लेदरचे सामान तुमचा लूक पूर्णपणे बदलतात. त्यामुळे महागड्या सामानाची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे असते. बॅग ते शूज हे लेदरचे असतील तर त्याची काळजी घ्यावी. अन्यथा त्याची चमक कालांतराने निघून जाते. खरंतर चामडे हे गरम असते. यामुळे थंडीपासून दूर राहण्यास मदत होते. लेदरच्या वस्तू सुंदर दिसण्यासह त्या अधिक टिकाऊही असतात. पण त्याची व्यवस्थितीत काळजी घेतली नाही तर ते लवकर खराब होतात.अशातच लेदरच्या वस्तूंची काळजी कशी घ्यायची याच बद्दलच्या काही टिप्स आपण पाहणार आहोत.(Leather items care)
जॅकेटची अशी घ्या काळजी
-एक उत्तम क्वालिटीचे लेदर जॅकेट आरामदायी असते. त्याचसोबत ते स्टाइलिशही दिसते. त्यामुळे महागडे कपडे कपाटात ठेवताना काही गोष्टींची काळजी घ्यावी. जर जॅकेट सॉफ्ट नसेल तर लेदर कंडीशनरने ते पॉलिश करावे आणि नंतर कपाटात ठेवावे. जेणेकरुन यामधील ड्रायनेस दूर होते.
-पावसाळ्यात जर लेदरचे जॅकेट भिजले तर ते हँगरला लावून ठेवा. व्यवस्थितीत सुकवा.
-लेदर दीर्घकाळ वापरले नाही तर त्याल फंगस लागू शकते. यामुळे जॅकेटला फंगस लागण्यापूर्वी ते अँन्टीबायोटिक लिक्विडने पुसावे. नंतर त्यावर कंडीशनर लावावे. लक्षात ठेवा त्यात पाणी मिक्स करू नये.
-थंडीच्या दिवसात लेदरचे जॅकेट जरुर वापरावे. जेणेकरुन त्याला हवा लागेल.
-लेदरचे जॅकेट प्लास्टिकच्या बॅगेत ठेवू नये. अन्यथा ते खराब होऊ शकते.
लेदरच्या बॅगची अशी घ्या काळजी
-लेदरची फॅशन फार जुनी होत नाही. जेव्ह लेदरच्या वस्तूंबद्दल बोलले जाते तेव्हा बॅग्सचा समावेश केलाच जातो.
-लेदर बॅग लवकर खराब होतात. त्यामुळे ते काही दिवसांमध्ये पुसत रहा. तुम्ही बॅग लेदरच्या कंडीशनरने सुद्धा पॉलिश करू शकता.
-जर बॅगेवर डाग लागले असतील तर त्यावर पावडर लावा. रात्रभर पावडर त्यावर ठेवा. त्यानंतर ती स्वच्छ करा.
-बॉडी ऑइल, बॉडी लोशन किंवा अन्य सौंदर्य प्रसाधनच्या संपर्कात लेदरच्या वस्तू आणू नये. त्यामुळे त्या लवकर खराब होतात.
-लेदरच्या बॅगेत अधिक सामान भरू नका जेणेकरून बॅगचा शेप बिघडला जाईल. (Leather items care)
शूजची अशी घ्या काळजी
-जेव्हा तुम्ही लेदरचे शूज घालता तेव्हा ते कधीकधी दुमडले जातात. या प्रकरणी ते व्यवस्थितीत राहतील याची काळजी घ्यावीच. लेदरचे शूज पॉलिश करण्यापूर्वी आधी रात्रभर त्यावर क्रिम लावून ठेवावी. लक्षात ठेवा ज्या शू पॉलिशचा वापर करत आहात ती वॅक्सची असेल.
-जर शूज ओलसर झाले असतील तर ते टिश्यू पेपरने झाकावेत. नंतर खोलीत पंख्याखाली सुकण्यासाठी ठेवावे. त्यांना उन्हात अजिबात सुकवू नयेत. असे केल्याने लेदर खराब होते.
-लेदरचे शूज कधीच पाण्याने धुवू नका.
हेही वाचा- चिकनकारी एंब्रॉयडरी अशी ओळखा