Success Story: आयुष्यात प्रत्येकजण स्वप्न पाहतो. मात्र स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या आयुष्यातील संघर्षांवर मात करुन जो पुढे जातो तोच खरा यशाच्या शिखरावर पोहचतो. जगभरात अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यात मेहनत करुन आज आयुष्यात एक यशस्वी व्यक्ती आहेत. मात्र त्यांच्या यशाची कहाणी ऐकल्यानंतर त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळते. त्यापैकीच एक असलेले म्हणजे गोविंद जायसवाल.
खरंतर गोविंद जायसवाल यांचे नाव अशा आयएएस अधिकाऱ्यांमध्ये घेतले जाते ज्यांनी बालपणापासूनच संघर्ष पाहिला.पण त्याच संघर्षावर मात करुन आज ते यशाच्या शिखरावर पोहचले आहेत. उत्तर प्रदेशातील वाराणसी मध्ये राहणारे गोविंद यांना या पदापर्यंत पोहचण्यासाठी फार संघर्ष करावा लागलाय.
या यशाचे श्रेय ते त्यांचे वडिल आणि बहिणांना देतात. गोविंद यांचे शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून वडिलांनी काही गोष्टींचा त्याग केला. याचेच फळं म्हणून मुलाने सुद्धा आपल्या वडिलांचे आणि परिवाराचे नाव मोठे केले. २००६ च्या बॅचमधील आयएसएस अधिकारी असलेल्या गोविंद जायसवाल यांच्या आयुष्याची इंस्पिरेशनल कथा आपण जाणून घेऊयात.
वर्ष २००५ मध्ये आयएएस गोविंद यांची आई इंदु यांचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले. गोविंद यांचे वडिल एका रिक्षा कंपनीचे मालक होते. त्यांच्याकडे ३५ रिक्षा होत्या. पत्नीच्या उपचारासाठी त्यांना बहुतांश रिक्षा विक्री कराव्या लागल्या. अशा सर्व गोष्टींमुळे त्यांच्यावर गरिबीची परिस्थिती ओढावली गेली. त्यावेळी गोविंद इयत्ता सातवीत शिकत होते. काहीवेळेस गोविंद आणि त्यांच्या तीन बहिणींना केवळ सुकी चपाती खाऊन पोट भरावे लागत होते.
मात्र आपल्या मुलांनी शिकावे यासाठी वडिलांनी नेहमीच कोणतीही कमतरता भासू दिली नाही. त्यावेळी गोविंद यांचा संपूर्ण परिवार काशी मधील अलईपुरा मध्ये १० बाय १२ च्या एका घरात राहत होता. त्यांनी आपल्या तीन ग्रॅज्युएट झालेल्या मुलींच्या लग्नासाठी आपल्याकडे शिल्लक राहिलेल्या रिक्षा विक्री केल्या.
गोविंद जायसवाल यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण उस्मानपुरा येथील एका शासकीय शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी वाराणसीमधील हरिश्चंद्र युनिव्हर्सिटी मध्ये गणितात ग्रॅज्युएशन केले. २००६ मध्ये गोविंद युपीएससी परिक्षेची तयारी करण्यासाठी दिल्लीत आले. गोविंद यांना पॉकेट मनी मिळावा म्हणून वडिलांना जखमा झाल्या होत्या तरीही त्यांनी रिक्षा चालवण्याचे काम केले.(Success Story)
गोविंद यांना पैसे मिळावे म्हणून बहुतांशवेळा वडिल जेवायचे नाहीत. ऐवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या जखमांवर सुद्धा उपचार केले नाहीत. गोविंद दिल्लीत गेले होते पण त्यांनी तेथे कोणता क्लास लावला नव्हता. ते तेथील मुलांचे ट्युशन घ्यायचे. पैसे वाचवण्यासाठी त्यांनी एका वेळेचा जेवणाचा डब्बा आणि चहा बंद केली होती. २००७ मध्ये त्यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात ४८ व्या रँकने ते पास झाले होते.
हेही वाचा- आईचे दागिने गहाण ठेवून सुरु केला होता अगरबत्तीचा बिझनेस, आज 7000 कोटींची कंपनी
बहुतांश लोकांना वाटते की, गोविंद जायसवाल यांनी लव्ह मॅरेज केले. मात्र हे खरं नाहीय. त्यांची पत्नी चंदना सुद्धा एक आयपीएस अधिकारी आहे. या दोघांचे अरेंज मॅरेज झाले आहे. हे नाते गोविंद यांच्या भावोजींनी ठरवले होते. गोविंद यांना चंदना यांची आजी पाहण्यासाठी आली होती. चंदनाच्या परिवाराला गोविंद हे फार आवडले होते. त्यानंतर चंदना आणि गोविंद यांचा विवाह झाला होता.