ब्रिटेनची राजधानी लंडन हे दीर्घकाळापासून भारतीय अरबपतींच्या पसंदीचे शहर राहिले आहे. स्टील किंग लक्ष्मी निवास मित्तल ते वेदांताचे अनिल अग्रवाल यांच्यासारख्या अरबपतींनी लंडनमध्ये घर घेतले आहे. अशातच आणखी एक भारतीय व्यवसायिक आणि एस्सार ग्रुप (Essar group) चे को-फाउंडर रवि रुइया (Ravi Ruia) यांनी सुद्धा तेथे घर खरेदी केले आहे.
रुइया याांच्या फॅमिलि ऑफिसने लंडनमध्ये १२०० कोटी रुपयांचे बकिंघम पॅलेसजवळ एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. ही डील गेल्या काही वर्षांमधील लंडन मधील सर्वाधिक मोठी प्रॉपर्टी डील असल्याचे सांगितले जात आहे. हा बंगला रशियाच्या प्रॉपर्टी निर्देशक एंड्री गोंचारेंको यांच्यासंबंधित आहे. रुइया यांनी जी प्रॉपर्टी खरेदी केली आहे त्याचे नाव हनोवर लॉज असे आहे. हे घर लंडन मध्ये १५० पार्क रोड येथे आहे. याच्या समोरच रीजेंट्स पार्क आहे. या घराला इंटिरीयर डिझाइनर डार्ल अॅन्ड टेलर आणि आर्किटेक्ट जॉन नाश यांनी डिझाइन केले आहे.
लंडनमध्ये महागड्या घरांची डील तिच लोक करतात ज्यांना कर्ज घेण्याची गरज भासत नाही. ब्रोकरेज फर्म नाइट फ्रैंक यांच्या मते, गेल्या वर्षात जगभरात ३ कोटी डॉलर किंवा त्यापेक्षा अधिक नेटवर्थ असलेल्या लोकांपैकी १७ टक्के जणांनी कमीत कमी एक घर खरेदी केले आहे.
हेही वाचा- स्टीव जॉब्सवरच नव्हता Apple च्या को-फाउंडरचा विश्वास
कोण आहेत रवि रुइया
रवि रुइया (Ravi Ruia) हे एस्सार ग्रुपचे को-फाउंडर आहेत. एप्रिल १९४९ मध्ये त्यांचा जन्म झाला असन ते एक मॅकेनिकल इंजीनिअर आहेत. त्यांनी चैन्नईतील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून डिग्री मिळवली आहे. रवि यांनी आपल्या करियरची सुरुवात फॅमिली बिझनेस पासून केली. तसेच त्यांचा मोठा भाऊ शशि रुइया यांच्यासोबत मिळून कंपनीला एका यशाच्या शिखरावर त्यांनी नेऊन ठेवली. दोन्ही भावंडांनी संयुक्त रुपात एस्सार ग्लोबल फंड लिमिडेटची स्थापनाक केली. हे एस्सार कॅपिटल लिमिटेड द्वारे मॅनेज केले जाते. २० पेक्षा अधिक देशांमध्ये विस्तारलेला एस्सार ग्रुप स्टील, ऑइल अॅन्ड गॅस, पॉवर, कम्युनिकेशन, शिपिंग, प्रोजेक्ट्स अॅन्ड मिनिरल्सच्या सेक्टरमध्ये काम करते. ७५ हजारांपेक्षा अधिक कर्मचारी असणाऱ्या एस्सार कंपनीचा रेवेन्यू १७ अरब डॉलर आहे.२०१२ मध्ये फोर्ब्सने रुइया ब्रदर्सला वर्ल्ड रिचेस्ट इंडियनची रँकिंग दिली होती. त्यावेळी त्यांचे नेटवर्थ ७ अरब डॉलर होते.