असे म्हटले जाते की, जेव्हा तुम्ही प्रेमाच्या नात्यात अकडलेले असता तेव्हा पार्टनरच्या आनंदात तुमचा सुद्धा आनंद असतो. नव्याने नात्यात आलेले असाल किंवा लग्न झालेले असेल तरीही एकमेकांच्या आनंदाची चावी ही एकमेकांकडेच असते. अशातच जर खासगी समस्या किंवा अन्य कारणास्तव तुमचा पार्टनर निराश असेल तर त्याचा मूड उत्तम करण्यासाठी तुम्हीच मदत करू शकता. अशातच काही सोप्प्या ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही पार्टनरला खुश करू शकता. (Relationship advice)
-कॉम्प्लिमेंट द्या
जर तुमचा पार्टनर एखाद्या कारणास्तव उदास असेल तर त्याच्या चेहऱ्यावर हसू आणायचे असेल तर जरुर एखादी कॉम्प्लिमेंट द्या. जर तुम्ही त्याचा लूक्स, वागणे, ड्रेसिंस सेंस किंवा तुमच्यासोबत अथवा परिवारासोबत बोलण्याच्या पद्धतीवरून कौतुक केले तर त्याचा मूड बदलू शकतो. त्याच्यामधील उदासपणा दूर होऊ शकतो.
-सपोर्ट करा
जर तुम्ही त्याच्या समस्या समजून घेतल्या आणि कमी करण्यासाठी सपोर्ट केला तर तो नक्कीच भावनिक रुपात स्ट्राँन्ग होईलच. पण त्याला उत्तम ही वाटेल. तुमच्या पार्टनरचा मूड खराब असेल तर तुम्ही त्याच्याशी जरुर बोला की, तुम्ही त्याच्यासोबत नेहमीच आहात.
-आवडीचा पदार्थ बनवा
असे म्हटले जाते की, जर आपण एखाद्याला त्याच्या आवडीचा पदार्थ करून खायला दिला किंवा ऑर्डर केला तर त्याचा मूड बदलू शकतो. तर तुम्ही पार्टनरच्या आवडीचा एखादा पदार्थ बनवून त्याचा मूड फ्रेश करू शकता.
-आभार माना
बहुतांशवेळा आपण पार्टनरसोबत राहून-राहून त्याच्याशी कॅज्युअली वागतो. परंतु त्याने केलेल्या एखाद्या कामावेळी त्याचे आभार ही मानणे विसरुन जातो. त्याच्या लहान-लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करचो. मात्र आनंदित आयुष्य जगायचे असेल तर त्याची तारीफ करणे गरजेचे असते. पार्टनरच्या प्रत्येक प्रयत्नासाठी त्याचे आभार मानले पाहिजेत. (Relationship advice)
-भावना व्यक्त करा
हॅप्पी रिलेशनशिपसाठी आपल्या भावना व्यक्त करणे सर्वाधिक महत्त्वाचे असते. खरंतर याच्या माध्यमातून तुम्ही पार्टनरचा मूड फ्रेश करू शकता. तुम्ही त्याला त्याचे तुमच्या आयुष्यातील महत्त्व किंवा तो असल्याने तुमच्या आयुष्यात किती बदल झाले आहेत अशा भावना व्यक्त करू शकता. भावना व्यक्त केल्याने सर्वकाही गोष्टींमध्ये स्पष्टता येतेच. पण त्याचसोबत रिलेशनशिप मजबूत होण्यास ही मदत होते.
हेही वाचा- नवरा-बायकोच्या नात्यात फूट पाडण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ सवयी
-चुकला असाल तर सॉरी बोला
जर तुम्ही एखादी चुक केली असेल आणि त्यावरून जर पार्टनर उदास असेल तर नक्कीच त्याला सॉरी बोला. यामुळे सुद्धा पार्टनर तुमचे ऐकून घेऊन त्याचा मूड बदलू शकतो.