पावसाळा सुरु झाला की विविध आजार पसरू लागते. घाणीचे साम्राज्य अधिक वाढले जातात. अशातच मलेरिया, डेंग्यू असे आजार उद्भवतात. त्याचसोबत माश्या-मच्छर यांचे प्रमाण वाढले जाते. अशातच घरात येणाऱ्या माश्यांचा तर फारच त्रास होतो. त्यांच्यापासून सुटका मिळवण्यासाठी आपण विविध उपाय ही करतो तरीही त्या काही केल्या जात नाहीत. परंतु आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या घरातील पावसाळ्यात अचानक वाढल्या जाणाऱ्या माश्यांना तुम्ही कसं दूर कराल याच बद्दल अधिक. (Insects problem in monsoon)
कापूरचा वापर करा
माश्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कापूरचा वापर करु शकता. यासाठी दहा-बार कापूरच्या वड्या घेऊन त्याची पूड तयार करा. आता ही पूड एक लीटर पाण्यात मिक्स करुन एक स्प्रे तयार करा. असे केल्यानंतर हा स्प्रे अशा ठिकाणी करा जेथे माश्या अधिक येतात.
विनेगरचा वापर
माश्यांना घरातून पळवण्यसाठी तुम्ही विनेगरचा वापर करु शकता. यासाठी एका वाटीत अॅप्पल साइडर विनेगर घ्या. त्याचे दहा-बारा थेंब निलगिरीच्या तेलात मिक्स करा आणि स्प्रे तयार करा. हा स्प्रे घरात तुम्ही सर्वत्र स्प्रे करु शकता.
तुळस
तुळशीची पान सुद्धा तुम्हाला माश्यांना घरातून दूर घालवण्यासाठी मदत करतील. यासाठी तु्म्ही थोडी तुळशीची पानं घ्या आणि ती बारीक वाटा. आता त्याची पेस्ट तयार झाल्यानतर पाण्यात मिक्स करुन स्प्रे बॉटलमध्ये भरा. हा स्प्रे तुम्ही दररोज सुद्धा घरात स्प्रे करु शकता.
दालचिनी
दालचिनीच्या मदतीने तुम्ही माश्यांपासून सुटका मिळवू शकता. यासाठी तुम्हाला दालचिनीची पूड तयार करावी लागेल. ही पूड घरात तुम्ही माश्या येत असलेल्या ठिकाणी स्प्रे करा.
मीठाचे पाणी
मीठाच्या पाण्याचा वापर करुन तुम्ही माश्यांना घरात येण्यापासून रोखू शकता. यासाठी तुम्हा मीठ हे पाण्यात मिक्स करुन त्याचा स्प्रे तयार करा. हवं असेल तर मीठाच्या पाण्याने घरातील फर्शी सुद्धा पुसू शकता. (Insects problem in monsoon)
हेही वाचा- पिवळी हळद चक्क निळ्या रंगात
मिर्ची पावडर
मिर्ची पावडर ही माश्यांना दूर पळवण्यासाठी कामी येऊ शकते. यासाठी तुम्ही चार-पाच चमचे लाल मिर्ची पावडर घेऊन ती पाण्यात मिक्स करा. आता ते पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. लक्षात ठेवा जेव्हा हा स्प्रे तुम्ही वापराल तेव्हा तुमच्या डोळ्यांपासून दूर असावा. तसेच लहान मुलांपासून ही दूर ठेवावा.