सफरचंद आणि अन्य पोषक तत्वांनी समृद्ध असे सफरचंद डाएटमध्ये जरुर खाल्ले जाते. यामुळेच हेल्थ तज्ञांनुसार नियमित रुपात सफरचंदाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही काही सफरचंदाचे काही प्रकार ऐकले असतील. त्यामध्ये हिरवे, लाल किंवा गोल्डन सफरचंद असे. पण तुम्ही कधी ब्लॅक सफरचंदाबद्दल ऐकले आहे का? (Black Apple)
खरंतर ब्लॅक अॅप्पल बद्दल फार कमी लोकांना माहितेय. पण ते आरोग्यासाठी फार फायदेशीर मानले जाते. याला ब्लॅक डायमंड किंवा ओब्सीडियन नावाने सुद्धा ओळखले जाते. हे दुर्लक्ष सफरचंद तिब्बेटच्या डोंगरांवर मिळते. याचा रंग डार्क जांभळा ते काळा अशा शेड्स मध्ये असतो. पण त्याची टेस्ट अत्यंत गोड असते.
अन्य सफरचंदाच्या तुलनेत ब्लॅक अॅप्पल अधिक लाभदायक असते. ते स्किन ते कॅन्सरच्या उपचारासाठी वापरले जाते. हे अॅप्पल अत्यंत दुर्मिळ असतात. ते सहज मिळत नाहीत. याच ब्लॅक अॅप्पल बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.
फायबरचा उत्तम स्रोत
या अॅप्पल मध्ये फायबर खुप असते. जे पचनाच्या क्रियेत फार मदत करते. या व्यतिरिक्त गट हेल्थला सुद्धा प्रोत्साहन देते. यामध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा असते, जे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करते. ब्लॅक अॅप्पलमध्ये अधिक फायबर असते याच कारणास्तव पोटासंबंधित आजार ही दूर राहतात.
फंगल इंन्फेक्शनसाठी फायदेशीर
ब्लॅक अॅप्पल खाल्ल्याने कोणत्याही प्रकारचे फंगल इंन्फेक्शन दूर होते. यामध्ये अँन्टी बॅक्टेरियल गुण असतात, जे इंन्फेक्शन वाढण्यापासून दूर ठेवतात. त्याचसोबत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास ही मदत होते.
उर्जा मिळते
ब्लॅक अॅप्पलच्या सेवनाने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. तसेत शरिराला दिवसभर उर्जा ही मिळते. ज्या लोकांना थकवा येत राहतो त्यांनी याचे नियमित सेवन करावे असा सल्ला दिला जातो. (Black Apple)
कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते
शरिरात जर कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत असेल तर ब्लॅक अॅप्पलचे सेवन केले पाहिजे. ब्लॅक अॅप्पलचे सेवन केल्याने शरिरात असलेले हानिकारक कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. या व्यतिरिक्त हार्ट रुग्णाने सुद्धा ब्लॅक अॅप्पलचे सेवन केले पाहिजे.
हेही वाचा- सकाळी ‘हा’ नाष्टा करत असाल तर वेळीच बंद करा…
स्नायू आणि हाडांना बळकटी मिळते
हाडं आणि स्नायू सुद्धा यामुळे बळकट होतात. यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. जे स्नायू आणि हाडं मजूबत करण्यास मदत करते. व्यायाम केल्यानंतर स्नायूंच्या रिकव्हरीसाठी याचे सेवन करणे लाभदायक मानले जाते.