Home » इंडोनेशियातील भगवान विष्णुचे भव्य रुप

इंडोनेशियातील भगवान विष्णुचे भव्य रुप

by Team Gajawaja
0 comment
Indonesia
Share

इंडोनेशिया (Indonesia) हा असा देश आहे, जिथे जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या आहे.  या देशाची राजधानी जकार्ता असून इंडोनेशिया हा पर्यटनासाठी लोकप्रिय आहे.  मुख्य म्हणजे, मुस्लिम देश असूनही या देशामध्ये हिंदू धर्मातील अनेक देवतांच्या भव्य मुर्ती आहेत. हा आपला सर्व वारसा असून याचा आम्हाला अभिमान असल्याचे इंडोनेशियातील नागरिक सांगतात. याच इंडोनेशियातील (Indonesia) एक भगवान विष्णूंची मुर्ती जगप्रसिद्ध आहे. ही भगवान विष्णूंची मुर्ती जगभरात सर्वाधिक उंच असल्याचा दावा करण्यात येतो. भगवान विष्णूची जगातील सर्वात मोठी मूर्ती भारतात नसून इंडोनेशिया या देशात असल्याचे आश्चर्य वाटते.  इंडोनेशियाच्या बाली शहरात सर्वाधिक हिंदू धर्मिय राहतात.  याच बालीमध्ये हिंदू धर्मातील अनेक ऐतिहासिक मंदिरांची जपणूक करण्यात येते.  याशिवाय बालीमध्ये अनेक मंदिरे असून त्यांची देशाचा वारसा म्हणून अत्यंत चांगल्याप्रकारे जपणूक करण्यात येते.  

इंडोनेशियातील (Indonesia) बाली शहराला दरवर्षी सुमारे 2 कोटी देशविदेशातील पर्यटक भेट देतात.  बाली हे इंडोनेशियातील विकसित शहर आहे. आश्चर्य म्हणजे, बालीमध्ये जवळपास प्रत्येक रस्त्यावर हिंदू देवतांची मंदिरे आहेत. याशिवाय भगवान विष्णूची जगातील सर्वात उंच मूर्ती याच बालीमध्येच आहे. या पुतळ्याची उंची 122 मीटर आहे.  जगातील तिसरी सर्वात उंच मुर्ती म्हणूनही या भगवान विष्णूच्या मुर्तीकडे बघितले जाते. ही भगवान विष्णूची मुर्ती गरुडावर विराजमान आहे. बाली येथील उंगासन टेकडीच्या माथ्यावर असलेल्या उद्यानात ही भगवान विष्णूची मुर्ती आहे. दूरवरुन दिसणा-या या मुर्तीला बघण्यासाठी लाखो पर्यटक येतात. या मुर्तीचे हवाई दर्शन घेण्याचीही सोय करण्यात आली आहे.  हे भगवान विष्णूचे भव्य रुप पाहून पर्यटक मोहीत होतात. ही भव्य भगवान विष्णू यांची मुर्ती जेष्ठ शिल्पकार बाप्पा न्यूमन नुआरता यांनी तयार केली आहे.  त्यांच्या कलेचा सन्मान म्हणून त्यांना भारत सरकारनंही सन्मानीत केले आहे.  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला आहे.  

बालीमधील ही भगवान विष्णूची मुर्ती स्टॅच्यू ऑफ गरुड या नावानंही जगप्रसिद्ध आहे.   मुळात ही भव्य मुर्ती एवढ्या उंच स्थानावर आहे, की त्याची उंची बघितली की थक्क व्हायला होतं.  तांबे आणि पितळाचा वापर करुन तयार झालेली ही मुर्ती करण्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत.  

भगवान विष्णूची ही मूर्ती सुमारे 122 फूट उंच आणि 64 फूट रुंद आहे.  ही मुर्ती बनवण्यासाठी तब्बल 24 वर्षे लागली.  2018 मध्ये ही मूर्ती पूर्ण झाली.  एवढी वर्ष ही भगवान विष्णूची मुर्ती बनवायला वेळ का लागला हा प्रश्न कोणाला पडला असेल, त्यांनी ही मुर्ती जवळून नक्की बघावी.  कारण तांबे आणि पितळाचा वापर करत अत्यंत सुबक आणि भव्य असे हे भगवान विष्णूचे रुप आहे.  शिवाय भगवान विष्णुचे वाहन, गरुड सुद्धा अतिशय भव्य असा येथे साकारण्यात आला आहे.  बालीमध्ये या मुर्तीचे काम 1994 साली सुरू करण्यात आले,  मात्र हे काम सुरु झाल्यावर मुर्तीचे ठरलेले बजेट एकदम वाढले.  त्यामुळे मुर्तीच्या उभारणी कामाला फटका बसला पण नंतर हे काम पूर्ववत सुरु झाले.  मुर्तीसाठी अंदाजे $100 दशलक्ष खर्च आला. आता याच मुर्तीला बघण्यासाठी जगभरातील लाखो विष्णू भक्त इंडोनेशियात गर्दी करतात.  

इंडोनेशिया (Indonesia) हा मुस्लिम देश असला तरी हिंदू धर्मातील अनेक प्रतिमांची येथे जपणूक करण्यात येते.  भगवान विष्णू आणि भगवान रामाच्या अनेक कथांवर येथे चित्र आणि मुर्तीही आहेत.  भगवान विष्णूची जी भव्य मुर्ती तयार कऱण्यात आली आहे, ती गरुड आणि जीवनाचे अमृत शोधण्याच्या हिंदू पौराणिक कथेपासून प्रेरित असल्याचे सांगण्यात येते.   ही मुर्ती बनवतांना प्रथम भूकंपाच्या मोठ्या धक्क्याचा धोका लक्षात घेण्यात आला होता.  ही  मूर्ती वादळ आणि भूकंपांना तोंड देण्यासाठी समर्थ असून पुढील 100 वर्षे या मुर्तीला कसलाही धोका नसल्याचे सांगण्यात आले आहे.  या मुर्तीचे वजन 4000 टन आहे.  मूर्ती तांबे आणि पितळाचा वापर करुन तयार केलेली असली तरी त्याच्या आत स्टेनलेस स्टीलची फ्रेम आहे.    या भगवान विष्णूच्या मुर्तीवर असलेला सोनेरी मुकुट थोडा झुकलेला दाखवण्यात आला आहे.   

=============

हे देखील वाचा : यशोदा मातेच्या मंदिराची परदेशातही ख्याती…

=============

इंडोनेशिया (Indonesia) हा मुस्लिम बहुसंख्य देश असूनही ये देशानं आपल्या सास्कृतिक वारशाला जपलं आहे.   2013 मध्ये अमेरिकेतील इंडोनेशियन दूतावासात देवी सरस्वतीची मूर्ती बसवण्यात आली. भगवान विष्णूच्या वाहनाच्या नावावर येथे गरुड एअरलाइन्स आहे. या देशातील चलनी नोटांवरही गणपतीचा फोटो आहे.

सई बने 

 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.