Home » Home Remedies for Swollen Feet: पायांना सारखी सूज येते? मग याकडे दुर्लक्ष न करता फॉलो करा ‘हे’ घरगुती उपाय

Home Remedies for Swollen Feet: पायांना सारखी सूज येते? मग याकडे दुर्लक्ष न करता फॉलो करा ‘हे’ घरगुती उपाय

आजकाल बहुतेकांना पायात सूज येण्याची समस्या सातवत असते. ही समस्या सामान्य असली तरी अनेकदा याचा प्रचंड त्रास होतो, अनेकांना पाय सुजले की नीट चालता ही येत नाही.

0 comment
Home Remedies for Swollen Feet
Share

आजकाल बहुतेकांना पायात सूज येण्याची समस्या सातवत असते. ही समस्या सामान्य असली तरी अनेकदा याचा प्रचंड त्रास होतो, अनेकांना पाय सुजले की नीट चालता ही येत नाही. तसेच या समस्येवर घरच्या घरी उपचार कसे करावे हे क्वचितच कोणाला माहिती आहे. तज्ज्ञांच्या मते, पायात सूज येणे एडेमामुळे होते. या प्रकारच्या समस्येची अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात. पाय वगळता शरीराच्या कोणत्याही भागात सूज येऊ शकते. जर सूज येण्याची समस्या बर्याच काळापासून आहे, तर आपल्याला त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कारण ते एखाद्या धोकादायक आजाराचे लक्षण असू शकते. ज्यामध्ये किडनी आणि हृदयविकाराचा समावेश होतो.जर तुम्ही ही या समस्येतून जात असाल तर आजचा लेख हा खास तुमच्यासाठी आहे. आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत. पायाच्या सुजेवर घरगुती उपाय.(Home Remedies for Swollen Feet)

Home Remedies for Swollen Feet

Home Remedies for Swollen Feet


पायांवर सूज येण्याची विविध कारणे असू शकतात, जसे खालील प्रमाणे :
– शरीराचे वजन जास्त असणे    – पायात रक्ताच्या गुठळ्या होणे  – व्यक्ती वृद्ध असेल तर   –  पायामध्ये कोणत्या प्रकारचे संक्रमण झाल्याने  – पायांपासून परत हृदयाकडे रक्त प्रवाहात समस्या   – पायाला दुखापत किंवा शस्त्रक्रिया   – दीर्घकाळ उभे राहणे
 
*आता पाहूयात यावर घरच्या घरी कसा आराम मिळवता येईल*
 
– शरीरात पाणी कमी झाल्याने पायला सूज येण्याची समस्या सुरू होते. पण भरपूर पाणी प्यायल्याने सूज कमी होऊ शकते. जर तुमच्या पायाला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला सूज येत असेल तर दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्या. यामुळे शरीर हायड्रेटेड राहील. कारण हायड्रेशनच्या कमतरतेमुळे शरीरात सूज वाढते.
 
– सेंधव मीठ म्हणजेच रॉक सॉल्टमध्ये हायड्रेटेड मॅग्नेशियम सल्फाइडचे क्रिस्टल्स असतात जे स्नायू दुखणे बरे करतात आणि त्वरित आराम देतात. कोमट पाण्याने भरलेल्या टबमध्ये किंवा बादलीमध्ये अर्धा कप रॉक मीठ घाला. आता या पाण्यात पाय 10 ते 15 मिनिटे बुडवून ठेवा. हा उपाय तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी देखील करू शकता.याने पायाची सूज कमी होण्यास मदत होईल. 
Home Remedies for Swollen Feet

Home Remedies for Swollen Feet

 
– पायाची सूज कमी करण्यासाठी बसताना पाय उंच ठेवा. ज्यामुळे सूज येण्यापासून आराम मिळेल. सूज कमी करण्याचा आणखी एक मार्ग आहे, आणि तो म्हणजे सरळ झोपणे आणि भिंतीचा आधार घेऊन पाय उंच ठेवणे. काही वेळाने तुम्ही पाय खाली ठेवू शकता. असे केल्याने सूज बर्‍याच प्रमाणात दूर होईल.
 
– लिंबू पाण्यामधून शरीरातील टॉक्सिन्स व्यतिरिक्त अतिरिक्त द्रव बाहेर पडतो. त्यामुळे पायांची सूज कमी होऊ लागते. म्हणूनच तज्ञ देखील दररोज लिंबू पाणी पिण्याची शिफारस करतात.
– पाय सूजत असतील तर  टी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी युक्त बेकिंग सोडा देखील फायदेशीर ठरू शकतो. यासाठी तुम्ही दोन चमचे तांदूळ पाण्यात उकळा. आता या पाण्यात दोन चमचे बेकिंग सोडा टाकून पेस्ट बनवा आणि 15 मिनिटे पायांना लावा. तांदळाच्या पाण्यासोबत मिसळल्याने ते पायांमध्ये साचलेले अतिरिक्त पाणी शोषून घेते आणि पायांमध्ये रक्ताभिसरण सुधारते.
 
– हळदीच्या मदतीने तुम्ही या पाय सूजण्याच्या समस्येपासूनही सुटका मिळवू शकता. यासाठी दोन चमचे हळदीमध्ये एक चमचा खोबरेल तेल मिसळून पेस्ट तयार करा आणि सूजलेल्या भागावर लावा. तर सुकल्यावर कोमट पाण्याने धुवावे.
(डिस्क्लेमर: वरील लेख केवळ माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे यातील उपाय  करण्याआधी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा.) 

Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.