चेहऱ्याचे सौंदर्य कायम टिकवून ठेवण्यासाठी महिला काही गोष्टी करतात. स्किनकेअर रुटीन फॉलो करणे ते मेकअप पर्यंत काही ना काही केले जाते. मात्र जर हे प्रोडक्ट्स तुमच्या त्वचेला सूट झाले नाहीत तर त्वचेवर त्याचा परिणाम होतो. एखादी एलर्जी होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही प्रोडक्ट्सचा वापर करण्यावेळी १०० वेळा विचार करावा. जेव्हा स्किनकेअर बद्दल बोलले जाते तेव्हा सर्वात प्रथम आपला चेहरा स्वच्छ करणे फार महत्त्वाचे असते. यामुळे तुमच्या स्किनवरील घाण, अत्याधिक तेल निघून जाते. तुम्हाला फ्रेश वाटते. मात्र काही वेळेस चेहरा धुताना काही चुका करतो. जी तुमच्या स्किनसाठी नुकसानदायक ठरू शकतात. (Skin Care Mistakes)
-चुकीच्या क्लिंजरचा वापर करणे
सर्व क्लिंजर हे एक प्रकारचे नसतात. काही क्लिंजर्समध्ये हार्श केमिकल असतात. जे तुमच्या त्वचेतील नॅच्युरल ऑइल हटवते आणि तुमची स्किन रफ होते. तर काही क्लिंजर मध्ये फार कमी प्रमाणात केमिकल असतात. जे तुमच्या स्किनवरील घाण व्यवस्थितीत काढू शकत नाही. अशातच तुम्ही अशा क्लिंजरचा वापर केला पाहिजे जो तुमच्या स्किन टाइपसाठी अगदी परफेक्ट असेल.
-दीर्घकाळ चेहरा न धुणे
काही लोक अशी असतात जे क्लिंजर किंवा फेस वॉश लावल्यानंतर चेहरा लगेच धुतात. मात्र असे करू नका. तुम्ही कमीत कमी ६० सेकंद तरी हलक्या हाताने मसाज करावा. जेणेकरून फेस वॉश तुमच्या चेहऱ्यावरील घाण स्वच्छ करेल. खासकरून त्या एरियातील जेथे अधिक तेल आहे. जसे की, कपाळ, नाक.
-अधिक गरम किंवा थंड पाण्याने चेहरा धुणे
चेहऱ्यासाठी अधिक गरम किंवा थंड पाण्याचा अजिबात वापर करू नये. जेव्हा अधिक गरम पाण्याने त्वचा स्वच्छ करता तेव्हा त्यामधील नॅच्युरल ऑइल निघून जाते. त्वचा ड्राय होते. जेव्हा तुम्ही थंड पाण्याचा वापर करता तेव्हा त्यावरील घाण निघू शकत नाही. त्यामुळे चेहरा धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.
-अधिक स्क्रब करणे
स्किनवरील डेड सेल्स निघणे अत्यंत गरजेचे असते. अन्यथा तुमच्या नाक आणि हनुवटीच्याजवळ ब्लॅक हेड्स दिसू लागतात. यामुळे एक्सफॉलिएट करणे अत्यंत गरजेचे असते. मात्र तुम्ही अधिक स्क्रब करता तेव्हा त्वचेवर जळजळ निर्माण होते. यामुळे आपल्या त्वचेनुसार स्क्रब घ्या आणि आठवड्यातून २-३ वेळा एक्सफॉलिएट करा. (Skin Care Mistakes)
हेही वाचा- व्हाइडहेड्स दूर करण्यासाठी ‘हे’ करा घरगुती उपाय
-चेहरा व्यवस्थिती न पुसणे
काही लोक चेहरा धुतल्यानंतर तो घाईघाईत पुसतात. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडू शकतात. त्यामुळे चेहरा धुतल्यानंतर तो हलक्या हाताने पुसावा.