अशी बहुतांश लोक असतात ज्यांना ट्रॅव्हल करणे फार आवडते. पावसाळ्यात ट्रॅव्हलिंग करणे अधिक मजेशीर वाटते. मात्र जेव्हा आपण आपल्यासोबत घरातील एखादा पाळीव कुत्रा सोबत घेऊन जातो तेव्हा काही प्रश्न उपस्थितीत होतात. अशातच खुप दिवसांसाठी प्रवास करण्याचा अधिक प्लॅन असेल तर अधिक पंचायत होते. अशातच जर तुम्ही पावसाळ्यात तुम्ही घरातील कुत्र्यासोबत प्रवास करत असाल तर पुढील काही गोष्टी जरुर लक्षात ठेवा. (travel with pet in monsoon)
हेल्थचेकअप करुन घ्या
ट्रिपला जाण्यापूर्वी तुम्ही त्याआधी तुमच्या कुत्र्याचे हेल्थचेकअप करून घ्या. त्याचसोबत त्याचे वॅक्सिनेशन सुद्धा करा. जेव्हा तुमचा कुत्रा स्वस्थ असेल तेव्हाच त्याला ट्रिपवर घेऊन जा. जेणेकरुन कोणतीही समस्या उद्भवणार नाही. तुमचा कुत्रा आजारी असेल तर त्याच्यासोबत प्रवास करणे टाळा. या व्यतिरिक्त हँन्ड सॅनिटाइजर डिसइनफेक्टेंट स्प्रे अशा गोष्टी सु्द्धा सोबत ठेवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुमचा कुत्रा अधिक रागीट असेल तर त्याला प्रवासात घेऊन जाऊ नका.
कंम्फर्टकडे लक्ष द्या
पावसाळ्यात अचानक पाऊस आला किंवा ह्युमिडिटी वाढल्यास तर तुमच्या कुत्र्याला त्रास होऊ शकतो. यामुळे ट्रिपवर जाताना हे सुनिश्चित करा की, ट्रिप दरम्यान त्याला कंम्फर्टेबल फील करुन द्या. यासाठी त्यासाठी वॉटरप्रुफ कॅरियर ठेवा, त्यामध्ये वेंटिलेशनकडे लक्ष सुद्धा द्या. या व्यतिरिक्त प्रवास करताना सीट कवर किंवा वॉटरप्रुफ मॅटचा वापर करू शकता.
महत्त्वाचे सामान सोबत ठेवा
प्रवासाला जातेवेळी बॅक पॅकिंगकडे सुद्धा लक्ष द्यावे लागते. खासकरुन जेव्हा तुमच्या कुत्र्याला घेऊन प्रवास करत असाल. त्याच्यासाठी सुद्धा एक वेगळी बॅग पॅक करा. त्यात त्याचे फूड, औषधं, फर्स्ट अॅड सप्लाइज, फूड बाउल, टॉवेल किंवा अन्य महत्त्वाचे सामान सुद्धा ठेवा. हवं असल्यास त्याच्या खेळण्याच्या वस्तू सुद्धा बॅगेत भरा. पुरेश्या प्रमाणात पाणी सोबत ठेवा.
ब्रेक घ्या
जर तुम्ही लॉन्ग ट्रिपवर जात असाल तर तुमच्या कुत्र्याला सुद्धा थकवा येऊ शकतो. याच दरम्यान मध्येमध्ये ब्रेक घ्या. पेट फ्रेंन्डली लोकेशनवर थांबण्याचा प्लॅन करा. असे केल्याने त्याला वॉकसाठी सुद्धा वेळ मिळेल. (travel with pet in monsoon)
हेही वाचा- लॉटरी जिंकल्याने व्यक्तीने खरेदी केला आलिशान बंगला आणि हेलिकॉप्टर, आता झालाय कंगाल
या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या कुत्र्याला फ्लाइटमधून सुद्धा घेऊन जाऊ शकता. मात्र त्यावेळी काही नियमांचे पालन करावे लागते. जसे की, 8 किलोपेक्षा अधिक वजनाचा कुत्रा तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. त्याचसोबत पाच किलोपेक्षा अधिक सामान तुमच्याकडे नसावे. त्यामुळे कुत्र्यासोबत फ्लाइटमधून प्रवास करण्यापूर्वी त्याचे वजन तपासून पहा.