Home » Pig Butchering स्कॅम नक्की काय आहे?

Pig Butchering स्कॅम नक्की काय आहे?

जेरोधाचे सीईओ निखिल कामथ यांनी एका नव्या स्कॅमबद्दल लोकांना इशारा दिला आहे. त्यांनी आपला पॉडकास्ट WTF मध्ये याचा उल्लेख केला आहे. हा कोणता स्कॅम नसून लोकांची फसवणूक करण्याचे एक नवे माध्यम आहे.

by Team Gajawaja
0 comment
pig butchering scam
Share

जेरोधाचे सीईओ निखिल कामथ यांनी एका नव्या स्कॅमबद्दल लोकांना इशारा दिला आहे. त्यांनी आपला पॉडकास्ट WTF मध्ये याचा उल्लेख केला आहे. हा कोणता स्कॅम नसून लोकांची फसवणूक करण्याचे एक नवे माध्यम आहे. निखिल कामथ यांनी याला ‘पिग बुचरिंग’ स्कॅम असे म्हटले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, याच्या माध्यमातून हजारो-कोट्यावधींची फसवणूक करण्यात आली आहे. यामध्ये फसवणूकदार व्यक्तीचा विश्वास संपादन करतो आणि त्यानंतर त्याची पैशांवरुन फसवणूक करतो. (Pig Butchering Scam)

पिग बुचरिंग स्कॅमचे काही प्रकार आहेत. जसे की, फेक जॉब ऑफर स्कॅम, फेक क्रिप्टो इन्वेस्टमेंट स्कॅन आणि धमाकेदार रिटर्न मिळणार असल्याचा दावा करणारी गुंतवणूक. यामध्ये फसवणूकदार प्रथम पीडित व्यक्तीचा विश्वास मिळवतो आणि त्याचा नंतर गैरफायदा घेतला जातो. हे अशा पद्धतीने होते जसे की, डुकराची कत्तल करण्यापू्र्वी त्याला जसे खुप-खायला प्यायला दिले जाते तसे हे आहे.

How scammers use psychology to create some of the most convincing internet  cons - Alternet.org

कामथ असे सांगतात की, फसवणूकदार समोरच्या व्यक्तीचा विश्वास मिळवण्यासाठी त्याच्याशी मैत्री आणि प्रेमाची मदत घेतात. त्यानंतर नोकरी, धमाकेदार रिटर्न्सचा दावा करत पैसे पाठवण्यास तयार करतात. ही फसवणूक हळूहळू जागतिक स्तरावर वेगाने वाढत चालली आहे. काही वेळेस लोकांना नोकरीची ऑफर देऊन परदेशात बोलावले जाते. जेव्हा लोक तेथे पोहचतात तेव्हा त्यांना कळते आपल्यासोबत फसवणूक झाली आहे. असे झाल्यानंतर पीडित व्यक्तीकडे दुसरा कोणता ऑप्शन शिल्लक नसल्याने त्याला सुद्धा हे काम करण्यास मनवले जाते. काही वेळेस फसवणूकदार मुलगा अथवा मुलीचे फेक अकाउंट तयार करूनही लोकांची फसवणूक करतात. (Pig Butchering Scam)

असे रहा दूर
-मेसेंजिग अॅप आणि सोशल मीडियात येणाऱ्या नोकरीच्या ऑफरवर विश्वास ठेवू नका
-परदेशातील लिंक डाउनलोड किंवा क्लिक करू नका
-कोणताही निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा
-कधीही ओटीपी किंवा आधार कार्ड क्रमांक अथवा संवेदनशील माहिती अज्ञात व्यक्तीला सांगू नका
-जर एखादी गोष्ट तुम्हाला पटकन मिळत असेल तर लगेच त्यावर विश्वास ठेवू नका


हेही वाचा- सोन्यापेक्षा सापाचे विष महागडे, 1 ग्रॅमची किंमत ऐकून व्हाल हैराण


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.