आपल्या प्रत्येकाच्या घरात मसळ्याच्या डब्ब्यात एक अशी गोष्ट असते ज्याचा वापर आपण अगदी सगळ्या पदार्थांमध्ये करतो आणि ते म्हणजे जीरे. बर्याचदा अनेक लोक जेवणात जिऱ्याचे जास्त सेवन करतात. काही लोकांना त्याचा चहा सुद्धा प्यायला आवडतो, पण तुम्हाला माहीत आहे का की जिऱ्यापेक्षा ही जिऱ्याचे पाणी शरीरासाठी खुप उपयुक्त मानले जाते. हो, जिऱ्याचे पाणी प्यायले तर आरोग्याला खूप फायदा होतो. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर राहण्यास मदत होते. याचे कारण असे आहे की जिऱ्यात फ्लेव्होनॉइड्स असतात, हे अँटीऑक्सिडेंट एक चांगला स्त्रोत आहे कारण ते शरीरातील फ्री-रॅडिकल्स आणि हानिकारक कणांशी लढण्यास मदत करतात, ज्यामुळे अनेक गंभीर आजार होतात. याशिवाय यात अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मदेखील असतात.जिऱ्याच्या पाण्याचे सेवन तुम्ही अगदी केव्हा ही करू शकता पण जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी जिऱ्याच्या पाण्याचे सेवन केले तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रात्री जिऱ्याच्या पाण्याचे सेवन केल्याने चांगली झोप येते, तसेच आरोग्याशी संबंधित इतर अनेक समस्यादूर होतात. आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत जिऱ्याच्या पाणी पिण्याचे फायदे.(Benefits of Jeera Water)
Benefits of Jeera Water: वजन कमी करण्याबरोबरच अनेक समस्या सोडवते जिऱ्याचे पाणी !
56
– जिरे आणि जिऱ्याच्या पाण्याचा एक सर्वात जुना फायदा आहे. तो म्हणजे जिऱ्यात अँटी गॅस केमिकल्स असतात जे गॅसशी संबंधित सर्व समस्या दूर करतात. त्याचबरोबर त्यात असलेले थायमोल आपल्या स्वादुपिंडाला सक्रिय करते आणि पित्तरस बनवण्याची सूचना देते. यामुळे अन्न चांगले पचते.
– जिऱ्याचे पाणी आपल्या शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी काढून टाकते. यामुळे वजन कमी होऊन लठ्ठपणा दूर होतो. जिऱ्यात असलेले पोषक आणि अँटीऑक्सिडंट्स चयापचय वाढवतात, ज्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. हे भूक कमी करते जेणेकरून आपण लवकर वजन कमी करू शकता.
– जर तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी जिऱ्याच्या पाण्याचे सेवन केले तर त्यात असलेले अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. जे व्हायरल इन्फेक्शनपासून तुमचा बचाव करते.
–
– जिऱ्याचे पाणी शरीराला डिटॉक्सिफाई करते, ज्यामुळे सर्व टॉक्सिन्स बाहेर पडतात. यामुळे चयापचय वाढते, जे वजन कमी करण्यासाठी आवश्यक असते. शरीराला डिटॉक्स करून शरीरात नवीन आणि निरोगी पेशी तयार होतात.
– जेव्हा शरीरात लोहाची कमतरता असते तेव्हा अॅनिमियाची समस्या उद्भवते. रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाणही कमी होते, ज्यामुळे रक्त शरीरात पुरेसा ऑक्सिजन पोहोचविण्यास सक्षम नसते . अशा तऱ्हेने या समस्येला सामोरे जाण्यासाठी जिऱ्याच्या पाण्याचे फायदे दिसून येतात. खरं तर जिऱ्यात भरपूर प्रमाणात लोह असतं, जे रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवण्याचं काम करू शकतं. यामुळे अॅनिमियाच्या समस्येवर मात करता येते.
– जिऱ्याचे पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकून आणि रक्त शुद्ध करून त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. यामुळे मुरुम आणि अॅलर्जी इत्यादींपासून आराम मिळतो. त्याचबरोबर त्वचेतही सुधारणा होते.(Benefits of Jeera Water)
===========================
===========================
– पोटॅशियम रक्तदाबामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते, म्हणून जिऱ्याचे पाणी आपल्या शरीरात पोटॅशियमची पातळी राखते आणि आवश्यक इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन तयार करते, म्हणून हृदयरोगाने ग्रस्त लोकांनी जिऱ्याच्या पाण्याचे सेवन केले पाहिजे.
– जिऱ्याच्या पाण्याचे गुणधर्म केसांच्या आरोग्यास चालना देण्याचे काम करू शकतात. जिऱ्यामध्ये असणारे पोषक घटक केसांना मुळांना पोषण देतात, ज्यामुळे केसगळती कमी होऊ शकते. तसेच एका संशोधनात असे म्हटले आहे की, जिऱ्यापासून बनवलेल्या आवश्यक तेलाचे अँटी-फंगल प्रभाव असतात. आणि अँटीफंगल गुणधर्म अँटीडँड्रफसारखे कार्य करू शकतात, ज्यामुळे कोंड्याची समस्या दूर होऊ शकते. ज्यामुळे केसांच्या वाढीस चालना मिळू शकते.
(डिस्क्लेमर: वरील लेख केवळ माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे, यातील कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
previous post