भारतात काही प्रकारचे कुकिंग ऑइल उपलब्ध आहेत. ऐवढे प्रकार असल्यामुळे शरिरात तेल कोणत्या ना कोणत्या रुपात पोहचते. तेल कमी खाण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तसे होत नाही. भारतातील लोकांची जेवण बनवण्याची पद्धत सुद्धा फार वेगळी आहे. आपण बहुतांश पदार्थांमध्ये तेल वापरतोच. त्यामुळे आपण जे तेल वापरतो ते आरोग्यासाठी खरंच सुरक्षित आहे का? याचा विचार कधी केलायं का? तर तुम्ही घरात जे तेल वापरत आहात जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी किती लाभदायक आहे हेच आपण जाणून घेऊयात. (Cooking oil for heart)
बहुतांश डाएटमध्ये आपल्याला फॅटला अवॉइड करायचे असते. परंतु काही हेल्दी फॅट्स शरिसाठी लाभदायक असतात जे आपण खाल्लेच पाहिजेत. तुम्हाला माहिती असले पाहिजे की, ज्या तेलामध्ये मोनो अन सॅच्युरेटेड आणि पोली अन सॅच्युरेटेड फॅट असतात ते हेल्दी फॅट्स असतात. परंतु ज्यामध्ये सॅच्युरेटेड आणि ट्रांन्स फॅट असतात असे तेल तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असतात. कुकिंग ऑइल बद्दल जेव्हा बोलले जाते तेव्हा त्याच्या प्रमाणाकडे खास लक्ष दिले पाहिजे. कारण अधिक प्रमाणात तेलाचे सेवन केल्याने शरिरात कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरसारख्या समस्या उद्भवू शकतात. ज्या हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.
उत्तम कुकिंग ऑइल कसे निवडाल?
हृदयासाठी बेस्ट ऑइल तेच असते ज्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण कमी अशते. प्रत्येक ऑइलचा एक वेगवेगळा स्मोकिंग पॉइंट असतो. काही तेल अधिक गरम करावे लागतात तर काही कमी प्रमाणात. अथवा काही असे ही असतात जे गरमच करावे लागत नाहीत. स्मोकमुळे टॉक्सिक फ्यूल, फ्री रेडिकल्स जसे की, हानिकारक तत्व बाहेर पडतात. त्यामुळे ज्या तेलाचा स्मोकिंग पॉइंट अधिक असेल तेच तुमच्या आरोग्यासाठी अधिक हानिकारक असेल.
कोणत्या तेलाचा वापर केला पाहिजे?
-उच्च स्मोक असणारे तेल जसे की, बदाम, हेजल नट, सन फ्लॉवर किंवा रिफाइंड ऑलिव्ह पासून तयार करण्यात आलेले तेल डीप फ्राइंगसाठी वापरु शकता.
-बेकिंग, कुकिंग आणि स्टिर फ्राइंगसाठी तुम्ही कॅनोला, ग्रेप सीड आणि ऑलिव्ह ऑइलचा वापर करा.
-कॉर्न ऑइल, भोपळ्याचे तेल किंवा सोयाबिन तेल हे लो हिट बेकिंग किंवा सॉससाठी बेस्ट आहेत
-अळशीचे तेल, अक्रोडचे तेल आणि गव्हाच्या भूस्यापासून तयार करण्यात आलेले तेल कुकिंगसाठी वापरु नये. हे केवळ ड्रेसिंगसाठी असते. त्यांना हिट केले जात नाही. (Cooking oil for heart)
हेही वाचा- ‘झुचिनी’ भरपूर जीवनसत्त्व असलेली भाजी…
अशा प्रकारे सर्व तेल तुम्ही घरी आणले तर बेस्टच आहे. परंतु ऑलिव्ह ऑइलचा कुकिंगसाठी अधिक वापर करावा. जेणेकरुन कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढला जाणार नाही.