आजकाल प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्याबद्दल अलर्ट झाला आहे. सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्यासाठी थोडावेळ काढणे मुश्किल झाले आहे. आरोग्याची योग्य काळजी घेण्यासाठी सर्वात प्रथम महत्त्वाचे म्हणजे घरी तयार केलेले ताज पदार्थ खाणे. यामुळे आपण बहुतांश आजारांपासून दूर राहतो. आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढली जाते. पण घरातील अन्नपदार्थामुळे तुम्ही हेल्दी राहताच. परंतु कोणत्या प्रकारचे फूड्स खात आहात हे पाहणे सुद्धा फार महत्त्वाचे आहे. आपल्या किचनमध्ये असे काही पदार्थ असतात ज्यामुळे आपले वजन वेगाने वाढते आणि शरीराला आतमधून हळूहळू पोकळ बनवते. सर्वसाधारण दिसणाऱ्या पुढील काही फूड्सचे प्रमाण आपल्या किचनमध्ये कमी केले तुम्ही तंदुरुस्त नक्कीच राहू शकता. (Weight Control Tips)
मैदा
मैद्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थ खायला टेस्टी असतात. पण ते आरोग्याला नुकसान पोहचवतात. मैदा तयार करण्यासाठी पीठ खुप वेळ बारीक केले जाते. या प्रक्रियेदरम्यान पीठातील काही प्रकारचे पोषक तत्त्वे दूर होतात. फायबरच यामध्ये नसल्याने शरीराला तो खाणे घातक ठरू शकतो. अशातच वेगाने वजनही वाढते. प्रयत्न करा की, मैद्याच्या पीठाऐवजी अन्य पीठांचा आपल्या फूड्समध्ये समावेश करावा.
व्हाइट शुगर
गोड पदार्थ खाणे प्रत्येकालाच आवडते. गोड खाण्यासाठी आपण विविध कारणे शोधून काढतो. लग्नसोहळा असो किंवा एखाद्याचा वाढदिवस, गोड पदार्थ नक्कीच आपण खातो. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्ती सुद्धा गोड पदार्थ आवडीने खातात. पण गोड पदार्थांसाठी वापरली जाणारी व्हाइट शुगर आपली एनर्जी कमी करते. त्याचसोबत इंन्सुलिचे प्रमाण दुप्पट होते. याच कारणास्तव आपल्या शरीरातील वसाचे प्रमाण दिवासगणिक वाढते आणि तुम्ही वाढलेल्या वजनावर कंट्रोल करु शकत नाहीत. व्हाइट शुगर ऐवजी तुम्ही ब्राउन शुगर किंवा गुळाचा वापर करू शकता. जर तुम्हाला नैसर्गिक पर्याय हवे असतील तर खजूर किंवा मधाचा वापर जरूर करा. (Weight Control Tips)
मेयोनीज
आजकाल लहान मुलांना मेयोनीज फार आवडते. सँन्डविच असो किंवा पराठा त्याला मेयोनीज लावून ते खातात. पण मेयोनीज खाल्ल्याने सुद्धा आरोग्याचे नुकसान होते. याचे सातत्याने सेवन केल्याने वेगाने वजन वाढू लागते. यामध्ये असलेले फॅट आपल्या शरीरातील उर्जा कमी करते आणि फॅट सेल्स वाढवते. वजन वाढण्यासह याचा आपल्या हृदयावरही परिणाम होतो. उच्च रक्तदाबाची समस्या वाढू लागते.
हेही वाचा- सणासुदीला गोड पदार्थ खाऊनही बर्न करू शकता कॅलरी