आपल्याला जेव्हा आपल्या ऑफिसच्या कामातून किंवा घरच्या दैनंदिन कामातून वेळ मिळतो तेव्हा आपण बाहेर फिरायला जायचा प्लॅन करतो. मात्र तुम्हाला माहितेय का जगभरात अशी सुद्धा काही ठिकाणं आहेत जेथे मनुष्याला जाण्यास बंदी घातली गेली आहे. त्यापैकी एक ठिकाण हे भारतात सुद्धा आहे. अशातच जाणून घेऊयात अशी कोणती ठिकाणं आहेत जेथे आपण अजिबात जाऊ शकत नाहीत. (Isolated places in world)
अमेरिकेतील वायुसैन्याचा गुप्त सुविधा एरिया ५१ बद्दल नेहमीच विचित्र तर्क वितर्क लावले जातात की, तेथे नक्की काय असेल. काही वेळेस एरिया ५१ बद्दलच्या अफवा सुद्धा उडतात. अमेरिकेतील नेवाडाच्या वाळवंटात असलेल्या वायुसैन्याच्या या फॅसिलिटीचा उद्देश क्लासीफाइड आहे. मात्र या ठिकाणी मनुष्याला जाण्यास बंदी घालण्यात येते. काही वेळेस या ठिकाणाबद्दल विविध गोष्टी बोलल्या जातात. मात्र वास्तविकरित्या येथील प्रकृति ही नेहमीच रहस्यात्मक आहे.
दुसरे ठिकाण म्हणजे नॉर्वेजियन आर्कटिकच्या पर्माफ्रॉस्ट मध्ये असलेले स्वालबार्ड ग्लोबल सीड वॉल्ट. भविष्यात जगात होणाऱ्या विनाशकारी घटनांच्या शक्यता लक्षात घेता झाडांच्या बीजांना संरक्षित करण्यासाठी एक जागतिक भांडारच्या रुपात कार्य करते. या सुविधेचा उद्देश असा की, जैविक विविधतेचे रक्षण करणे. अशातच या ठिकणी सामान्य लोकांना जाण्यास सक्त मनाई केली जाते.
भारतातील उत्तर सेंटिनल बेटावर बाहेरील लोकांना प्रवेश दिला जात नाही. बंगालच्या खाडीत असलेले उत्तर सेंटिनल बेट सेंटिनली जातीच्या लोकांचे मूळ घर आहे. नेहमीच या जातीची लोक स्वत:ला जगापासून दूर ठेवत आले आहेत. असे राहण्यामागील कारण असे की त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने ते काही गंभीर आजारांचा सामना करू शकत नाहीत. हे एक संरक्षित क्षेत्र आहे. येथील जातीच्या लोकांची जीवनशैली आणि बाहेरील लोकांना संभाव्यपणे नुकसान पोहचू नये म्हणून बाहेरच्या व्यक्तींना येथे प्रवेश दिला जात नाही.
युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरु आहे. अशातच येथे दुसऱ्या देशातील लोक येत नाहीत. मात्र युक्रेन मधील चेरानोबिल अपवर्जन क्षेत्र १९८६ च्या परमाणू आपत्तीचे स्थान असल्याने धरतीवरील सर्वाधिक प्रसिद्ध निषिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. येथे काही नियंत्रित यात्रांसाठीच परवानगी दिली गेली आहे. तसेच पिपरियातील एक भयानक भुताटकी शहर आणि निर्जन रिएक्टर आपत्तीच्या विनाशकारी परिणामांची नेहमीच आठवण करून देतो.(Isolated places in world)
हेही वाचा- राजाची समाधी नव्हे तर हा आहे मृत्यूचा सापळा…
ब्राजीलच्या तटावर एक लहान भूभाग ‘इल्हा दा क्यूइमाडा ग्रांडे’ आहे. ज्याला सर्वसामान्यपणे स्नेक आयलँन्ड नावाने ओळखले जाते. याचे नाव येथे आढळून येणारे विषारी साप गोल्डन लांसहेड वाइपरच्या कारणास्तव ठेवण्यात आले आहे. या सापांच्या कारणास्तव येथील आयलँन्ड लोकांसाठी फार धोकादायक ठिकाण झाले आहे. येथे आल्यानंतर फार भीती वाटते. ब्राजील सरकारने लोकांना आणि सापांच्या या दुर्मिळ प्रजातीचे संरक्षण करण्याकरिता या बेटावर जाण्यास बंदी घातली आहे.