हेल्थ इंन्शोरन्स प्रत्येक व्यक्तीची गरज बनला आबे. कोरोनाच्या संकटानंतर याचा अधिक वापर केला जात आहे. परंतु मेडिक्लेम धारक अशावेळी चिंतेत येतात जेव्हा कंपन्या नियमांचा हवाला देत क्लेम नाकारतात. असाच एक नियम आहे, रुग्णालयात २४ तासात भर्ती होण्याचा. त्याशिवाय कोणताही मेडिकल क्लेम करू शकत नाही.अशातच बीमा नियामकांनी यामध्ये बदल केला आहे. (Medical Claim)
IRDAI यांनी असे म्हटले आङे की, आता मेडिकल इंन्शोरन्समध्ये क्लेम हवा असेल तर २४ तासात रुग्णालयात भर्ती होणे आवश्यक नाही. यासाठी बीमा कंपन्यांनाना वेगळी सूट द्यावी लागणार आहे. हा क्लेम डे-केअर ट्रिटमेंटच्या अंतर्गत दिला जाईल आणि २४ तासात भर्ती झाले नाहीत तरीही तुम्ही तुमच्या बीमा कंपनीकडून क्लेम करू मिळवू शकता. यामुळे बीमा धारकांना मोठा फायदा होणार आहे.
IRDAI ने रुग्णालयात भर्ती होण्याबद्दलचा मुद्दा स्पष्ट करून सांगितला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, खरंतर क्लेमसाठी बीमा धारक रुग्णाला कमीत कमी २४ तास हे रुग्णालयाच्या देखरेखीखाली घालवावे लागणार आहेत. त्यामध्ये काही अपवादांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये डे-केअर नावाने नवी टर्म जोडण्यात आली आहे. या अंतर्गत असे उपचार केले जाणार आहेत ज्यामध्ये एखादी सर्जरी २४ तासांमध्ये पूर्ण झाली असेल किंवा एनस्थीसियाचा वापर केला जाणार असेल अशी स्थिती असेल. अशा प्रकरणी २४ तासांपर्यंत रुग्णालयात भर्ती होणे गरजेचे नाही.
इरडाच्या नव्या नियमांअंतर्गत काही खास उपचार कव्हर करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत कोणताही उपचार ज्यामध्ये एनस्थिसियाचा वापर केला असेल तर त्यामध्ये २४ तास रुग्णालयात घालवले नसतील तरीही क्लेम केला जाऊ शकतो. अशा उपचारात टॉसिलचे ऑपरेशन, किमोथेरेपी,मोतीबिंदूचे ऑपरेशन, साइनसचे ऑपरेशन, रेडियोथेरपी, हिमोडायलिसिस, कोरोनरी एंजियोग्राफी, स्किन ट्रांसप्लांटेशनचे ऑपरेशन याचा समावेश आहे. अशा प्रकारच्या उपचारासाठी आता बीमा धारकाला २४ तास रुग्णालयात भर्ती होण्याची गरज नाही. (Medical Claim)
नुकसान काय होणार
डे-केयर ट्रिटमेंट अंतर्गत बीमा कंपन्या २४ तास रुग्णालयात घालवल्याशिवाय तुम्हाला क्लेम देईल. पण यामध्ये बीमा धारकाचे थोडे नुकसान सुद्धा होणार आहे. या नियमाअंतर्गत डॉक्टरच्या सल्ल्याची फीस, टेस्ट आणि तपास असे खर्च समाविष्ट करण्यात आलेले नाहीत. आउट पेशेंट केअयरचा सुद्धा या कॅटेगरीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये काही खर्च कमी करत अन्यचा क्लेम बीमा धारकाला करता येणार आहे.
हेही वाचा- NPS च्या नियमांत बदल, पैसे काढण्यापूर्वी करावे लागणार ‘हे’ काम