Home » ऐकेकाळी शूज तयार करायची Apple कंपनी

ऐकेकाळी शूज तयार करायची Apple कंपनी

तुम्हाला माहितेय का ऐकेकाळी ही कंपनी शूज सुद्धा तयार करायची. हे खरं आहे. अॅप्पल खरंच शूज बनवायची आणि आता अशाच एक शूजच्या जोडीचा लाखोंमध्ये लिलाव केला जात आहे.

by Team Gajawaja
0 comment
Apple shoes
Share

अॅप्पल कंपनीचे नाव काढल्यानंतर सर्वात प्रथम आपल्या डोळ्यासमोर आयफोनच दिसतो. अथवा कंपनीचे दूसरे प्रोडक्ट्स जसे Macbook, iPad. या व्यतिरिक्त अॅप्पल कंपनी प्रत्येक वर्षाला त्यांचा एक मोठा इवेंट आयोजित करते. त्यामध्ये काही नवे प्रोडक्ट्स लॉन्च केले जातात.  मात्र तुम्हाला माहितेय का ऐकेकाळी ही कंपनी शूज सुद्धा तयार करायची. हे खरं आहे. अॅप्पल खरंच शूज बनवायची आणि आता अशाच एक शूजच्या जोडीचा लाखोंमध्ये लिलाव केला जात आहे. खरंतर कंपनीने १९९० च्या काळात आपल्या कर्मचाऱ्यांसाठी काही ट्रेनर शूज तयार केले होते. ते आता लिलावासाठी उपलब्ध आहेत. (Apple shoes)

९० च्या दशकातील शूज
अॅप्पल टेक प्रोडक्ट्ससोबत टी-शर्ट वगैरे सुद्धा तयार करते. मात्र शूज खुपच एक्सक्ल्यूसिव आहे. फोर्ब्स्यच्या रिपोर्ट्सनुसार, कंपनीने ९० च्या दशकात आपल्या कर्मचाऱ्यांसाठी शूज बनवले होते. हे ट्रेनर शूज Sotheby च्या वेबसाइटवर लिलावासाठी उपलब्ध आहेत. क्लेक्टर्स या शूजला खरेदी करु शकतात. जे वास्तवात दूसऱ्या शूज पेक्षा वेगळी असतील. या शूजसाठी लिस्टिंग प्राइस ५० हजार डॉलर म्हणजेच जवळजवळ ४१ लाख रुपये आहे. या स्नीकर्सच्या डिस्क्रिप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ते केवळ अॅप्पल कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आले होते. पण याचा उद्देश थोडा वेगळा होता. शूज कर्मचाऱ्यांना Giveaway साठी बनवले होते.

हे स्नीकर्स अल्ट्रा-रेयर आहेत. ज्यांना मिड-९० मध्ये नॅशनल सेल्स कॉफ्रेंन्समध्ये दिले गेले होते. Sotheby च्या मते, २२ हजारांपेक्षा अधिक अॅप्पल कस्टमर्सनी १९८५ मध्ये ब्रँन्डचे क्लॉदिंग आणि एक्सेसरीजला खरेदी केले होते, जे सर्व कॅटेगरीतील लोकांमधील डेडिकेशन दाखवतो.

लिलावाच्या डिटेल्समध्ये असे सांगितले गेले आहे की, अॅप्पलने एक्सपर्टी झोनच्या बाहेरील प्रोडक्ट्ससाठी काही प्रसिद्ध ब्रँन्ड्स सोबत पार्टनरशिप केली आहे. त्यानंतर अॅप्पलच्या ब्रँन्डिंगला त्या प्रोडक्ट्सवर जोडले गेले आहे. यापूर्वी हे शूज कधीही पब्लिकसाठी सेलकरिता उपलब्ध करुन देण्यात आलेले नव्हते. (Apple shoes)

हेही वाचा- Bluetooth च्या माध्यमातून तुमच्या ठेवली जाऊ शकते नजर

दरम्यान,हे शूज अगदी नव्या कंडीशनमध्ये मिळणार नाहीत. वेबपेज आर्टिकलवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, हे शूज जुने झाले आहेत हे स्पष्टपणे दिसेल. तुम्हाला ग्लू आणि हलके डाग दिसून येतील. ऐवढेच नव्हे तर मिडसोल पिवळसर झालेला ही दिसेल. त्याचसोबत बॉक्समध्ये तुम्हाला लाल रंगाची एक लेस सुद्धा दिली जाणार आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.