नव्या नात्याता सुरुवातीला नक्की काय बोलावे आणि कशावर बोलायचे असे विविध टॉपिक्स असतात. एकमेकांची आवड-निवड, मित्रपरिवार, यांच्यांबद्दल जाणून घेण्याची एकमेकांना फार उत्सुकता असते. एकमेकांच्या सर्वच गोष्टी शेअर करणे फार आवडत असते. परंतु दीर्घकाळ नाते टिकवून ठेवायचे असेल तर काही गोष्टींची काळजी तर घ्यावीच लागते. अशातच जर तुम्ही सुद्धा पहिल्यांदाच रिलेशनशिपमध्ये आला असाल तर पुढील काही गोष्टींची जरुर काळजी घेतली पाहिजे. (Relationship Tips)
एकत्रित वेळ घालवा
रिलेशनशिप गुरु असे सांगतात की, तुम्हाला जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ एकमेकांसोबत घालवा. जेणेकरुन तुम्ही दोघं एकमेकांना उत्तम पद्धतीने जाणून घ्याल. यासाठी गरजेचे नाही की, तुम्ही प्रत्येकवेळी एकत्रित फिरले पाहिजे. तुम्ही एकत्रित भेटून काही गोष्टींवर बोलले पाहिजे. वॉकला जायला पाहिजे. एकत्रित कुकिंग करणे अशा काही गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत.
एकमेकांच्या गरजा विचारा
तुम्ही तुमच्या पार्टनरला वेळोवेळी विचार रहा की, त्याला काय आवडते. त्याच्या गरजा काय आहेत. जेणेकरुन तुम्हाला त्याला उत्तम पद्धतीने समजून घेऊ शकता. तसेच पार्टनर सोबत भावनिक रुपात ही जोडले जाऊ शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरची त्याच्या वाईट काळात मदत केली तर ती त्याच्या नेहमीच लक्षात राहिल.
तुमच्या भावना व्यक्त करा
नव्याने जेव्हा नात्यात येता तेव्हा पार्टनर सोबत सर्वच गोष्टी शेअर कराव्यात असे वाटत राहते. अशातच तुम्ही त्याच्याशी तुमच्या भावना जसे की, राग, भीती अशा गोष्टी ही शेअर करा. पार्टनर जेव्हा सोबत असेल तेव्हा तुम्हाला कसे वाटते आणि तो सोबत नसेल तर कसे वाटते अशा काही गोष्टी जरुर पार्टनरशी शेअर करा. मनातील भावना थेट बोलता येत नसतील तर त्याच्याशी फोनवरुन बोला.
राग व्यक्त करण्याची एक पद्धत ठेवा
जर तुम्ही खुपच रागात असाल तर रिलेशनशिपच्या सुरुवातीलाच पार्टनरला वाईट वाटेल तसे बोलू नका. स्वत: कूल डाऊन व्हा. एखाद्या गंभीर विषयावर बोलण्यासाठी पार्टनरकडे वेळ मागा. एकमेकांना न दुखवता तुम्ही तुमचा राग व्यक्त करु शकता. तुम्ही सॉरी बोलून ही तुमच्या मनातील गोष्ट पार्टनरला बोलू शकता. (Relationship Tips)
हेही वाचा- Dating App चा वापर करताना अशी घ्या काळजी
कॉम्लीमेंट जरुर द्या
पार्टनरला त्याच्या कामाबद्दल कौतुक करण्यास विसरु नका. अशा प्रकारे निगेटिव्ह सेल्फ इमेज दूर होईल आणि पार्टनरला तुमच्या मनातील सकारात्मक विचार कळतील.