देवदत्त पडीकल ( ३० चेंडूत ५१ धावा ), यशस्वी जयस्वाल ( ३६ चेंडूत ५० धावा ) आणि शिमरोन हेटमायर ( २८ चेंडूत ४६ धावा ) यांच्या शानदार कामगिरीच्या बळावर राजस्थानच्या संघाने पंजाबचा धुव्वा उडवत महत्वपूर्ण सामन्यात दणदणीत विजय मिळवला. सामन्यातील या विजयाबरोबरच त्यांनी महत्वपूर्ण दोन अंक खिशात घालत आपले प्लेऑफसाठीचे आव्हान कायम ठेवले. पंजाबच्या सामन्यातील पराभवामुळे मात्र त्यांचे आयपीएलच्या चालू सत्रातील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.(PBKS vs RR)

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबच्या संघाला आज पुन्हा चांगली सुरुवात मिळाली नाही. पंजाबचे दोन्ही सलामीवीर फलंदाज प्रभसिमरन सिंग (२ चेंडूत २ धावा ) आणि शिखर धवन ( १२ चेंडूत १७ धावा ) हे लवकरच माघारी परतले. त्यानंतर आलेल्या अथर्व तायडे आणि लियम लिव्हिंगस्टोन यांना देखील आपली जादू दाखवता आले नाही. पंजाबच्या या पडझडीला रोखण्याचे काम मात्र त्यानंतर सम करण आणि जितेश शर्मा यांनी केले.(PBKS vs RR)
करनने धुवाधार फलंदाजीचे प्रदर्शन करत ३१ चेंडूत नाबाद ४९ धावा ठोकल्या. त्याला आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करता आले नाही परंतु त्याची फटकेबाजी संघाच्या पुरेपूर कमी आली. जितेश शर्माने त्याची योग्य साथ देत २८ चेंडूत ४४ धावा ठोकल्या. यांनी राजस्थानकडून खेचून आणलेल्या मोमेंटमचा फायदा शाहरुख खानने घेत २३ चेंडूत ४१ धावांची विस्फोटक खेळी खेळली. यांच्या कामगिरीच्या बळावर पंजाब निर्धारित २० षटकात १८७ धावांची मजल मारू शकला.(PBKS vs RR)
पंजाबने दिलेल्या या लक्षाचा पाठलाग करायला उतरलेल्या राजस्थानने यशस्वी जयस्वालच्या बळावर धुवादार सुरुवात केली. दुसरा सलामीवीर बट्लर मात्र भोपाळाही न फोडता माघारी परतला. त्यानंतर आलेल्या देवदत्त पडीकलने यशस्वीची साथ देत संघाला विजयच्या जवळ न्यायला मदत केली. जयस्वालने ३६ चेंडूत ५० धावांची खेळी केली तर देवदत पडीकलने ३० चेंडूत ५१ धावांची खेळी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे दोघे बाद झाल्यानंतर शिमरोन हेटमायरने संघाची नाव किनाऱ्याला लावली आणि राजस्थानला विजय मिळवून दिला. चार विकेट्स आणि दोन बळी हातात ठेवून राजस्थानने विजयाला गवसणी घातली.(PBKS vs RR)
========
हे देखील वाचा : IPL मध्ये आतापर्यंत ‘या’ खेळाडूंनी पटकावली आहे ऑरेंज कॅप
========
तत्पूर्वी राजस्थानकडून नवदीप सैनीने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत ४ षटकात ४० धावा देत ३ बळी मिळवले. झाम्पा आणि बोल्ट यांनी प्रत्येकी एक बळी मिळवत त्याला योग्य साथ दिली. तर पंजाबकडून कागीसो रबाडा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला त्याने ४ षटकात ४० धावांच्या मोबदल्यात २ बळी मिळवले. करन, अर्शदीप सिंग, एलीस आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी एक बळी मिळवत त्याला योग्य साथ दिली.