Home » Home Remedies for Acidity: ऍसिडिटी ने त्रस्त असाल तर ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा !

Home Remedies for Acidity: ऍसिडिटी ने त्रस्त असाल तर ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा !

ऍसिड रिफ्लक्स ज्याला सामान्यत: ऍसिडिटी म्हणून ओळखले जाते, ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये पित्त किंवा पोटातील आम्ल आपल्या अन्ननलिकेत परत येते आणि त्याचा त्रास होतो.

0 comment
Home Remedies for Acidity
Share

ऍसिड रिफ्लक्स ज्याला सामान्यत: ऍसिडिटी म्हणून ओळखले जाते, ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये पित्त किंवा पोटातील आम्ल आपल्या अन्ननलिकेत परत येते आणि त्याचा त्रास होतो. ऍसिडिटी ही एक सामान्य समस्या आहे ज्याचा अनेकांना याचा त्रास होतो. ऍसिडिटीवर ताबडतोब उपचार करण्यासाठी बाजारात अॅसिडिटीची औषधेही उपलब्ध असली तरी या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही ऍसिडिटीवर घरच्या घरी किंवा आयुर्वेदिक ही उपचार करू शकता. ऍसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण बडीशेपचे सेवन करतात, काही जण थंड दूध पितात, पण अनेकदा त्यानेही आराम मिळत नाही मग अशा वेळी घरच्या घरी काय करता येईल या बद्दलचाच आजचा हा लेख असणार आहे त्यामुळे तुम्हालाही ऍसिडिटीची समस्या सतावत असेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.(Home Remedies for Acidity)
 
Home Remedies for Acidity

Home Remedies for Acidity

 
* अॅसिडिटी वर करता येणारे घरगुती उपाय *
 
– केळीमध्ये पोटॅशियम चे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पोटाच्या अस्तरात श्लेष्मा तयार होते आणि नंतर ते पीएच पातळी देखील कमी करते. इतकंच नाही तर केळीमध्ये फायबरचं प्रमाणही चांगलं असतं, ज्यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि भूक लवकर लागत नाही. अशा प्रकारे केळी आपल्याला ऍसिडिटी तसेच वजन कमी करण्यास मदत करू शकते.
 
– ऍसिडिटी पासून ताबडतोब सुटका मिळवण्यासाठी जिरे थेट चावून घ्या किंवा एक ग्लास पाण्यात १ चमचा जिरे उकळून प्या. हे प्यायल्याने ऍसिडिटीपासून आराम मिळतो.पोटाच्या समस्यांमध्ये जिऱ्याचे पाणी खूप फायदेशीर आहे. काळे जिरे गॅस्ट्रो प्रोटेक्टिव्ह आहे. ते आम्लपित्त आणि आम्लपित्त कमी करण्यास आणि प्रतिबंधित करण्यासाठी प्रभावी आहेत आणि छातीत जळजळ, वेदना, मळमळ, पोट फुगणे, बद्धकोष्ठता इत्यादी लक्षणे दूर करतात.
 
– पोटात उष्णता असताना गूळ खाल्ल्यास आराम जाणवू लागेल. गूळ खाल्ल्यानंतर एक ग्लास पाणी प्यावे. लक्षात ठेवा गूळ खाल्ल्यानंतर सामान्य ग्लासापेक्षा कमी पाणी प्यायल्यात खोकला होऊ शकतो. त्यामुळे गूळ खा आणि एक ग्लास पाणी प्या. पोट लगेच थंड होईल आणि ऍसिडिटी दूर होईल.
 
Home Remedies for Acidity

Home Remedies for Acidity

 
– नारळाचे पाणी सर्वात शुद्ध आणि फायदेशीर मानले जाते. नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने तुमचे संपूर्ण शरीर स्वच्छ होते. हे शरीराला एक स्वच्छता म्हणून मदत करते आणि शरीरातील सर्व विषारी पदार्थ काढून टाकते. इतकंच नाही तर नारळाच्या पाण्यात फायबरचं प्रमाणही जास्त असतं, ज्यामुळे पोट बराच वेळ भरल्यासारखं वाटतं. नारळाचे पाणी प्यायल्याने ऍसिडिटीची समस्या लगेच दूर होते.(Home Remedies for Acidity)
– पोटातील गॅस आणि ऍसिडिटी वर लवंग हा प्रभावी रामबाण उपाय मानला जातो. ऍसिडिटी आणि त्याची लक्षणे जसे पोट फुगणे, अपचन, मळमळ, गॅस्ट्रिक ची समस्या इत्यादींपासून सुटका मिळवण्यासाठी तोंडात लवंग चोखावी. 
 
======================
 
 
======================
– घरात आवळा असेल तर ऍसिडिटी चा त्रास झाला की लगेचच काळे मीठ लावून आवळ्याचे सेवन करू शकता. तुम्हाला तात्काळ आराम मिळेल. जर आवळा नसेल आणि आवळा कँडी असेल तर तुम्ही देखील त्याचे सेवन करू शकता. त्यामुळे 2 ते 3 मिनिटांत आराम मिळेल.
 
– जर तुम्हाला वारंवार गॅस, अपचन, पोट फुगत असेल तर जीरे आणि काळे मीठ एकत्र सेवन करावे. 1-1 चमचा जीरे आणि काळे मीठ घ्या. दोन्ही कढईत घालून चांगले परतून घ्या. आता थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. ही पावडर कोमट पाण्याबरोबर खा. तुम्ही ते मधासोबतही घेऊ शकता. याचे सलग तीन ते चार दिवस सेवन करा. पोटाच्या समस्यांपासून मुळापासून सुटका मिळेल.
 
(डिस्क्लेमर: वरील लेख माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे यातील उपाय करण्याआधी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या.) 

Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.