लग्न, फंक्शन किंवा एखाद्या पार्टीसाठी एलिगेंट लूक हवा असेल तर साडी बेस्ट ऑप्शन ठरु शकतो. परंतु प्रॅक्टिसशिवाय ती नेसणे फार मुश्किल होते. जर साडी व्यवस्थितीत नेसली गेली नाही तर तुमचा लूक यामुळे नक्कीच बिघडू शकतो. अशातच तुम्ही परफेक्ट साडी नेसण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सध्या बाजारात रेडी टू वेअर साड्यांना ट्रेंन्ड सुरु आहे. त्या नेसणे अगदी सोप्पे झाले असून काही मिनिटांत तुम्ही त्या नेसू शकतात. मार्केटसह तुम्ही त्या ऑनलाईन पद्धतीने सुद्धा खरेदी करु शकता. यामध्ये पल्लू ते साडीचे प्लेट्स आधीच तयार करुन स्टिच केलेल्या असतात. केवळ तुम्हाला त्या स्कर्ट प्रमाणे घालायच्या असतात. अशातच तुम्ही सुद्धा रेडी टू वेयर साडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पुढील काही टीप्स जरुर लक्षात ठेवा. (Ready to wear saree)
फंक्शननुसार निवडा साडी
फंक्शननुसार आपल्या ड्रेसची निवड करणे हे परफेक्ट लूकची पहिली पायरी आहे. जर एखाद्या मोठ्या फंक्शनला जात असाल तर सिंपल रेडी टू वेयर साडी नेसणे थोडं विचित्र ठरेल. कारण रेडी टू वेयर साड्या बहुतांशकरुन सिंपल फॅब्रिकमध्ये येतात. तरीही तुम्हाला रेडी टू वेयर साडी नेसायची असेल तर नाईट पार्टीमध्ये डार्क रंगाच्या साडीची निवड करा. याचसोबत हैवी ज्वेलरी घाला.

आपल्या कंबरेनुसार साडी घ्या
रेडी टू वेयर साडी खरेदी करायची असेल तर तुमच्या कंबरेच्या साइजची जरुर पहा. जर कंबरेच्या साइजनुसार ती घेतली नाही तर फिटिंग व्यवस्थितीत होणार नाही. त्यामुळे साइज तपासून पाहणे गरजेचे आहे.
पदर किती लांब आहे ते पहा
साडी कितीही सुंदर असली तरीही त्याचा पदर ही तितकाच महत्वाचा असतो. साडीचा पदर लहान असेल तर तुमचा लूक बिघडतो. यामुळे याकडे खास लक्ष द्या. आजकल लांब पदर फार ट्रेंन्डमध्ये आहे. जर तुम्ही मार्केटमधून साडी खरेदी करत असाल तर पदराची लांबी सहज तपासून पाहू शकता. मात्र ऑनलाईन पद्धतीने खरेदी करत असाल तर साडीबद्दलचा रिव्यू जरुर वाचा. (Ready to wear saree)
ब्लाउज फिटिंग सुद्धा पहा
साडीचा लूक तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा परफेक्ट फिटिंगचे ब्लाउज तुम्ही निवडता. त्यामुळे साडी खरेदी करण्यासोबत ब्लाउजच्या फिटिंगकडे ही लक्ष द्या. त्याचसोबत हे सुद्धा पहा की, ब्लाउज साडीचा लूक तर बिघडवत तर नाही ना? जर तसे होत असेल तर दुसरे ब्लाउज निवडा.
हेही वाचा- उन्हाळ्यात चुकूनही घालू नका ‘या’ फॅब्रिक्सचे कपडे
शिवून ही मिळेल रेटी टू वेयर साडी
असे नव्हे की, रेडी टू वेयर साडी केवळ मार्केट किंवा ऑनलाईनच खरेदी करु शकता. तर तुम्ही ती टेलर कडून ही तुम्हाला हवी तशी शिवून घेऊ शकता. याचा एक फायदा असा होतो की, घरातील आजीसाठी जर साडी घ्यायची झाली तर तुम्ही हा पर्याय तिच्यासाठी निवडू शकता.