पार्टनरसोबत डेटवर सर्वजण जातात. पण कधी कोणी एकट्याने डेटिंगवर जाताना तुम्ही पाहिलेय का? खरंतर याचे उत्तर हो आहे. एकट्याने डेटवर जाण्याला मास्टरडेटिंग असे म्हटले जाते. सध्या याचा ट्रेंन्ड सोशल मीडियात फार आहे. सोलो डेटिंगला फॉलो करत बहुतांश लोक याचा आनंद घेत आहेत. त्याचसोबत आपला अनुभव एकमेकांसोबत शेअरही करत आहेत. (Solo Dating)
मास्टरडेटिंगचे फोटो सोशल मीडियात शेअर करत लोक एकमेकांना सोलो डेटिंग कशा पद्धतीने एन्जॉय करत आहेत हे सांगत आहेत. अशातच मास्टरडेटिंग म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊयात.
मास्टरडेटिंग म्हणजे काय?
रिलेशनशिप एक्सपर्ट्स असे म्हणतात की, स्वत:सोबत स्वत: क्वालिटी टाइम स्पेंड करणे. स्वत:ला जाणून घेणे आणि समजून घेण्याचा प्रयत्न करण्याला मास्टरडेटिंग असे म्हटले जाते. या सोलो डेट दरम्यान लोक एकट्याने फिरायला जातात, स्वत:ला ट्रिट देतात, गिफ्ट देतात. त्याचसोबत आपल्यामधील लपलेल्या गुणांबद्दल विचार करतात. मास्टरडेटिंचा हा ट्रेंन्ड ब्रिटेन आणि अमेरिकेसह अन्य काही देशांमध्ये फार वाढत चालला आहे.
याचा अर्थ असा ही होतो की, मी टाइमची मजा घेणे आणि स्वत: बद्दलच्या काही गोष्टी जाणून घेण्याची संधी मिळते. लोकांना आपल्यामधील आवड अधिक कळू लागते. लोकांनी अशा डेटवर जरुर जावे असा सुद्धा आता रिलेशनशिप एक्सपर्ट्स सल्ला देत आहेत. मास्टरडेटिंग अशी एक गोष्ट आहे याचा वापर करून तुम्ही एकट्यात क्वालिटी टाइम स्पेंड करणे, स्वत:ची काळजी घेणे आणि स्वत:चीच स्वत:ला असलेली साथ एन्जॉय करणे. (Solo Dating)
डेटिंग विशेतज्ञ असे ही म्हणतात की, या दरम्यान आपल्या इच्छा, गरजा आणि त्या गोष्टींबद्दल विचार करणे, समजून घेणे ज्यामधून तुम्हाला आनंद मिळतो. तुमच्यामधील हिडन टॅलेंन्ड शोधण्याचा हा उत्तम पर्याय आहे. तर मास्टरडेटिंगचा ट्रेंन्ड फॉलो करताना अधिक काही विचार करणे, त्रास करून घेणे किंवा अलर्ट राहण्याची गरज नाही. केवळ विचार न करता सोलो डेटिंगची मजा घेता येऊ शकते. जेव्हा तुम्ही स्वत:वर प्रेम करता तेव्हा दुसऱ्या व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल. खरंतर मास्टरडेटिंगचा ट्रेंन्ड जगभरात वाढला आहे. लोक या संदर्भातील आपले व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात शेअर करत आहेत.
हेही वाचा- ‘हे’ संकेत सांगतात तुम्ही चुकीच्या नात्यात आहात