा गाव हे नागालँडमधील गाव आपल्या संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे.  या गावाने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात खूप योगदान दिले आहेया गावाला हुतात्म्यांचे गाव देखील म्हटले जाते.  येथील प्रत्येक घरात सैनिक आहेत.   

याशिवाय मोकोकचुंग हे नागालँडच्या (Nagaland) प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. मोकोकचुंग हे लहान शहर आहे.  येथील हस्तकला जगप्रसिद्ध आहे.   किफिरे येथील धबधबे प्रसिद्ध आहे.  ज्यांना ट्रेकींगची आवड आहे, त्यांच्यासाठी किफिरे उत्तम आहे.  येथील सरमती धबधबा प्रसिद्ध आहे.  शिवाय सारा माती नावाचा धबधबाही प्रसिद्ध आहे. 

शिल्लोई हे नैसर्गिक तलाब बघण्यासाठीही मोठी गर्दी असते.  हा तलाव जंगलांनी वेढलेला आहे.  येथील वातावरण नयनरम्य असून या भागात पर्यटकांच्या रहाण्यासाठी चांगली व्यवस्था आहे.  पिक नावाच्या शहराजवळ असलेल्या या तलावाभोवती मोठा पिकनिक स्पॉट आहे.  या तलावात बोटिंगही करता येते. 

============

हे देखील वाचा : मध गरम करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक

===========

याशिवाय नागालॅंडमध्ये (Nagaland) मौन या पर्यटनस्थळी नागा लोकांची अतिशय सुबक घरे आहेत.  पुली बॅज या टेकडीवरून आजुबाजुच्या निसर्गाचा आस्वाद घेता येतो.  तुएनसांग हे चांग जमातीचे निवासस्थान आहे.  त्यांच्या जीवनशैलीला पहाण्याची संधी पर्यटकांना मिळते.  पर्यटकांसाठी येथे खाद्यमहोत्सवही होतो.  हा सगळाच परिसर नितांत सुंदर आहे.

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण परदेशाचा पर्याय स्विकारतात.  अशावेळी आपल्याच देशातील नागालॅंड या सौदर्यानं नटलेल्या राज्याला भेट दिल्यास सुट्टीच्या आनंदासह निसर्गाच्या सहवासात राहिल्याचा आनंदही मिळेल.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.