टायटानिकचे अवशेष पाहण्याची उत्सुकता प्रत्येक पर्यटकात असते. ते त्यासाठी मोठी रक्कम देऊन पेमेंट ही करतात. त्यानंतर एका लहानश्या पाणबुडीच्या मदतीने त्याच्या अवशेषांपर्यंत पोहचतात. टायटानिकचे अवशेष हे जवळजवळ ३८०० किमी खोलवर आहेत. अशातच टायटानिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पाच पर्यटकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहेत. असे सांगितले जातेय की, पाणबुडी ही उत्तर अटलांटिक मध्ये बुडाली. (Titanic submarine)
खरंतर ही पाणबुडी ओशिनेट एक्पीडियशंसकडून ऑपरेट करण्यात आली होती. ही कंपनी खोल समुद्रात असे अभियानांचे आयोजन करण्याचे काम करते. या दुर्घटनेनंतर कंपनीची याची जबाबदारी घेतली आहे. पाणबुडीचे अवशेष हे टायटानिक जहाजाच्या अवशेषाजवळच मिळले आहेत.
जगातील सर्वाधिक विशालकाय आणि प्रसिद्ध असे जहाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टायटानिकला बुडून ११० वर्षांपेक्षा अधिक काळ झाला. पण याचे अवशेष १९८५ मध्ये शोधले गेले. अशातच मनात असा प्रश्न निर्माण होतो की, जेव्हा जहाजाचे अवशेष सापडले तेव्हा ते बाहेर का काढले नाहीत?
कधी बुडाले होते टायटानिक?
टायटानिक बद्दल आपण ऐकले असेल किंवा सोशल मीडियात त्या बद्दल ऐकले ही असेल. टायटानिकने आपला पहिला प्रवास ब्रिटेन मधील साउथॅम्पटन बंदरातून न्युयॉर्कसाछी १० एप्रिल १९१२ रोजी आपला प्रवास सुरु केला होता. याच्या ठीक चार दिवसानंतर म्हणजेच १४ एप्रिलला नॉर्थ अटलांटिक महासागराच्या एका हिमखंडाला ते धडकले गेले. या धडकेनंतर जहाजाचे दोन तुकडे झाले आणि ते समुद्राच्या जवळजवळ ४ किमी खोल बुडाले गेले.
१५०० लोकांचा मृत्यू झाला होता
या दुर्घटनेत १५०० लोकांचा मृत्यू झाला होता. ही त्यावेळची सर्वाधिक मोठी समुद्रातील दुर्घटना होती. जवळजवळ ७० वर्षांपर्यंत टाइटानिकचे अवशेष समुद्रात ४ किमी खोल पडूनच होते. जे पहिल्यांदा १९८५ मध्ये रोबट बलाड आणि त्यांच्या टीमने शोधून काढले होते. (Titanic submarine)
मुश्लिक आहे हे काम
जेथे जहाज बुडाले तेथे चारही बाजूला लख्ख काळोख असतो. समुद्राच्या खोलवर तापमान १ डिग्री सेल्सियस असते. तेथे गेल्यानंतर विरुद्ध परिस्थितींचा सामना करत एखाद्या व्यक्तीला तेथपर्यंत पोहणे आणि पुन्हा परत येणे फार जोखमिचे असते. अशातच ते अवशेष बाहेर काढणे सुद्धा फार कठीणच असल्याचे म्हणावे लागेल. खरंतर हे शक्यच नाही.
हेही वाचा- Titanic बद्दलचे ‘हे’ खरे फॅक्ट्स तुम्ही ऐकलेत का?
२०-३० वर्ष टिकतील अवशेष
विशेतज्ञांच्या मते, टायटानिकचे अवशेष हे समुद्रात आता वेगाने नामशेष होत आहेत. ते बाहेर काढून सुद्धा काही फायदा नाही. असे सांगितले जाते की, येणाऱ्या २०-२० वर्षांमध्ये पूर्णपणे नामशेष होतील. समुद्रात असणारे बॅक्टेरिया ते अवशेष खात असल्याने त्याला वेगाने गंज ही पकडतोय. बीबीसीच्या एका रिपोर्ट्सनुसार, हे समुद्रातील बॅक्टेरिया दररोज जवळजवळ १८० किलोचे अवशेष खात आहेत. यामुळेच टायटानिकचे अवशेष दीर्घकाळ टिकून राहणार नाहीत. अशातच ते बाहेर काढून सुद्धा काही फायदा नाही.