संयुक्त अरब अमीरात म्हणजेच UAE ची राजधानी दुबई जगभरातील व्यापार आणि पर्यटनाचे एक प्रमुख केंद्र आहे. काही वर्षांपासून येथे जगातील काही देशांमधील लोकांसाठी धरतीवर स्वर्ग मिळाल्याचे मानले जातेय. येथील टोलेजंग इमारती, लाइफस्टाइल ते फूड्स पर्यंतच्या अशा विविध गोष्टी प्रत्येकाला आकर्षित करत आहे. एका आकडेवारीनुसार येथे २०० पेक्षा अधिक देशांमधील लोक राहत आहे. यामुळेच दुबईला विविध संस्कृतीचे शहर असे म्हटले जात आहे.दुबईत भारत आणि पाकिस्तानातील लोकसंख्या वाढली आहे. मात्र असे मानले जातेय की, २०२३ मध्ये याच लोकसंख्येत फार मोठी वाढ झाली आहे. भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशातील लोकसंख्या येथे प्रचंड वाढली गेलीय. (Dubai migration)
दुबईत का वाढतेय लोकसंख्या?
असे मानले जात आहे की, पाकिस्तानातील राजकीय अस्थितरतेमुळे दुबईत पाकिस्तानी लोकसंख्या आधीच्या तुलनेत अधिक वाढत आहे. तर कोरोनांतर या ठिकाणी भारतीय लोकसंख्या ही वाढली गेली आहे. खरंतर कोरोना व्हायरसच्या परिस्थितीनंतर युएईतील शहरातील प्रवाशांच्या पॅटर्नमध्ये मोठ्या प्रमाणात बदलझाला आहे. आजच्या तारखेला २०० पेक्षा अधिक देशांच्या नागरिकांनी संयुक्त अरब अमीरात मध्ये आपले तळ ठोकले आहे. भविष्यात हिच लोकसंख्या अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
२०२३ मध्ये संयुक्त अमीरातची लोकसंख्या १०.१७ मिलियनवर आली आहे. ज्यामध्ये २०२२ च्या तुलनेत ०.८९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.शासकीय आकडेवारीनुसार मे २०२३ पर्यंत दुबईतील लोकसंख्या ३.५७ मिलियन होती. तर २०२३ मध्ये संयुक्त अमीरात मध्ये आता पर्यंत प्रवाशांची संख्या ९.० मिलियन झाली आहे.
दुबईत किती पाकिस्तानी आणि भारतीय
ग्लोबल मीडिया साइट.कॉमच्या मते २०२३ मध्ये आता पर्यंत संयुक्त अरब अमीरात मध्ये भारतीय प्रवाशांची संख्या २.८० मिलियन आहे. तर २०२३ मध्ये आता पर्यंत पाकिस्तानी नागरिकांची संख्या १.२९ मिलियन आहेय म्हणजेच पाकिस्तानी लोकसंख्येच्या तुलनेत भारतीय येथे अधिक आहे. परंतु सध्याच्या काळात पाकिस्तान मधून पलायन अधिक झाले आहे. दुबई असो किंवा लंडन, राजकीय अस्थिरता आणि आर्थिक कारणांमुळे या शहरातील श्रीमंत पाकिस्तानी प्रवाशांची संख्या वाढली आहे. (Dubai migration)
अन्य देशाबद्दल बोलायचे झाल्यास तर बांग्लादेशी प्रवाशांची संख्या येथे ०.७५ मिलियन आहे. तर चीन ०.२२ मिलियन आहे. सर्व देशातील प्रवाशांच संख्या ९ मिलियन आहे.
UAE ची लोकसंख्या २००० मध्ये फक्त ३.१३ मिलयन होती, जी २०१० मध्ये दुप्पट होऊन ८.५४ मिलियन झाली. त्याच वेळी, दहा वर्षांनंतर, २०२० मध्ये, येथील लोकसंख्या ९.८९ मिलियन झाली आणि नंतर २०२३ मध्ये ही संख्या १०.१७ मिलियन झाली.
हेही वाचा- अमेरिका रासायनिक शस्त्रे नष्ट करणार…
UAE चे सर्वात मोठे वैशिष्ट्य काय आहे?
येथील राहणीमान अतिशय चांगले मानले जाते. याला श्रीमंतांचा देश म्हणतात. आधुनिक, लक्झरी सुविधा आणि व्यवसाय हे येथील सर्वात मोठे आकर्षण आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे पैसे कमवण्यासाठी आणि आराम करण्यासाठी येतात. अशी बातमी आहे की २०२३ नंतर, सरकार येथे अशी आणखी आकर्षण केंद्रे उभारणार आहे, जेणेकरून येथे पर्यटनाला चालना मिळेल.