जेव्हा तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करता तेव्हा नव्या प्रोडक्ट्सवर तुम्हाला डिस्ककाउंट जरूर दिला जातो. मात्र जेव्हा ते प्रोडक्ट घरी डिलिवरी होते आणि आपण जे ऑर्डर केलेयं ते येतच नाही तर आपण संतापतो. काही प्रकरणे अशी सुद्धा समोर आली आहेत, ऑनलाईन शॉपिंगवरुन फोन खरेदी केला पण डिलिवरी वेळी साबण आला. अशातच आपण त्याच्या विरोधात तक्रार करण्याचे पर्याय शोधतो आणि रेटिंग ही त्या प्रोडक्ट्सला कमी देतो. (Online Delivery)
मात्र तुम्हाला माहितेय का, तुम्ही असे जरी केले तर काहीही होणार नाही. उलट तुमचेच पैसे पाण्यात जातील. लहान प्रोडक्ट असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू शकतो. मात्र महागडे प्रोडक्टच चुकीचे आले तर काय करावे हेच आपण पाहणार आहोत.
जर तुमच्याकडे चुकीचे किंवा प्रोडक्टचा रिकामा बॉक्स आला असेल तर पॅनिक होऊ नका. तुम्ही तो रिटर्न करू शकता. यासाठी तुम्ही जेथून ऑनलाईन शॉपिंग केली आहे तेथील ऑर्डर डिटेल्स जाणून घ्या, जेव्हा ऑर्डर डिटेल्स तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला सर्वकाही माहिती मिळेल. अशातच तुम्ही ऑर्डर डिटेल तुम्हाला रिटर्न करण्याचा ऑप्शन निवडावा लागेल आणि त्यानुसार तुम्ही प्रोडक्ट रिटर्न करू शकता.
काही वेळेस असे होते की, प्रोडक्ट रिटर्न करण्याचा ऑप्शन नसतो. तरीही तुम्हाला प्रोडक्ट रिटर्न करायचा असेल तर त्यांच्या अधिकृत पेजवर जाऊन कस्टमर केअरच्या क्रमाकांवर तक्रार करावी. तेथे तुमच्या ऑर्डरची सर्व माहिती टाकावी. त्याचसोबत डिफेक्टिव्ह प्रोडक्टचा फोटो सुद्धा तेथे देण्यास विसरू नका.(Online Delivery)
हेही वाचा- Dark Pattern च्या जाळ्यात तुम्ही असे अडकले जाता
प्रोडक्ट ऑर्डर करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
-नेहमीच अधिकृत आणि वेरिफाइड शॉपिंग वेबसाइटच्या माध्यमातून शॉपिंग करा
-या व्यतिरिक्त कोणतेही प्रोडक्ट खरेदी करताना त्याचा रिव्हू आणि फिडबॅक जरूर वाचा. यावरून तुम्हाला कळेल की, प्रोडक्ट नक्की कसे आहे.
-वेबसाइटचे कनेक्शन सुरक्षित आहे की नाही हे सुद्धा तपासा. यासाठी तुम्ही अॅड्रेस बारमध्ये पॅडलॉक सिम्बॉल पाहून आणि वेबसाइटची युआरएल “http://” ऐवजी “https://” पासून सुरु होतेय का हे पहा
-काहीही ऑर्डर करताना नेहमीच रिर्टनचा ऑप्शन आहे का ते सुद्धा पहा. प्रत्येक प्रोडक्टसाठी रिर्टनसाठी एक वेळ दिला जातो
-युपीआय किंवा कार्ड पेमेंटच्या माध्यमातून करताना काळजी घ्या की, तुमची ही माहिती लिक होणार नाही.
-या व्यतिरिक्त एखादे प्रोडक्ट खोलून पाहिल्यानंतर त्याचा व्हिडिओ जरुर तयार करा. यामुळे तुम्हाला पर्सनल डॅमेज किंवा चुकीचे प्रोडक्ट आल्याचे दाखवता येईल