Home » तुम्हाला पण शिल्पा शेट्टी सारखं फिट राहायचंय? मग तिने सांगितलेली ‘ही’ योगासने नक्की पहा…

तुम्हाला पण शिल्पा शेट्टी सारखं फिट राहायचंय? मग तिने सांगितलेली ‘ही’ योगासने नक्की पहा…

by Correspondent
0 comment
Shilpa Shetty | K Facts
Share

बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि आरोग्याबाबत जागरूक सेलिब्रिटींची यादी पाहिली तर, अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. ती अनेकदा आपल्या चाहत्यांना फिटनेस टिप्स देत असते. असे आहेत सोशल मिडियावरचे तिचे सल्ले…

शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) एकाहून एक हिट चित्रपट दिले. तिने धडकन, रिश्ते, गर्व, मैं खिलाडी तू अनाडी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने मोठ्या पडद्यानंतर छोट्या पडद्यावर देखील तिचे प्रस्थ निर्माण केले आहे. सुपर डान्सरमधील ‘सुपर से उपर’ बोलण्याची तिची अदा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. शिल्पा शेट्टी कुंद्राने आपल्या फिटनेसमुळे सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्रींना टक्कर दिली यात काही शंका नाही. ती स्वतःला तंदुरुस्त ठेवतेच शिवाय लोकांना फिटनेसविषयी जागरूक करते.

Happy Birthday Shilpa Shetty Kundra
Happy Birthday Shilpa Shetty Kundra

कोरोना काळात ताणतणाव कमी करण्यासाठी तसेच या काळात घरातून काम करताना आपण काही सोपे व्यायाम प्रकार करू शकता. या व्यायामांमुळे आपल्याला दिवसभराची ऊर्जा देखील मिळेल. बॉलिवूडची ‘फिट अँड फाईन’ अभिनेत्री शिल्पा शेट्टी स्वत:ला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम आणि योगासन करते. सोशल मीडियावर फिटनेस व्हिडीओ शेअर करताना शिल्पा सांगते, ‘स्वत:ला निसर्गाशी जोडणे हे माझे एकमेव ध्येय आहे. स्वत:ला तणावापासून दूर ठेवण्यासाठी स्वच्छ हवेत श्वास घेणे आणि व्यायाम करणे महत्त्वाचे आहे’.

अलीकडेच शिल्पाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती योगाची 3 वेगवेगळी आसने करताना दिसली आहे. ही आसने आहेत :

1- एक हस्त उत्थान चतुरंग दंडासन (Low Plank Pose)

2- वशिष्ठासन (Side Plank Pose)

3- उत्थान चतुरंग दंडासन (Plank Pose)

आपला व्हिडीओ इंन्स्टाग्रामवर शेअर करताना शिल्पाने लिहिले की योगाच्या या आसनांचे सामर्थ्यवान संयोजन मनगट, हात आणि खांदे यांना बळकटी देण्यास मदत करतात. ही आसने कोर स्ट्रेन्थ निर्माण करतात आणि शरीराचे संतुलन राखण्यास मदत करतात. यामुळे व्यक्तीची एकाग्रता सुधारते आणि हातांना टोन करण्यास देखील मदत करते. ही अशी योगासने (Yoga) आहेत, जी संपूर्ण शरीरावर प्रभावीपणे कार्य करतात.

योगाच्या या आसनांच्या फायद्यांविषयी-

उत्थान चतुरंगा दंडासन आणि एक हस्त उत्थान चतुरंग दंडासन या दोन्ही आसनांमुळे तुमच्या मणक्याचे हाड बळकट होते आणि मेरुदंडाच्या दोन्ही बाजूंच्या स्नायूंवरही चांगले परिणाम दिसून येतात. यासह हे आसन बेली फॅट कमी करण्यामध्येही मदत करते. हे योगासन शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्याच वेळी वसिष्ठासनाबद्दल बोलायचे तर हे आसन आपल्या पोटावर, तसेच हातापायांच्या स्नायूंवर काम करते आणि त्यांना लवचिक बनवण्यात मदत करते. एकंदरीत, ही तिन्ही आसने आपल्या पोटावरील चरबी कमी करून, बॉडी टोन करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

या लोकांनी करू नये हे आसन!

तथापि, कोणताही योगासन करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी, कृपया तज्ञाच्या सल्ला अवश्य घ्या. जर तुम्हाला खांदा, कोपर किंवा मनगटात दुखापत असेल किंवा तुमचा पाय दुखत असेल, तर ही आसने करू नका. ज्या लोकांना ब्लड प्रेशरची समस्या आहे, त्यांनी देखील ही आसने करू नयेत.

सतत स्वत:ला आनंदी ठेवल्याने आपले आरोग्य देखील चांगले राहते. प्रत्येकाने आनंदी राहिले पाहिजे. यामुळे आपण निरोगी राहाल, तसेच तणावापासून दूर राहण्यास मदत होईल.

शब्दांकन – शामल भंडारे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.