अल्कोहोल ही दीर्घकाळापासून पुरुष मक्तेदारी असणारी इंडस्ट्री आहे. परंतु अलीकडल्या काळात भारतात अल्कोहोलच्या ब्रँन्ड्स मध्ये महिला सुद्धा टॉप लिस्टवर असून त्या आपला हा व्यवसाय अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चालवत आहेत. या बिझनेस वुमन्सनी पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या जगात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केलीयं. तर जाणून घेऊयात भारतीय अल्कोहोल ब्रँन्ड्सच्या महिला बिझनेस वुमन्स बद्दल अधिक. (Indian alcohol brands)
-कस्तुरी बनर्जी (मका जाई रम, फाउंडरस्ट्रेंजर)
कस्तुरी बनर्जी या भारतातील पहिल्या गोल्ड रम Stilldistilling Spirits च्या फाउंडर आहेत. त्यांनी माका जाई रम लॉन्च करण्यापूर्वी त्या १४ वर्ष बँकर होत्या, वाइन, स्पिरिट आणि बाटरटेंडिंगमध्ये आवड असल्याने त्यांनी आपली नोकरी सोडली. त्यानंतर सहा महिने बारटेडिंगचा कोर्स केला आणि मुंबईत आपले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी इंटर्नशीप ही केली. त्यानंतर २०२० च्या सुरुवातीला त्यांनी Stilldistilling Spirits लॉन्च केले आणि माका जाई रम त्यांचे पहिले प्रोडक्ट ठरले. ही रम गोव्यात तयार केली जाते. पण त्यासाठी लागणारी सामग्री ही संपूर्ण भारतातून आणली जाते. भारतातील ही सर्वाधिक नामांकित ब्रँन्ड्स पैकी एक असल्याचे म्हटले जाते.
साक्षी सहगल ( स्ट्रेंजर अॅन्ड संस, को-फाउंडर)
साक्षी सहगल या अत्यंत लोकप्रिय जिन स्ट्रेंजर अॅन्ड संसच्या को-फाउंडर आहेत. त्याची आवड अशावेळी वाढली तेव्हा त्या स्पेनमध्ये बार्सिलोनात आपले शिक्षण पूर्ण करत होत्या. आजूबाजूला बार खुप प्रमाणात असल्याने त्यांना एक प्रश्न पडायचा की, भारतात असे का नाही. त्यांनी भारतीय मार्केट बद्दल रिसर्च सुरु केला आणि भारतात आपली स्वत:ची जिन लॉन्च केली. २०१८ मध्ये साक्षी यांनी नवरा राहुल मेहरा आणि आपला चुलत भाऊ विदुर गुप्ता सोबत मिळून स्ट्रेंजर अॅन्ड संसची स्थापना केली. आजच्या काळात भारतातील युनिक अल्कोहोल ब्रँन्ड्स पैकी ती एक आहे. यामध्ये भारतीय फ्लेवर्सचे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे.
-वर्ना भट्ट (रहस्य वोडका, फाउंडर)
वर्ना भट्ट एक एल्को-बेवरेज कंपनी ब्लिसवॉटर इंडस्ट्रीच्या फाउंडर आहेत. या कंपनीने रहस्य वोडका २०२० मध्ये लॉन्च केला. वर्ना भट्ट यांनी आतापर्यंत तीन कंपनीची स्थापना केली आहे. त्यांच्या आई-वडिलांना त्यांनी सिविल सर्वेंट बनवायचे होते. पण त्यांची आवड वेगळीच होती. त्या भारतीय अल्कोहोल इंडस्ट्रीवर रिसर्च करत होत्या. तेव्हा त्यांना कळले की, भारतात वोडका कोणीही बनवत नाही. यावरुन त्यांनी ब्लिसवॉटर इंडस्ट्रीची स्थापना केली. (Indian alcohol brands)
-योगिनी बुधकर आणि अश्विनी देवरे (सेरेना मीड्स)
डॉक्टर अश्विनी देवरे आणि डॉक्टर योगिनी बुधकर यांचा ब्रँन्ड सेरेना मीड्स खुप प्रसिद्ध आहे. या दोघांनी मुंबईतील इंस्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मधून फूड इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नोलॉजी डिपार्टमेंट मधून डॉक्टरेटची डिग्री मिळवली. योगिनीने बायोटेक्नॉलॉजी मध्ये स्पेशलाइजेशन केले. तर अश्विनी यांनी बायो-प्रोसेस टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी केली. या दोघींनी आपली आवड सत्यात उतरवण्यासाठी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा- ‘या’ रेस्टॉरंटमध्ये मिळतात सेलिब्रिटींच्या नावे स्वादिष्ट डिशेज
-देविका भगत (तामरस जिन, फाउंडर)
आपल्याकडे देसी जिन सुद्धा मिळते, जी गोव्यात तयार केली जाते. या जिन ब्रँन्डच्या सह-संस्थापन देविका भगत आहेत. त्या एक स्क्रिनराइटर सुद्धा आहेत. 2008 पर्यंत त्या जिन घ्यायच्या नाहीत केवळ वोडका त्यांना आवडायचा. सुरुवीताला जिन थोडी ट्राय केली पण नंतर ती फार आवडू लागली. यावरुन त्यांनी जिन ब्रँन्ड तयार करण्याचे ठरविले. ही जिन तयार करण्यासाठी जवळजवळ १६ वनस्पति सामग्रीचा वापर केला जातो. त्यामध्ये काळी आणि हिरवी वेलची, बडीशोप, काळी मिरी, कमळाच्या बिया, द्राक्ष, निलगिरी चहा, भारतीय पुदीना, धणे आणि मोसंबिचा समावेश आहे.