Home » निळ्या केळ्यांची शेती कुठे होते माहितेय का?

निळ्या केळ्यांची शेती कुठे होते माहितेय का?

केळ खाणं आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आपण केळ बहुतांशवेळा कच्च किंवा पिकलेले खातो. पिकलेल्या आणि कच्च्या केळ्यांचा एक वेगळा रंग असतो.

by Team Gajawaja
0 comment
blue banana
Share

केळ खाणं आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आपण केळ बहुतांशवेळा कच्च किंवा पिकलेले खातो. पिकलेल्या आणि कच्च्या केळ्यांचा एक वेगळा रंग असतो. परंतु तुम्ही कधी निळ्या रंगांच्या केळ्यांबद्दल ऐकले आहे का? खरंतर याची शेती सुद्धा केली जाते. निळ्या रंगाची केळी हा केळ्यांचा एक विशेष प्रकार असून त्याची चवही पूर्णपणे वेगळी असते. (Blue Banana)

निळ केळं ज्याला ‘ब्लू जावा बनाना’ किंवा ‘आइस्क्रिम बनाना’ असे सुद्धा म्हटले जाते. ज्याचा रंग आणि चव अत्यंत खास असते. याला निळ्या रंगाच्या सालीवरुन निळं केळं असे म्हटले जाते. हे केळ भारतात तर नाही पण जगातील काही देशांमध्ये आढळते. खासकरून दक्षिण अमेरिकेत ते उगवले जाते. निळ्या रंगातील केळ आपल्या चवीसाठी फार फेमस आहे. हवाई बेटावर निळं केळ फार प्रसिद्ध आहे. तेथे त्याला आइस्क्रिम बनाना असे म्हटले जाते.

Blue Banana Makes Netizens Go Crazy And It Tastes Just Like Vanilla  Icecream - Wanna Try?

निळ्या रंगाच्या केळ्याची चव गोड आणि मलाइदार असते.त्यामुळेच याला आइस्क्रिम बनाना म्हटले जाते. याची चव वास्तविकरित्या आइस क्रिम सारखी असते. या केळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट ,पोटॅशिअम, लोह सारखी पोषण तत्त्वे असतात. जी हाड आणि आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात.

निळ्या रंगाच्या केळ्यात फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारली जाते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते. या व्यतिरिक्त हाडं या केळ्यांमुळे बळकट होतात. निळ्या रंगाच्या केळ्यात अँन्टिऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. जे कॅन्सर विरुद्ध लढण्यास मदत करू शकतात. तसेच यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी6 मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.(Blue Banana)

एका संशोधनात असे समोर आले आहे की, निळ्या रंगाच्या केळ्याचे सेवन केल्याने तुम्ही स्ट्रेस पासून दूर राहता. हे केळ अमेरिकेतील काही ठिकाणासह फिजीमध्ये सुद्धा मिळते.फिलिपिन्स मध्येही मिळते. निळ्या रंगाचे झाडं 6 मीटर पर्यंत लांब असते. हे केळी उगवण्यासाठी 2 वर्षांचा वेळ लागतो. या केळ्याचा वापर करुन आइस्क्रिम, स्मूदी आणि काही प्रकारच्या डेटर्जमध्ये केला जातो.


हेही वाचा- शुगर डिटॉक्सचे ‘हे’ आहेत फायदे

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.