टेलिव्हिजन क्षेत्रातील दिग्दर्शिका एकता कपूर हिने दमदार टीव्ही सीरियल्स प्रेक्षकांसाठी आणल्या. त्यामुळेच तिला टेलिव्हिजन क्वीन असे म्हटले जाते. एकता कपूर दीर्घकाळापासून टेलिव्हिजनवर राज्य करतेय. जवळजवळ प्रत्येक चॅनलवर तिने दिग्दर्शित केलेल्या सीरियल्स दाखवल्या जायच्या. मात्र सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म आल्यानंतर टेलिव्हिजनवर सीरियल्स, सिनेमे कोणीही फार पाहत नाही.मात्र एक काळ असा होता जेव्हा टीव्ही सीरियल्स, खासकरून एकता कपूरच्या सीरियल्स आवडीने पाहिल्या जायच्या. (Ekta Kapoor Serials)
‘क्योकि सास कभी बहू थी’ असो किंवा ‘कसौटी जिंदगी की’, एकता कपूरने बनवलेल्या डेली सोप प्रेक्षकांना आज ही आठवतात. खरंतर आज सुद्धा टीव्ही इंडस्ट्रीमध्ये एकता अॅक्टिव्ह आहे आणि नव्या सीरियल्स ही घेऊन येते. मात्र तु्म्ही कधी नोटीस केलयं का, एकता कपूर नेहमीच K अक्षराने तिच्या सीरियल्सची नावं ठेवायची. या मागील कारण काय असेल हेच जाणून घेऊयात.
सध्या एकता कपूर आपल्या सीरियल्सची नाव आता थोडी वेगळी ठेवते. मात्र एक काळ असा होता तेव्हा केवळ के शब्दाने सुरु होणाऱ्या सर्व सीरियल्स आपण पहायचो. ऐवढेच नव्हे तर तिने महाभारतावर जेव्हा सीरियल केली होती तेव्हा सुद्धा त्याचे नाव ‘कहानी हमारे महाभारत की’ असे ठेवले होते. जेणेकरुन त्याच्या नावाची सुरुवात के पासून होईल.
नक्की कारण काय?
एकता कपूर एकेकाळी आपल्या हातात खुप अंगठ्या सुद्धा घालायची. काही वेळा तिने याचा उल्लेख सुद्धा केला. तिने असे म्हटले होते की, एकता कपूर ज्योतिष आणि न्युमरोलॉजीवर फार विश्वास ठेवायची. पण यामध्ये किती तथ्य आहे हे कोणालाच माहिती नाही. परंतु एका मुलाखतीत तिला तिच्या सीरियल्स बद्दल विचारले होते. तेव्हा के अक्षरावरून सीरियल्सची नावे ठेवण्यामागील कारण असे सांगितले ती एक अंधविश्वासू नाही तर काही गोष्टींवर तिचा विश्वास आहे. तो तिला बदलायचा नाही. (Ekta Kapoor Serials)
हेही वाचा- ‘ही’ अभिनेत्री सलमानचा करायची तिस्कार… पण सोहेल सोबत होते रिलेशन!!!
एकता हिने टेलिव्हिजन क्षेत्रात ‘मानो या ना मानो’ सीरियलच्या माध्यमातून आपले पाउल ठेवले होते. त्यानंतर २००० मध्ये क्योकि सास भी कभी बहू थी सीरियल केली जी ८ वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होती. त्याचसोबत एकताने कहानी घर घर की, कसौटी जिंगदी की सीरियल्स सुद्धा दिग्दर्शित केल्या. या सीरियल्स गाजल्या. आजही त्या टेलिव्हिजनवर पुन्हा दाखवल्या तरीही प्रेक्षक त्या आवडीने पाहतील.