108
पावसाळा हा ऋतू अनेकांचा आवडता ऋतू जरी असला तरी पावसाळा सुरु झाला की अनेक आजार ही पसरु लागतात. आणि त्यातीलच एक भयंकर आजार म्हणजे डेंग्यू. हा डासांमुळे होणारा आजार आहे. पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण वाढतात कारण उबदार तापमान आणि साचलेले पाणी यांच्या संयोगाने डासांची उत्पत्ती योग्य होते. डेंग्यूचा विषाणू संक्रमित एडीज डासांच्या माध्यमातून माणसांमध्ये पसरतो. त्यामुळे डेंग्यू ताप हे नाव लोकांच्या मनाला हादरवून टाकते कारण डेंग्यूने गेल्या काही वर्षांपासून जगभरात दहशत माजवली आहे. एवढा संघर्ष करूनही आतापर्यंत कोणताही देश डेंग्यूपासून पूर्णपणे मुक्त होऊ शकलेला नाही. यामुळे होणाऱ्या तापाला ‘हाड फोडणारा’ ताप असेही म्हणतात कारण या तापात रुग्णाला खूप वेदना होतात, जणू त्यांची हाडे तुटत आहेत अस त्यांना वाटत असते. काही दिवसांपासून राज्यात पावसाळा सुरु झाला आहे आणि अर्थात त्याच्याबरोबर आजार ही जन्म घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. बऱ्याचदा साधारण वाटणारा ताप कधी डेंग्यू चे रूप घेईल हे सांगता येत नहीं त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घेण खुप गरजेच आणि महत्वाचे झाले आहे. खास करून लहन मुलांना जपण्याची गरज आहे. मात्र अनेकदा आपल्याला डेंग्यू झाला आहे का? याच निदान खुप उशिरा होत त्यामुळे आजच्या लेखात आपण डेंग्यूची लक्षणे आणि उपाय हे सर्व जाणून घेणार आहोत.(Dengue Symptoms and Treatment)

Dengue Symptoms and Treatment
*पावसाळ्यात घेण्याची काळजी*
पावसाळ्यात साचलेले घाण पाणी आणि त्यावर बसलेले डास/ मच्छर चावल्याने डेंग्यू हा आजार होतो.त्यामुळे पावसाळ्यात घरात किंवा घरच्या आजूबाजूला अडगळीचे सामन किंवा जिथे डास पैदा होतील अशा गोष्टी ठेऊ नये.याशिवाय कूलरमध्ये पाणी असेल तर त्यात रॉकेल तेल घालावे जेणेकरून डासांची वाढ होणार नाही.
दररोज मच्छरदाणीचा वापर करा. हे आपल्याला डास चावणार नाही, पाण्याच्या टाक्या नीट झाकून स्वच्छतेची काळजी घ्या.आणि सर्वात महत्वाचे सौम्य लक्षणे दिसताच जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि रक्तातील प्लेटलेट्सची तपासणी करून घ्या.
*डेंग्यूची लक्षणे*
– अचानक तेज बुखार – पाठीच्या मागे दुखणे – डोळे, स्नायू, सांधे आणि हाडे दुखणे – तीव्र डोकेदुखी – पोटात अस्वस्थता – त्वचेवर लाल डाग – डोळ्यांच्या मागे अस्वस्थता – मळमळ आणि मळमळ जाणवणे

Dengue Symptoms and Treatment
*डेंग्यू झाल्यास सर्वात आधी हे करा*
– पाणी आणि द्रवपदार्थांचे सेवन वाढवा – हलके अन्न खा – शरीराला आराम द्या.
*डेंग्यूमध्ये शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात अशा वेळी या गोष्टी खा*
– पपई आणि त्याची पाने – किवीचे सेवन करा – नारळ पाणी प्या – शेळीचे दूध प्या – व्हिटॅमिन सी समृद्ध अन्न
– व्हिटॅमिन बी 12 – लोहयुक्त पदार्थ खा.(Dengue Symptoms and Treatment)
=======================
=======================
हा डेंग्यू ताप हा सामान्य व्हायरल फिव्हर आहे. यात तीव्र ताप, अंगदुखी, तीव्र डोकेदुखी, अंगावर पुरळ येणे अशी लक्षणे दिसून येतात. हा डेंग्यू ५-७ दिवसांच्या सामान्य उपचारांनी बरा होतो. मात्र त्यापेक्षा जास्त दिवस जर तो शरीरात राहिला तर रुग्णाला त्याचा प्रचंड त्रास होऊ शकतो. डेंग्यूवर कोणतेही विशिष्ट औषध किंवा अचूक उपचार उपलब्ध नाहीत. ताप, वेदना नियंत्रित करण्यासाठी डॉक्टर पॅरासिटामॉल औषधासारखे पेनकिलर देऊ शकतात. त्यामुळे शरीर हायड्रेटेड ठेवून डेंग्यू नियंत्रणात ठेवणे हा सर्वात महत्वाचा मार्ग आहे. अशा वेळी आपण पुरेसे स्वच्छ पाणी प्यावे. मात्र, गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते. गंभीर प्रकरणांमध्ये, रुग्णाला इंट्राव्हेनस फ्लुइड किंवा इलेक्ट्रोलाइट पूरक आहार दिला जातो. काही प्रकरणांमध्ये, रक्तदाब निरीक्षण आणि रक्त संक्रमणाद्वारे देखील उपचार केले जातात.
(डिस्क्लेमर: वरील लेख माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे यातील उपाय करण्याआधी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या.)
