हँन्डलूम साड्यांबद्दल बोलायचे झाल्यास तर कांजीवरम साडी ही प्रत्येक महिलेची पसंदी असते. काही अभिनेत्री सुद्धा फंक्शन्स, पार्टीवेळी कांजीवरम साड्या नेसतात. खरंतर ही साडी दिसायला जरी सुंदर असली तरीही त्यामागे कारागिरांना फार मेहनत करावी लागते. त्यामुळेच त्याची किंमत ही अधिक असते. अशातच जर तुम्हाला एखादी कांजीवरम साडी खरेदी करायची असेल तर पुढील काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. खरंतर मार्केटमध्ये हँन्डलूम साड्यांच्या काही कॉपीज मिळतात. अशा साड्यांची किंमत ही मूळ हँन्डलूमच्या साडीप्रमाणे लावून विक्री केली जाते. (Kanjivaram saree)
कांजीवरम साडी ही त्याचा इतिहास आणि खास धाग्यांच्या कारिगिरीसाठी ओळखली जाते. सण असो किंवा एखादा इवेंट कांजीवरम साडीमधील तुमचा लूक अधिक खुलून दिसतो. खरी कांजीवरम साडी कशी ओळखायची याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत.
खरी कांजीवरम साडीच्या रेशमाची ओळख करणे थोडं मुश्किल असतो. या साड्यांसाठी उत्तम क्वालिटीचे रेशम वापरले जाते. यावर अशी काही डिझाइन केली जाते त्यामुळे ती दाण्यास्वरुपात दिसते. तुम्ही त्या साडीला स्पर्श करून ती खरी आहे की नाही हे पारखू शकता.
खरी कांजीवरम साडी ओळखायची असेल तर त्याची एक वेगळीच चमक दिसते. यावर करण्यात आलेले काम अत्यंत बारीक असते. कांजीवरम साडी आकर्षक रंग, चमक आणि त्यावर करण्यात आलेल्या कामामुळे ती ओळखली जाते. जर तुम्ही व्यवस्थितीत पाहिले तर खऱ्या कांजीवरम साडीवर अत्यंत बारीक काम केले जाते. त्यावर मुघलांसंदर्भातील डिझान केले जाते.
या व्यतिरिक्त त्याचा धागा ओळखण्यासाठी तो हलका खेचून पाहू शकता. जर तो ला रंगाचा निघाला तर समजूनजा तुमची कांजीवरम साडी खरी आहे. बनावट कांजीवरम साडीतून सफेद रंगाचे धागे बाहेर येतात. त्याचसोबत दुकानात तुम्हाला ती खरी आहे की बनावट हे लगेच ओळखता येणार नाही. त्यामुळे बनावट साडीचे काही धागे एकत्रित करुन ते बांधा. आता सावधगिरीने ते जाळा. यामधून धूर आल्यानंतर ते लगेच विझवा. जर गंधकासारखा वास आला आणि राख झाल्यास तर ती खरी कांजीवरम असल्याचे मानले जाते. (Kanjivaram saree)
हेही वाचा- बेली फॅट लपवण्यासाठी अशा प्रकारे नेसा साडी
जर तुम्हाला कांजीवरम साडी खरेदी करायची असेल तर कांचीपुरम येथून नक्कीच खरेदी करू शकता. येथील साड्यांवर उत्कृष्ट शिल्पकला, विविध रंग आणि डिझाइन्स ही खुप मिळतील. हे ठिकाणी कांजीवरम साडी खरेदी करण्यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. खास कार्यक्रम, सोहळ्यांसाठी अथवा लग्नसोहळ्यासाठी वधू-वर येथून कांजीवरम साडी घेणे पसंद करतात.