Home » थंड की गरम पाणी, अंघोळीसाठी बेस्ट पर्याय कोणता?

थंड की गरम पाणी, अंघोळीसाठी बेस्ट पर्याय कोणता?

by Team Gajawaja
0 comment
hot water vs cold water bath
Share

शरिर स्वच्छ रहावे म्हणून आपण नियमित अंघोळ करतो. परंतु अंघोळ करताना आपण नेहमीच कंफ्युज असतो की, त्वचेसाठी नक्की कोणते पाणी बेस्ट पर्याय आहे, थंड की गरम? खरंतर पाण्याचे तापमान ऋतूनुसार अनुकूल असले पाहिजे. परंतु तरीही तुम्ही कंफ्युज असाल तर चिंता करु नका. आम्ही आज तुम्हाला याचेच उत्तर देणार आहोत. (Hot water vs cold water bath)

अंघोळीचे फायदे
पाणी थंड असो किंवा गरम, पण अंघोळ करणे फायदेशीर असते. नियमित रुपात अंघोळ केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य हेल्दी राहते. तु्म्ही दररोज अंघोळ करता तेव्हा तणाव आणि चिंता त्यावेळी दूर होते. त्याचसोबत अंघोळ करताना शरिराचे तापमान हे सामान्य होते. यामुळे ब्लड सर्कुलेशन ही उत्तम पद्धतीने होते आणि तुम्हाला सांधे आणि स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळण्यास मदत होते.

थंड पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे
-स्नायूंना आराम मिळतो
गरम पाण्याच्या तुलनेत थंड पाण्याने अंघोळ करणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते. रिसर्चनुसार थंड पाण्यात रिजनरेटिव्ह गुण असतात. ते स्नायूंना आराम देण्याचे कार्य करतात. त्याचसोबत तुम्हाला धावपळीच्या आयुष्यात स्नानूंयवर पडणारा ताण की करते.

-ब्लड सर्कुलेशन वाढते
थंड पाण्याने अंघोळ केल्यास सेलुलर स्तर स्नायूंना आराम देण्याचे काम करते. त्याचसोबत याच्या मदतीने संपूर्ण शरिरात ब्लड सर्कुलेशन उत्तम पद्धतीने होते. तसेच हृदयाचे आरोग्य हेल्दी राहण्यास ही मदत होते.

-फॅट बर्न होतात
थंड पाण्याने अंघोळ केल्याने अतिरिक्त फॅट बर्न केले जाऊ शकतात. खरंतर खंड पाण्याने अंघोळ केल्याने आपले शरीर सिस्टिमला गरम ठेवण्यासाठी आपल्या शरिरात असलेल्या वसा कोशिकांना बर्न करण्यास सुरुवात करते. या कोशिका, त्यांना ब्राउन फॅटच्या रुपात ही ओळखले जाते. ब्राउन फॅट ब्रेक झाल्यास शरिर गरम राहण्यास मदत मिळते. याचा परिणाम असा होतो की, अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत होते. (Hot water vs cold water bath)

hot water vs cold water bath
hot water vs cold water bath

थंड पाण्याने अंघोळ केल्याने होणारे नुकसान
थंड पाण्याने अंघोळ करण्याचे काही फायदे आहेतच. पण तोटे सुद्धा आहेत. जर तुम्हाला सर्दी, खोकला, ताप येत असेल तर थंड पाण्याने अजिबात अंघोळ करु नका. असे करणे आरोग्यासाठी योग्य नाही. त्याचसोबत काही अभ्यासातून असे समोर आले आहे की, थंड पाण्याने अंघोळ केल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते आणि तुम्ही आजाराशी लढताना समस्या येते.

गरम पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे
-स्नायू अॅक्टिव्ह होतात
गरम पाण्याने अंघोळ केल्यास स्नायू अॅक्टिव्ह होतात. ते आपल्या पॅरासिम्पेथेटिक तंत्रिका तंत्राला अॅक्टिव्ह ठेवतात. ज्यामुळे शरिराला आराम मिळतो. त्याचसोबत गरम पाणी स्नायूंवर पडणारा अधिक जोर कमी करुन आराम देतो.

-सर्दी-खोकल्यापासून दिलासा
गरम पाण्याने अंघोळ केल्यास सर्दी-खोकल्यासारख्या समस्या दूर होतात. अशावेळी थंड पाण्याऐवजी गरम पाण्याने अंघोळ करावी.

-रोमछिद्र उघडण्यास मदत
गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचेवरील रोमछिद्र खुली होतात. त्यामुळे त्वचेवरील अतिरिक्त घाण आणि तेल दूर होते. परंतु अधिक गरम पाण्याने अंघोळ केल्यास स्किन ड्राय होऊ शकते. त्यामुळे जेव्हा गरम पाण्याने अंघोळ कराल त्यानंतर लगेच मॉइस्चराइजर जरुर लावा. (Hot water vs cold water bath)

हेही वाचा- केसांना शॅम्पू लावताना तुम्ही सुद्धा ही चुक करता का?

गरम पाण्याने अंघोळ करण्याचे तोटे
गरम पाणी तुमच्या स्किनवरील सीबमच्या लेअरला नुकसान पोहचवते. जो तुमच्या त्वचेवर ओलावा आणि कॅराटिन कोशिका तयार करण्यास मदत करतो. अशा स्थितीत कोशिकांच्या सॉफ्टनेसला लॉक करणे मुश्किल होते. तसेच जर तुम्ही दररोज गरम पाण्याने अंघोळ करत असाल तर यामुळे त्वचा अधिक ड्राय होते. अशातच स्किनला सूज येणे, जळजळ होणे अशा शक्यता निर्माण होऊ शकतात. गरम पाणी तुमच्या स्किनच्या गुणवत्तेसाठी फायदेशीर मानले जात नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.