तारक मेहता का उल्टा चश्मा गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. लहान मुलं ते वयस्कर लोक ही हा शो आनंदाने पाहतात. २००८ मध्ये सुरु झालेल्या या सीरियल्समधील काही नामांकित कलाकारांनी याला अलविदा केले आहे. मात्र आज ही सोनी सब वरील या कार्यक्रमाचा टीआरपी टॉप १० च्या लिस्टमध्ये आहे. परंतु फार कमी लोकांना माहितेय की, तारक मेहता का उल्टा चश्मा खरंतर प्रसिद्ध गुजरातील लेखक तारक मेहता यांची कथा आहे. (Taarak Mehata)
लेखक तारक मेहता गुजराती वृत्तपत्रात उंधा चश्मा नावाचा कॉलम लिहायचे. त्यानंतर त्यांना यापासून प्रेरणा मिळत तारक मेहता का उंढा चश्मा नावाचे गुजराती मध्ये पुस्तक लिहिले आणि त्यानंतर या पुस्तकाच्या मदतीने प्रोड्यूसर असिद मोदी यांनी सब टीवीसाठी नवी हिंदी मालिका बनवली. गुजरात आणि महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये ७९ वर्षांचे लेखक तारक मेहता यांची पॉप्युलॅरिटी पाहता शो त्यांच्या नावावरच केला गेला. या शो ची प्रसिद्धी पाहण्यासाठी लेखक आज आपल्यात नाहीत.
हेही वाचा- एकता कपूरने K वरुनच का सुरु केल्या होत्या सीरियल्स?
६ वर्षांपूर्वी झाले निधन
वयाच्या ८७ व्या वर्षी १ मार्च २०१७ मधअये गुजरात मधील अहमदाबाद मध्ये आजाराने दीर्घकाळ ग्रस्त असल्याने तारक मेहता यांचे निधन झाले होते. त्यांनी आपल्या करियरमध्ये ८० पेक्षा अधिक पुस्तके लिहिली. २०१५ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळेच आज तारक मेहता करोडोंच्या संख्येने असलेल्या दर्शकांच्या मनावर राज्य करते. त्यांच्या रचनेअंतर्गत शो वर काम करताना नवे लेखक याची काळजी घेतात की, तो शो तारक मेहता यांच्या सिद्धांतावर पुढे जाईल. या सीरियमध्ये तारक मेहता यांची भुमिका प्रसिद्ध कलाकार शैलेश लोढा साकारत होते. शैलेश यांनी शो ला गुडबाय केल्यानंतर सचिन श्रॉप तारक मेहता झाले आहेत. (Taarak Mehata)
हेही वाचा- एकता कपूरने K वरुनच का सुरु केल्या होत्या सीरियल्स?
तारक मेहता यांचे नेहमीच असे मानणे होते की, त्यांच्या पुस्तकावरुन एक शो तयार करण्यात यावा. जेणेकरुन प्रेक्षकांना काहीतरी शिकवण मिळेल केवळ मनोरंजनच्या दृष्टीकोनातून न पाहिल्यास तर लोक आयुष्यात नेहमीच उत्तम काम करण्यास प्रेरित होतील. त्यांना असे वाटायचे की, या सीरियलमध्ये हिंसाचार किंवा एखाद्याच्या भावनांना दुखावले जाऊ नये. आज ही तारक मेहताची संपूर्ण टीम त्यांच्या याच सिद्धांताचा सन्मान करण्याचा प्रयत्न करते.