Home » भवन्स महाविद्यालयाच्या मनमानी कारभाराला विद्यार्थी भारती ने दिला दणका…

भवन्स महाविद्यालयाच्या मनमानी कारभाराला विद्यार्थी भारती ने दिला दणका…

by Correspondent
0 comment
Bhavan's College | K Facts
Share

विद्यार्थी भारती च्या दणक्याने विद्यार्थ्यांनची NOC लवकरात लवकर देण्यात येणार असल्याची प्राचार्यांनी दिली कबुली …

विद्यार्थी भारती राष्ट्रीयअध्यक्ष मंजिरी धुरी यांनी भवन्स कॉलेज चे प्राचार्य डॉ.एस.व्ही.राठोड यांना खडे बोल सुनावले तसेच विद्यार्थ्यांनचे प्रवेश रखडण्याचे अधिकार तुम्हला नाही लवकरात लवकर मुलाची NOC देण्यात यावी अन्यथा विद्यार्थी भारती आंदोलन करेल असा इशारा देताच प्राचार्य NOC देण्यास तयार झाले असल्याचे विद्यार्थी भारती राज्यध्यक्षा पूजा मुधाने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सध्या देशात सुरू असलेल्या कोरोनाचा फटका सर्वच स्थारांवर पडला आहे. महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षणाचे काय होणार असा प्रश्न सर्वच विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे. गेले कित्येक दिवस भवन्स महाविद्यालयातील दुसरे आणि तिसऱ्या वर्ष विज्ञान चे विद्यार्थी तणावात होते . महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पाहिजे त्या विषयामध्ये प्रेवेश देण्यासाठी नकार देत होते त्याच बरोबर जर महाविद्यालयात विषय नसेल तर आम्हा विद्यार्थ्यांना किमान दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी NOC देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांननी केली होती परंतु कॉलेज प्रशासन त्याकडे ही दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. पण विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयात प्रवेश देण्यास ही नकार देत असल्याची माहिती काही विद्यार्थ्यांनी विद्यार्थी भारती संघटनेस कळण्यात आल्याची विद्यार्थी भारती राज्यकार्यवाह आरती गुप्ता यांनी सांगितले.

या संदर्भात विद्यार्थी भारतीने संघटनेने दणक्याने विद्यार्थ्यांनची NOC लवकरात लवकर देण्यात येणार असल्याची प्राचार्यांनी कबुली दिली असल्याची माहिती विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी दिली.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.