प्रत्येकाला आपल्या घरात एक बेडरुम असावे असे वाटते. जेणेकरुन तेथे गेल्यानंतर स्वत:साठी प्रायव्हेसी मिळेल. मात्र वास्तु शास्रानुसार आपण ज्या ठिकाणी राहतो तेथील उर्जा आपल्या मानसिक आरोग्य आणि नात्यांवर सखोल परिणाम करते. असे म्हटले जाते की, जेवढी नैसर्गिक उर्जा तुमच्या घरात येईल तेवढे अधिक उत्तम मानले जाते, यामुळे घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते. अशातच वास्तु शास्रात तुमच्या घराची बेडरुम नक्की कोणत्या दिशेला असावी या बद्दल सांगितले गेले आहे. (Vastu tips)
बेडरुमचे स्थान
तुमचे बेडरुम साउथ किंवा साउथ-वेस्ट कोपऱ्यात असावे. ही दिशा बेडरुमसाठी अनुकूल मानली जाते. सुनिश्चित करा की, बेडची एक बाजू तुमच्या भितींला चिकटली गेली पाहिजे. मात्र खिडकीला लागून असू नये. याचे तोंड दरवाज्याच्या दिशेला नसावे. बेड असा खोलीत असावा जेथे अधिक कोपरे नसावेत.
भितींचा रंग
बेडरुमसाठी नेहमीच तुमच्या डोळ्यांना आरामदायी रंग निवडावा. चमकदार रंग लावू नका. कारण ते फार उत्तेजक असतात. बेडरुम आकर्षक दिसावी म्हणून फिकट रंगांचा वापर करावा. साउथ वेस्ट दिशेला बेडरुम असेल तर गुलाबी रंग लावावा. वास्तु शास्रानुसार झोपण्याच्या खोलीत निळा रंग सुंदरता, खरेपणा आणि समपर्णाचे प्रतीक मानला जातो. तर हिरवा रंग हा आनंदमय वातावरण देतो.
आरसा लावताना ही गोष्ट ठेवा लक्षात
बेडरुममध्ये आरसा शक्यतो लावणे टाळा. मात्र जरी लावला तरीही तो रात्री झोपताना एखाद्या पडद्याने बंद करुन ठेवा. आरसा हा अशांती निर्माण करु शकतो. वास्तुच्या दिशांनुसार बेडरुमच्या समोर आरसा चुकून ही लावू नका. आरसा जेवढा मोठा असेल तेवढेच वैवाहिक आयुष्यात तणाव ही अधिक वाढले जातील. (Vastu tips)
बेडरुमची सजावट
बेडरुममध्ये असे फोटो किंवा गोष्टी ठेवा जेणेकरुन प्रेम, सद्भाव आणि एकजूटतेच्या भावनेला प्रोत्साहन देईल. बेडरुमच्या नॉर्थ कोपऱ्यात इनडोर प्लांट आणि साउथ वेस्ट कोपऱ्यात सफेट फूल लावल्याने वैवाहिक आयुष्य आनंदीत राहतो. खोलीत बदक किंवा एकच हंस अलेले स्टॅच्यु नसावेत. या ऐवजी हंसाची जोडी असलेला फोटो किंवा स्टॅच्यु ठेवा. यामुळे प्रेम आणि एकजुटतेचे प्रतीक दर्शवले जाईल.
हेही वाचा- एखादे नवे काम करत असाल तर ‘या’ वास्तू टीप्समुळे मिळेल यश
लाइटची निवड
बेडरुममध्ये नैसर्गिक प्रकाश येणे फार महत्त्वाचे असते. यामुळे सकारात्मक उर्जा निर्माण होते. आरामदायी वातावरण बनवण्यासाठी संध्याकाळी हलक्या लाइटचा वापर करावा. बेडरुममध्ये हलक्या निळ्या किंवा गुलाबी रंगाच्या लाइटचा वापर करावा.