आयुष्यातील काही क्षण असे असतात जे खुप सुंदर आठवणी देऊन जातात. मात्र काही क्षण असे ही असतात जे आपल्या मनातील जखमा कधीच भरून काढत नाहीत.यामुळे अनेकवेळा डिप्रेशनच्या स्थितीतून जावे लागते. एखाद्या व्यक्तीसोबत कधी कोणती घटना घडेल हे सांगता येत नाही. आयुष्याचा प्रत्येक क्षण हा अनपेक्षित असतो. अशातच हॉलिवूड मधील असे काही कलाकार आहेत ज्यांच्या बद्दल आपण खुप काही ऐकतो, वाचतो. पण अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी ही मनाला धक्का लावून जाते. असेच हॉलिवूडमधील काही कलाकार ज्यांच्या आयुष्यात असे काही भयंकर अपघात झाले आहेत त्यामुळे त्यांचा जीव ही गेला आहे. (Hollywood celebrity deaths)
-मार्था मेन्सफिल्ड
द वेरेन्स ऑफ विरगीनिया सिनेमाच्या शुटिंग दरम्यान तिच्या सोबत असा एक अपघात घडला ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. खरंतर अभिनेत्रीने आपले शुटिंग संपवून कारमध्ये बसायला जाते. त्याचवेळी सिगरेट ओढत असलेल्या एका व्यक्तीच्या चुकीमुळे अभिनेत्रीच्या कॉस्ट्युमला आग लागते. पाहता पाहता आग नियंत्रणाबाहेर जाते. तिचा को-स्टार विलफ्रेडने मार्था हिला त्या आगीतून वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. मात्र अभिनेत्रीचा जीव गेला. तिचे वय अवघे २४ वर्ष होते.
-डॅनी लॉकिन
हॉली डॉली नावाच्या सिनेमात काम करणारे अभिनेते डॅनी लॉकिन यांचा सुद्धा मृत्यू अतिशय वाईट पद्धतीने झाला. त्यांनी पोलिसात कोणीतरी घरात घुसतेय अशी तक्रार केली होती. मात्र जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा अभिनेत्याचा मृतदेह पडला होता. रिपोर्ट्सनुसार त्यांच्यावर १०० वेळा चाकूने वार करण्यात आले होते.
-बॉब क्रेन्स
हा अभिनेता सुद्धा आपल्या घरात मृताव्यस्थेत आढळला होता. त्याचा मृतदेह पाहून असे वाटत होते की, त्याला अतिशय क्रुरपणे ठार करण्यात आले आहे. अभिनेता ज्या बेडवर होता तो पूर्णपणे रक्ताने भिजला गेला होता. बेडवरील उश्या ते भिंतींवर उडालेले रक्त सर्वकाही सांगत होते.
-विकी मोरो
ट्लविलाइट जोन फिल्मच्या शुटिंगदरम्यान एक मोठी दुर्घटना घडली. हॅलिकॉप्टरच्या क्रॅशमध्ये तीन लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामध्ये दोन मुलं सुद्धा होती. त्यांचे वय जवळजवळ सहा-सात वर्ष असेल. एका मुलाचा मृत्यू हॅलिकॉप्टरचा पंखा लागून झाली होती. तसेच हॅलिकॉप्टर मधील अन्य पाच-सहा जण सुद्धा गंभीर जखमी झाले होते.(Hollywood celebrity deaths)
हेही वाचा- वयाच्या 83 व्या बाबा झालेल्या Al Pacino च्या 29 वर्षीय गर्लफ्रेंन्डबद्दल माहितेय का?
-शेरन टेट
वयाच्या केवळ २६ व्या वर्षात या अभिनेत्रीसोबत असे काही झाले ते ऐकून तुम्ही हैराण व्हाल. एखाद्या रागातून अभिनेत्रीची काही जणांनी हत्या केली होती. ते एका संघटना आणि खास विचारसणीची लोक होती. त्यांनी अभिनेत्याला ठार करण्यासाठी त्याच्या शरिराचे तब्बल १६ तुकडे केले होते. आणखी वाईट गोष्ट अशी की, जेव्हा हत्या केली तेव्हा अभिनेत्री ही प्रेग्नेंट होती.