कोरोनाची दोन-अडीच वर्ष ही अत्यंत कठीण होती. काहींना या दोन वर्षातील अनुभव नकोसा वाटतो. तर काहींनी या दोन वर्षात अशा अनेक गोष्टी केल्या की, ज्या कधीही शक्य वाटत नव्हत्या. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे, घराच्या खिडक्यांमध्ये फुलवलेली छोटी बाग. अगदी कोथिंबीर, पुदिना पासून सॅलेडमध्ये वापरण्यात येणा-या लेट्यूसची लागवडी अनेकांनी यशस्वी केली. लेट्यूस हा भाजीचा प्रकार असला तरी त्याची पानं कधीही शिजवली जात नाहीत. लेट्यूसचा (Lettuce) वापर वेगवेगळ्या प्रकारच्या सॅलेडमध्ये करण्यात येतो. तसेच बर्गर, पिझ्झा, सॅण्डविच पास्तामध्ये त्याचा मोठ्याप्रमाणात वापर करण्यात येतो. ही लेट्यूसची पानं हिरव्या, जांभळ्या रंगाची असतात. कोबीसारखा या लेट्यूसचा आकार दिसतो. पण त्याची पानं मोकळी असतात. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांना लेट्यूसला (Lettuce) आपल्या घरातील कुंड्यांमध्ये यशस्वीरित्या उगवले. काहींनी तर पाईप शेतीचे छोटे मॉडल आपल्या बाल्कनीत किंवा ओपन टेरेसमध्ये उभारले आणि त्यात लेट्यूस मोठ्या प्रमाणात तयार केला. नित्याच्या आहारात ही लेट्यूसची पानं अतिशय उपयोगी असतात. त्यामुळे शरीरातील फॅट्सवर नियंत्रण राहते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही लेट्यूसचा (Lettuce) वापर केलेले सॅलेड खाल्ले जाते. पहिल्यांदा लेट्यूस ठराविक अशा मॉलमध्ये मिळत असत. मात्र आता त्याची शेती वाढल्यानं लेट्यूस सर्वत्र मिळू लागले आहेत. या हिरव्या आणि जांभळ्या पानांची लागवड जशी फायदेशीर आहे, तसेच आहारात त्याचा नित्यनियमानं समावेश असेल तर तो फायदेशीर ठरतो.

लेट्युसला (Lettuce) केवळ भारतीय बाजारपेठेतच नाही तर परदेशी बाजारपेठेतही मोठी मागणी आहे. बर्गरमध्ये या लेट्यूसच्या पानांचा मोठ्याप्रमाणात वापर केला जातो. परदेशात लागवड होणारी ही लेट्यूस आता भारतातही मोठ्या प्रमाणात तयार होत आहे. लेट्यूसचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यासाठी फारशी जागा लागत नाही. तसेच पाण्याचेही प्रमाण मर्यादीत लागते. त्यामुळे अगदी घराच्या टेरेसमध्येही लेट्यूसची शेती करता येते. मध्यप्रदेश आणि गुजराथमध्ये असे प्रयोग झाले आहेत. घरात टेरेसवर लेट्यूस लावून त्याची बाजारात विक्री करण्यात येत आहे. पाईप तंत्रज्ञानावर एकदा खर्च करावा लागतो. त्यानंतर या लेट्यूस शेतीसाठी फार खर्च होत नाही. त्यामुळे शेतकरी याकडे आ आणि अमिनो अॅसिड्स सारखे पोषक तत्व असलेल्या या पानांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला हल्ली डॉक्टरांकडून देण्यात येतो. त्यामुळे त्याची मागणी वाढली आहे. पर्यायानं शेतक-यांनाही योग्य भाव मिळत आहे.
लेट्यूस (Lettuce) लावण्यासाठी थोडा सूर्यप्रकाश आणि वालुकामय चिकणमाती योग्य ठरते. अगदी सात दिवसात ही लेट्यूस तयार होतात. त्याची योग्य वेळी काढणी केली तर त्याला बाजारात चांगला भाव मिळतो. लेट्यूसच्या चांगल्या पानांना मोठ्या हॉटेल्सपासून ते फूड पॉइंट कॅफे आणि घरातही चांगली मागणी असते. एक हेक्टर क्षेत्रावर 40 दिवसांत 120 क्विंटल लेट्यूस तयार होतो. बाजारात त्याला 120 रुपयांपर्यंत प्रति किलो दर मिळतो. बाहेर लेट्यूस (Lettuce) लावले तर ते ठराविक महिन्यात घेतले जाता. मात्र ग्रिन हाऊसमध्ये वर्षाचे बाराही महिने लेट्यूस लावू शकतात आणि त्याला तेवढीच मागणी मिळते. त्यामुळे आता भारतातही या लेट्यूसची हिरवी, जांभळी पानं मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहेत.
लेट्यूसची ( Lettuce)पाने पोषक आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्कृष्ट स्रोत मानली जातात. त्यात व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ए यांचे प्रमाण जास्त असते. कोबीपेक्षा लेट्यूसमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. लेट्युसची पाने खायला जास्त कुरकुरीत असतात. मधुमेह आणि कर्करोग सारख्या आजारांबरोबर डायबिटीज आणि कॅन्सर यांसारख्या आजारांबरोबर लढतांना या लेट्यूसचा चांगला उपयोग होतो. लेट्यूसची पानं जेवढी जास्त गडद रंगाची तेवढी त्यातील गुणवत्ता अधिक असते आणि त्याचा जास्त फायदा मानवी शरीराला होतो.
======
हे देखील वाचा : ‘या’ ठिकाणी टोमॅटोपेक्षाही मिळतात स्वस्त काजू
======
याशिवाय शरीरात ज्यांना कायम जळजळ होण्याची तक्रार असेल त्यांनाही लेट्यूसची पानं असलेली कोशिंबीर खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे शरीरात होणारा दाह कमी होतो. या पानांमध्ये कॅलरीजचे प्रमाणही कमी आहे. या पानात 95 टक्के पाणी आढळते. लेट्यूसमध्ये फॅटचे प्रमाणही खूप कमी असते. अल्झायमर रोगासारख्या मेंदूच्या अनेक समस्यांमध्येही लेट्यूसच्या (Lettuce) पानांचे सेवन फायदेशीर पडते. ह्दयाचे आरोग्य सुधारण्यासही या पानांचा उपयोग होतो. व्हिटॅमिन सी चे प्रमाण यात जास्त असते. हृदयाच्या धमन्यांमधील कडकपणा कमी करण्यास आणि रक्त संचरण्यास यामुळे मदत होते. तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे कामही या पानांमुळे होते. शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे कामही ही लेट्यूसची पानं करतात. मुळात या लेट्यूसची लागवड करणे आता सोपे झाले आहे आणि त्याची मागणीही वाढली आहे. शेतक-यांना त्याचा भावही जास्त मिळत असल्यानं लेट्यूसची ही पानं आता शेतक-यांसाठी फायदेशीर ठरत आहेत.
सई बने