Home » धनुष्यबाणाच्या आकाराचे राममंदिर

धनुष्यबाणाच्या आकाराचे राममंदिर

by Team Gajawaja
0 comment
Ram Mandir
Share

प्रभू राम हे समस्त हिंदूचे आदर्श आहेत. प्रभू रामचंद्रांच्या रामायणावर आधारित एक भव्य मंदिर असेल तर ते मंदिरही तेवढेच आदर्शवत असणार आहे. असेच एक मंदिर आंध्र प्रदेशमधील विजयनगर येथे उभारण्यात आले आहे. विजयनगर येथील या राम-नारायण मंदिराची वास्तू धनुष्याच्या आकारात असून हे मंदिर वास्तूशास्त्राचा अद्विताय नमुना म्हणून प्रसिद्ध होत आहे. या मंदिराच्या तळमजल्यावर महाविष्णू आणि वरच्या मजल्यावर भगवान श्रीरामाचे मंदिर आहे.  मंदिराची संपूर्ण बांधणीच वैशिष्टपूर्ण आहे. धनुष्याच्या आकारातील या मंदिरात बाणाच्या पुढच्या बाजूला हनुमानजींची 60 फूट उंचीची मूर्ती आहे. ही भव्य मुर्ती  एक किलोमीटर वरुनही भक्तांना बघता येते.  भारतीय वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेले हे मंदिर बघण्यासाठी दरदिवशी हजारो भाविक भेट देत आहेत. (Ram Mandir)  

आंध्र प्रदेशच्या विजयनगर येथे उभारण्यात आलेले राम-नारायण मंदिर आता भारतभर नव्हे तर विदेशातही प्रसिद्ध होत आहे.  या आगळ्यावेगळ्या मंदिराला बघण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी होत आहे. या मंदिरात फक्त भगवान रामाचे दर्शन घेता येते असं नाही, तर ही संपूर्ण वास्तू एक आध्यात्मिक केंद्र म्हणूनही ओळखली जात आहे. येथील लायब्ररी ही लाखो पुस्तकांनी समृद्ध असून त्यामध्ये अनेक दुर्मिळ ग्रथांचा समावेश आहे. रामायणाच्या थीमवर आधारित या रामनारायणम मंदिरातील आध्यात्मिक केंद्राबाबतही अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. रामनारायणम मंदिर हे विजयनगरममधील कोरुकोंडा रोडवर आहे. विशाखापट्टणम पासून 45 किमी अंतरावर असलेल्या या मंदिरात आता हजारो भाविक भेट देतात. शिवाय येथील ग्रंथांचाही अभ्यास करणा-याचींही गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 15 एकर परिसरात बांधलेले हे मंदिर एनसीएस चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकारानं उभारण्यात आले आहे. 

हे मंदिर आता आंध्र प्रदेशमधील एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जात आहे. मंदिराच्या उभारणीसाठी 18 महिने अनेक कामगार मेहनत घेत होते. मंदिराची बांधणी एवढी सुरेख झाली आहे की धनुष्य बाणाच्या आकारातील या मंदिराला आतापर्यत 2.4 दशलक्ष पर्यटकांनी भेट दिली आहे. मे महिना संपेपर्यंत भाविकांची ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. या मंदिर परिसरात भाविकांना आकर्षित करतील अशी अनेक स्थाने आहेत. त्यामध्ये वाल्मिकी रामायणातील प्रमुख प्रसंगाचे थ्रीडी टेक्नॉलॉजिच्या होणारे सादरीकरण हे एक प्रमुख आकर्षण आहे. प्रभू रामांच्या जिवनावरील हे प्रसंग पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी होत असते. ध्यान केंद्र, भगवान गणेश, भगवान विष्णू आणि भगवान राम,  माता सीता यांना समर्पित असलेली मंदिरे शिवाय,  देवीलक्ष्मी आणि सरस्वती देवी यांच्या 18 फूट उंच मूर्ती ही या प्रणागणममधील आकर्षणे आहेत. (Ram Mandir)

सध्या या मंदिरात भाविकांची वाढती संख्या पाहून मंदिरसकाळी 9 वाजता भाविकांसाठी खुले करण्यात येते.  रात्री 9 वाजता प्रभू रामचंद्रांची आरती होऊन मंदिर बंद करण्यात येते. या मंदिरातच सायंकाळी 6 वाजता रामभक्त हनुमानांच्या जीवनावर लेझर शो दाखवण्यात येत आहे.  श्री हनुमानांनी लंका युद्धात पराक्रम गाजवला. रावणाची लंका त्यांनी जाळली.  माता सितेला शोधण्यासाठी त्यांनी समुद्र पार केला.  या सर्व कथा येथे लेझररुपानं पाहता येतात. नव्या पिढीला प्रभू राम आणि हनुमानाच्या पराक्रमाची गाथा सांगण्यासाठी अशाप्रकारचे शो करण्यात येत असल्याची माहिती मंदिराच्या प्रशासनानं दिली.  (Ram Mandir)

हे मंदिर (Ram Mandir) म्हणजे आध्यात्मिक आणि वैचारिक स्थानही आहे. या आध्यात्मिक केंद्राला प्रांगणम असे म्हणण्यात येते. या प्रांगणमची रचना ही आश्चर्यचकीत करेल अशीच आहे. आध्यात्मिक शांती शोधणा-यांसाठी हे सर्वात चांगले स्थळ असल्याचे सांगितले जाते. अतिशय शांत पण तेवढ्याच प्रसन्न असलेल्या या ठिकाणी आल्यावर भक्तांना शांततेचा अनुभव घेता येतो. यामुळेच या मंदिराला फक्त भारतातील रामभक्त नाही, तर परदेशातील भाविकही मोठ्या संख्येनं भेट देतात. मंदिराला तसेच त्याच्या प्रांगणममधील अध्यात्मिक केंद्राला भेट देणा-यांमध्ये परकिय नागरिकांची संख्या मोठी आहे.  

==========

हे देखील वाचा : जम्मूमध्ये भव्य तिरुपती बालाजी मंदिर 

==========

या मंदिर (Ram Mandir) परिसरातील काही भागात भव्य असे उदयानही आहे.  त्यामध्ये पाण्याचे फवारेही बसवण्यात आले असून रात्री हा सर्व परिसर मधुर संगित आणि आकर्षक विदयुत रोषणाईनं झगमगून जातो. विशेष म्हणजे मंदिरात कुठल्याही प्रकारच्या देणग्या स्विकारल्या जात नाहीत.  धनुष्यबाणाच्या आकारातील दुमजली असलेल्या या मंदिरात नक्षत्र वनम, नारायण वनम, राशी वनम, नवग्रह वनम, विनायक वनम, सप्तर्षी वनम, पंचवटी वनम, पंचभूत वनम ही दुर्मिळ आणि पवित्र झाडे लँडस्केपमध्ये आढळतात.  हे उद्यान बघण्यासाठी सायंकाळी मोठी गर्दी होते.  येथे वृद्ध आणि अपंगांसाठी, प्रवेशद्वारावर लिफ्ट आणि बॅटरीवर चालणाऱ्या कार उपलब्ध आहेत.  याशिवाय मंदिर परिसरातील एक लाखाहून अधिक आध्यात्मिक पुस्तके असलेल्या वाचनालयात अनेक अभ्यासूंची गर्दी होते. 

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.