हिंदू धर्मात धार्मिक आस्था आणि मान्यतांमध्ये काही कमतरताच नाही. भारतातील बहुतांश मदिरांच्या आपल्या अनोख्या परंपरा आहेत. याच परंपरांमुळे ती मंदिरे फार प्रसिद्ध आणि चर्चेत असतात. लोक मंदिरात आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून देवाला साकडे घालतात. अशातच भारतातील असे एक बालाजीचे मंदिर आहे जेथे लोक आपल्या वीजाच्या अर्जासाठी दर्शन करण्यासाठी येतात. हे मंदिर हैदराबाद पासून जवळजवळ ४० किमी दूरवर आहे. हैदराबाद मधील या मंदिराचे नाव चिल्कुर बालाजी मंदिर असे आहे. (Hyderabad balaji temple)
हे मंदिर सर्वाधिक प्राचीन मंदिरापैकी एक आहे. या मंदिराला भक्त रामदास यांचे काका अक्कान्ना आणि मदन्ना यांनी तयार केले होते. या मंदिराची संरचना आणि कोरीवकाम फार सुंदर आहे. हे मंदिर सहस्र वर्षांपूर्वी तयार करण्यात आले होते.
या मंदिराबद्दल अशी मान्यता आहे की, मंदिराभोवती ११ फेऱ्या मारल्यानंतर युएसचा वीजा मिळतो. लोक वीजा मिळू दे म्हणून आपली इच्छा या मंदिरात व्यक्त करतात. याच कारणास्तव या मंदिराला वीजा मंदिर असे सुद्धा म्हटले जाते. याच मंदिराबद्दल आपण आज अधिक जाणून घेऊयात.
बालाजीचे हे मंदिर जवळजवळ ५०० वर्षांपेक्षा ही फार जुने आहे. येथे येणारे भाविकांची संख्या सुद्धा लाखोंच्या घरात असतो. येथे केवळ एका आठवड्यात लाखो भाविक आपल्या वीजा मिळावा म्हणून इच्छा व्यक्त करतात. ज्या लोकांना परदेशात जाऊन रहायचे आहे किंवा शिक्षण घ्यायचे आहे अशी लोक येथे आवर्जुन येतात. तसेच जरी वीजा मिळण्यास एखादी समस्या येत असेल तर मंदिरात येऊन बालाजीचे दर्शन घेतले जाते.(Hyderabad balaji temple)
हेही वाचा- ‘या’ गणेश मंदिरात होतो ब्राह्मी नदीचा उगम
येथील मंदिरात लोक वीजा मिळावा म्हणून मंदिराभोवती ११ फेऱ्या मारतात. जेव्हा भाविकांची इच्छा पूर्ण होते तेव्हा वीजा मिळालेला भाविक पुन्हा दर्शनसाठी मंदिरात येतो. तेव्हा तो ११ ऐवजी १०८ वेळा मंदिराभोवती फेऱ्या मारतो. अशी मान्यता सुद्धा आहे की, येथे अर्ज जरी ठेवला तरीही वीजा लवकर येतो. येथे एक व्यक्ती सर्वात प्रथम त्याला वीजा मिळावा म्हणून अशी इच्छा मनात घेऊन येथे आला होता. त्याची ही इच्छा एका आठवड्यातच पूर्ण झाली होती. त्यानंतरच्या काही दशकांपर्यंत ते आजवर हीया मंदिरात वीजा संदर्भातील इच्छा घेऊन भाविक जरुर येतात.