आरबीआयने नुकतीच घोषणा केली आहे की, दोन हजारांच्या नोटा आता चलनात वापरल्या जाणार नाहीत. अशी घोषणा केल्यानंतर नोव्हेंबर २०१६ सारखी स्थिती निर्माण होणार होती. परंतु आरबीआयने सर्व ग्राहकांना ३० सप्टेंबर पर्यंत बँकेत दोन हजारांच्या नोटा जमा करण्याची परवानगी दिली आहे. अशातच दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करणे किंवा बदलण्यासाठी बँकेच्या शाखांमध्ये ग्राहक धाव घेत आहेत. (2000 Note)
जर तुमच्याकडे सुद्धा २ हजारांची नोट असेल आणि तुम्हाला ती बँकेत डिपॉझिट किंवा बदलून घ्यायची असेल तर त्याआधी तपासून पहा की ती नोट बनावट तर नाही ना?
जेव्हा आरबीआयने २०१६ मध्ये ५०० आणि १ हजारांच्या नोटा चलनातून बाहेर केल्या होत्या तेव्हा ग्राहकांची खुप तारांबळ उडाली होती. तेव्हा त्या बदलण्यास वेळ ही दिली नव्हती. पण आता येत्या ३० सप्टेंबर पर्यंतचा कालावधी दिला आहे. याआधी अशी बातमी समोर आली होती की, २ हजारांच्या नोटा छापण्यास बंद करण्यात आले आहे.
आरबीआयने २ हजारांच्या नोटा खास सिक्युरिटी फिचरसोबत जारी केल्या होत्या. याचा रंग आणि आकार सुद्धा खास पद्धतीने तयार केला गेला. या नोटवर मागच्या बाजूला मंगलयानचा फोटो आहे. नोटेचा रंगा सुद्धा वेगळा आहे. त्यावर भौमितिक पॅटर्न ही खास पद्धतीने तयार केला आहे. या नोटची साइज ६६ मिलीमीटर रुंद तर १६६ मिलीमीटर लांब आहे. (2000 Note)
कशी तपासून पहाल खरी नोट
-२ हजारांचा वॉटरमार्क तपासून पहा
-नोटेवर समोरच्या बाजूला २ हजारची प्रिंटेड इमेज तपासून पहा
-देवनागिरी लिपीत २ हजार रुपये असे लिहिलेले असेल
-नोटेच्या मधोमध महात्मा गांधींजींचा फोटो असेल
-लहान लहान अक्षरात भारत आणि इंडिया असे लिहिलेले असेल
-डार्क आणि हल्या रंगाचे धागे ज्यावर भारत, आरबीआय आणि २ हजार लिहिलेले असेल. नोट हलवून पाहिल्यास धागा हिरवा आणि निळ्या रंगाचा दिसेल.
-सरकार आणि आरबीआयच्या गॅरंटीसह गवर्नरची स्वाक्षरी
-महात्मा गांधींचा फोटो आणि २ हजारांचा इलेक्ट्रोटाइप वॉटरमार्क
-डाव्या बाजूला खाली शून्य आकाराच्या क्रमांकाची साइज कमी कमी होताना दिसेल
-मोठ्या अक्षरात २ हजार रुपये असे लिहिलेले दिसेल
-डाव्या बाजूला अशोक स्तंभ सुद्धा आहे
-डाव्या बाजूला नोट छापल्याचे वर्ष लिहिलेले असेल
-स्वच्छ भारतचा लोगो आणि स्लोगन
-भाषेचा पॅनल लिहिलेला असेल ज्यावर १४ भाषा असतील
हेही वाचा- जनगणनेत चीनला टाकले मागे, वाचा भारताच्या लोकसंख्येवरील हा रिपोर्ट